नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये शेअर मार्केट मधील नवीन ट्रेडर्सच्या 10 चुका | Trading Mistakes Marathi या विषयी माहिती घेणार आहोत.
शेअर मार्केट मधील ट्रेडिंग हि म्हणावी तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप प्रॅक्टिस, शेअर मार्केटचा अभ्यास, टेकनिकल आणि फंडामेंटल एनालिसिस यांचा खूप अभ्यास असणे गरजेचे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी सुधारणे व माईंडसेट डेव्हलप करणे महत्वाचे आहे. त्यामुळे अशा 10 चुकांचा या पोस्ट मध्ये उल्लेख केलेला आहे. जो की एक नवीन ट्रेडर शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करते वेळेस हमखास त्या चुका करतो. त्या 10 चुकांवर उपाय पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा चुका टाळण्याचा प्रयत्न केला तर तुमची ट्रेडिंग डेव्हलप होण्यास मदत मिळते.
शेअर मार्केट मधील नवीन ट्रेडर्सच्या 10 चुका | Trading Mistakes Marathi
1. तुमच्याकडे उत्पन्नाचा कोणता स्रोत आहे । what income source do you have
शेअर मार्केट मध्ये नवीन ट्रेडरची महत्वाची चूक म्हणजे ‘त्याच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसणे.’ हा होय. नवीन लोक शेअर मार्केटकडे आकर्षित का होतात ? त्याचे कारण म्हणजे शेअर मार्केट मध्ये अनलिमिटेड पैसा कमवू शकता, शेअर मार्केटची ट्रेडिंग तुम्ही कुठेही म्हणजे आपल्या घरी, प्रवासात, कोठेही करू शकता. त्यामुळे शेअर मार्केटकडे बेरोजगार लोकांचा जास्त कल आहे, हि वस्तूस्थिती आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता, तसेच शेअर मार्केटमध्ये लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे कोटुंबिक आर्थिक गरजा भागवण्यासाठी तुमच्याकडे एक उत्पन्नाचा स्रोत असणे खूप गरजेचे आहे.
उत्पन्नाचा स्रोत असल्यामुळे शेअर मार्केट मध्ये कधी प्रॉफिट नाही झाले तरी चालते किंवा एखादा लॉस झाला तरी चालतो. उत्पन्नाचा स्रोत असल्यामुळे तुम्ही शेअर मार्केट मध्ये survive करू शकता. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी फंड म्हणजे पैशाची आवश्यकता असते. मग, ट्रेडिंगसाठी पैसा येणार कोठून ? त्यामुळे आपल्या जवळ पैसा येण्यासाठी स्रोत असणे गरजेचे असते. काही ट्रेडर लोन घेऊन, कोणाकडून पैसे घेऊन किंवा अतिशय आवश्यक असणारा पैसा हा ट्रेडिंगसाठी वापरतात, हि गोष्ट चुकीची आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला ट्रेडिंगसाठी जास्त रक्कम वापरू नये. ट्रेडिंगसाठी इतकाच पैसा वापरावा जो कि, मार्केट मध्ये लॉस जरी झाला तरी त्या लॉस झालेल्या पैशामुळे तुमच्यावर व तुमच्या कोटुंबिक जीवनावर त्याचा दूरगामी परिणाम होऊ नये. त्यामुळे शेअर मार्केटच्या ट्रेडिंगसाठी तुम्ही तुमची नोकरी जो कि खाजगी असो कि सरकारी सोडू नये. तुमचा उधोग धंदा, व्यापार बंद करू नये, जो कि आपल्या उत्पनाचा स्रोत आहे.
2. ट्रेडिंगची सुरुवातच ऑपशन्स ट्रेडिंग पासून करणे । start trading with options trading
शेअर मार्केटमध्ये नवीन ट्रेडर एक डिमॅट अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट खोलतो त्यामध्ये पैसे डिपॉजिट करतो आणि ट्रेडिंग सुरु करतो. ट्रेडिंगची सुरुवात ऑपशन ट्रेडिंग पासूनच करतो. कारण ऑपशन ट्रेडिंग करण्यासाठी फंड कमी लागतो. नवीन ट्रेडरची हि फार मोठी चूक आहे.
तुमची ट्रेडिंग करण्याची दशा व दिशा दोन्ही बदलून जाते. सुरुवातीला नवीन ट्रेडरला ऑपशन ट्रेडिंग मध्ये लॉस शिवाय काहीही मिळत नाही. ऑपशन्स ट्रेडिंगचा प्रकार हा खूप ऍडव्हान्स प्रकार आहे. नवीन ट्रेडरने सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करावी, नंतर इक्विटी ट्रेडिंग करावी. नवीन ट्रेडरला किमान एक वर्षाचा अनुभव व प्रॅक्टिस असणे खूप गरजेचे आहे, नंतर तुम्ही ऑपशन ट्रेडिंग करू शकता. ऑपशन्स ट्रेडिंगला कमी पैसे लागतात, परंतु सर्वात जास्त नवीन ट्रेडर ऑपशन्स ट्रेडिंगमध्ये आपला पैसा गमावतात. त्यामुळे ट्रेडिंगची सुरुवात ऑपशन्स ट्रेडिंग पासून करणे हे चुकीचे आहे.
3. कोणत्याही प्लॅनिंग शिवाय ट्रेडिंग करणे । trading without planning
शेअर मार्केट मध्ये इक्विटी ट्रेडिंग असो, फ्युचर अँड ऑपशन ट्रेडिंग असो, स्कालपिंग, इंट्रा डे ट्रेडिंग असो, डिलिव्हरी ट्रेडिंग असो, ट्रेडिंग करते वेळी एक प्लॅन असणे खूप गरजेचे आहे. ज्याला आपण strategies असे म्हणतो. प्रत्येक ट्रेड घेते वेळी आपण स्वतःला काही प्रश्न विचारावे कि, मी जो ट्रेड घेत आहे तो का घेत आहे ? ट्रेड घेण्याच्या मागचे कारण काय ? आपला स्टॉप लॉस कोणता असेल ? आपले टार्गेट कोणते असेल ? आपला कोणता रेशो आहे. सरासरी ट्रेडचा 1 : 2 रेशो असावा. कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, ब्रेक अप चा आधार घेऊन आपला एक ट्रेडिंग प्लॅन तयार करूनच ट्रेड घ्यावा.
शेअर मार्केट मध्ये कोणताही प्लॅन तयार न करता. अंदाजे ट्रेड घेणे म्हणजे आपण गेम्बलिंग करत आहोत असे समजावे. एखादा ट्रेडर गेम्बलिंग ट्रेडिंग केव्हा करतो जेव्हा त्याचा शेअर मार्केट विषयी अभ्यास झालेला नसतो. टेक्निकल एनालिसिसचा व अनुभवाचा अभाव असतो.
4. स्टॉप लॉस चा वापर न करणे । not using stop loss
शेअर मार्केटमध्ये नवीन ट्रेडर ट्रेडिंग करते वेळेस एक चूक करतो ती म्हणजे आपण घेतलेल्या ट्रेडला स्टॉप लॉस लावत नाहीत. अशी चूक नवीन ट्रेडरला खूप महागात पडते. लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करते वेळी आपण ठरवतो कि, मार्केट जर ह्या पॉईंटला आले तर मी मार्केट मधून बाहेत पडेल म्हणजे स्टॉप लॉस घेईल. म्हणजे ट्रेड मधून लॉस बुक करून ट्रेड मधून बाहेर निघूत. असे आपण ठरवतो.
मार्केट तुम्ही ठरवलेल्या पॉइंट जवळ येऊन वर जाते. तेव्हा तुम्ही स्टॉप लॉससाठी लावलेली ट्रेंड लाईन थोडी खाली घेतात. मार्केट परत तुम्ही लावलेल्या ट्रेंड लाईन जवळ येईन वर जाते, तेव्हा तुम्ही स्टॉप लॉस घेत नाहीत. तुम्हाला ट्रेड मध्ये लॉस झालेला दिसतो. तुम्ही घाबरून जातात कि आपल्याला जास्त लॉस झालेला आहे. तेव्हा तुम्ही तुमचे इमोशन कंट्रोल करू शकत नाहीत. तुम्हाला वाटते कि मार्केट परत मी घेतलेल्या ट्रेड नुसार परत जाईल. तेव्हा तुमच्या मनात एक अशा निर्माण होते कि, परिस्थी बदलून तुमच्या सारखी होईल. परंतु मार्केट तुम्ही घेतलेल्या ट्रेडच्या उलट जातो. तेव्हा तुम्ही मार्केट सोबत लढतात.
अशा वेळी जर तुम्ही स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावणे खूप महत्वाचे आहे. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावणे म्हणजे रिस्क मॅनेज करणे. तुम्ही रिस्क किती घेऊ शकता हे ठरवणे. मार्केट सोबत कधीही लढू नये, रिस्क मॅनेजमेंट अगोदरच ठरवा. जर मार्केट पॉजिटीव्ह साईड ने जात असेल तर पॉजिटीव्ह ट्रेड घ्या जर मार्केट निगेटिव्ह साईड ने जात असेल तर निगेटिव्ह साईडला ट्रेड घ्या आणि स्टॉप लॉस जरूर लावा. लॉस छोटा आणि प्रॉफिट मोठे हि गोष्टी लक्षात ठेवा.
5. प्रॉफेट मिळवण्यामध्ये पेशन्स न बाळगणे । lack of patience in profit taking
शेअर मार्केटमध्ये सरासरी नवीन ट्रेडर एक चूक करतात, ती म्हणजे जेव्हा आपल्याला कोणत्या ट्रेड मध्ये प्रॉफिट मिळत असेल तर लवकर प्रॉफिट बुक करतात. नंतर आपण पाहतो कि अरे आपण प्रॉफिट लवकर बुक केले ,आपण जर थोड थांबलो असतो तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळाले असते. या चुकीचे कारण म्हणजे आपण ट्रेड घेते वेळेस कोणताही प्लॅन न ठरवता, टेक प्रॉफिट पॉइंट म्हणजे आपले प्रॉफिट बुक करण्याचे टार्गेट ठरवत नाहीत. आपल्याकडे पेशन्स नसतो. प्रॉफिट मिळत आहे तर लवकर बुक करतो. अशा चुका नवीन ट्रेडर कडून होतात.
अशी चूक टाळण्यासाठी ट्रेड घेते वेळेस प्लॅन करून ट्रेड घ्यावा. आपला स्टॉप लॉस ठरवावा, ठराविक ह्या पॉइंटला मार्केट आले तर 50% प्रॉफिट बुक करावे व आपला स्टॉप लॉस हा ट्रेल करून आपल्या बाईंग प्राईज वर मूव्ह करावा. जेणे करून जरी आपला स्टॉप लॉस हिट झाला तरी आपण ट्रेड मध्ये 50% प्रॉफिट वर निघू शकतो किंवा जर मार्केट आपल्या दुसऱ्या टार्गेट पॉइंटला टच केले तर आपण पूर्ण प्रॉफिट बुक करावे आणि मार्केट मध्ये पेशन्स ठेवावे.
दुसरी गोष्ट म्हणजे जर मार्केटमध्ये एकदम मोठी कॅण्डल येऊन शॉर्ट पिरियड मध्ये जर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळत असेल तर आपण पूर्ण प्रॉफिट बुक करू शकता कारण ज्या स्पीड ने मोठी कॅण्डल बनू शकते त्याच स्पीडने मार्केट रिवर्स पण होऊ शकते. जर मार्केट आपल्या ट्रेडनुसार मूव्ह होत असेल प्रॉफिट बुकिंग ट्रेड जास्त वेळ चालू ठेवावा आणि लॉस मेकिंग ट्रेड लवकर बुक करून ट्रेडमधून बाहेर पडावे. या गोष्टीचा विचार करून प्रॉफिट बुक करते वेळेस पेशन्स बाळगावे.
6. मार्केटच्या ट्रेंडचा एनालिसिस न करणे । not analyzing the trends
शेअर मार्केटमध्ये नवीन ट्रेडर चूक करतात ती म्हणजे मार्केटच्या ट्रेंडचा एनालिसिस करत नाहीत. जर आपण कोणत्याही इंडेक्स मध्ये ट्रेड करत असाल तर त्या इंडेक्सचा लॉन्ग पिरेड मध्ये किंवा शॉर्ट पिरेड मध्ये कोणता ट्रेंड चालू आहे. याचा एनालिसिस करणे खूप गरजेचे असते. आपला प्रत्येक ट्रेड हा ट्रेंडच्या नुसार असावा. जर अप ट्रेंड असेल तर बाइ साईड ने ट्रेड घ्यावा किंवा डाऊन ट्रेंड असेल तर सेल साईड ने ट्रेड घ्यावा.
शेअर मार्केटमध्ये किंवा कोणत्याही मार्केटमध्ये एक गोष्ट ऐकण्यास मिळते ती म्हणजे ‘Trend Is Friend’ म्हणजे ट्रेंड हा तुमचा मित्र आहे. जर मार्केटच्या ट्रेंडनुसार जर तुम्ही ट्रेड घेतले तर तुमचा लॉस होण्याचे कमी चान्सेस आहेत. जर तुम्ही ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड घेतला तर तुमचा लॉस होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे मार्केटच्या ट्रेंडला ओळखा त्याचा चांगला एनालिसिस करा.
7. योग्यरित्या रिस्क मॅनेज न करणे । not managing risk properly
शेअर मार्केटमध्ये एक नवीन ट्रेडर ट्रेडिंगसाठी फंड जमा करतो. ट्रेडिंग फंड कोणाचा जास्त असू शकतो कोणाचा कमी असू शकतो. उदा. जर तुम्ही 1 लाख रुपये घेऊन ट्रेडिंग करण्याचा विचार केला. म्हणजे तुमचे ट्रेडिंग फंडची व्हॅल्यू 1 लाख रुपये आहे. तर तुम्ही 1 लाख रुपये मध्ये किती मोठा ट्रेड घेऊ शकता. त्या 1 लाखाच्या ट्रेड मध्ये तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. म्हणजे किती लॉस सहन करू शकता हे ठरवणे. यालाच रिस्क मॅनेज करणे असे म्हणतात.
शेअर मार्केट मधील ट्रेडिंग फंड पैकी जास्तीत जास्त 2% लॉस सहन करावा. म्हणजे आपण 1 लाख रुपयेचा ट्रेड घेतला तर 1 लाखाचा 2% म्हणजे 2000 हजार रुपये लॉस सहन करू शकता. ट्रेड घेते वेळेस आपला स्टॉप लॉस किती पॉइंटचा आहे. म्हणजे एकूण किती रुपयेचा स्टॉप लॉस आहे.
उदा. निफ्टी मध्ये ऑपशन ट्रेडिंग करत असताना जर तुम्ही एक लॉट 100 रुपयेच्या प्राईसवर खरेदी केला. एक लॉट म्हणजे शेअरची 50 कॉन्टेटी आणि तुम्ही स्टॉप लॉस 10 पॉइंटचा ठेवला, म्हणजे 50 x 10 = 500 रुपयेचा तुमचा स्टॉप लॉस होईल. जास्त दूर असलेले स्टॉप लॉस असलेले ट्रेड घेहू नये. ट्रेड मध्ये लावलेल्या फंडचा 2% पर्यंतचा स्टॉप लॉस असावा. तसेच पूर्ण फंड एकाच ट्रेड मध्ये लावू नये त्या फंडाचे वेगवेगळे भाग पाडून ट्रेडिंग करावी. काही फंड इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक करावी, काही ट्रेड स्विंग ट्रेडिंगसाठी ठेवावा, काही फंड रिझर्व्ह ठेवावा. अशा प्रकारे योग्यरित्या रिस्क मॅनेज करावे.
8. ओव्हरट्रेडिंग करणे । over trading
शेअर मार्केटमध्ये एक नवीन ट्रेडरची आठवी चूक म्हणजे एकाच दिवसात जास्त ट्रेड घेतात, म्हणजे ओव्हरट्रेडिंग करतात. जेव्हा आपण फ्युचर अँड ऑपशन मध्ये ट्रेडिंग करतो. तेव्हा आपल्याला थोडे प्रॉफिट झाले कि आपण बुक करतात, किंवा थोडे लॉस मध्ये आलात कि घाबरून ट्रेड बंद करतात. झालेला लॉस भरून काढण्यासाठी परत ट्रेड घेतात, ट्रेड घेते वेळेस कोणताही प्लॅन ठरवलेला नसतो. मार्केटचा ट्रेंड माहित नसतो. आजचा दिवस प्रॉफिट मध्येच जावा हि इच्छा असते, या मध्ये मानसिक स्थीती व माईंड सेट डेव्हलप झालेले नसतो. त्यामुळे आपल्या कडून जास्त ट्रेड घेतले जातात आणि ओव्हर ट्रेडिंग होते.
ओव्हरट्रेडिंगमुळे आपल्याला मिळालेले प्रॉफिट हे आपले Brokerage, STT, NSE & BSE Charges, GST, Stamp Duty आणि SEBI Charges लागल्यामुळे कमी होते. जो भी ट्रेड घेतला असेल त्या ट्रेडला एक तर टार्गेट तरी हिट होऊ दयावे नाहीतर स्टॉप लॉस तरी हिट होऊ दयावा. दिवसातून जास्तीत जास्त तीनच ट्रेड घेण्याची सवय ठेवावी, नाहीतर आपला जास्तीत जास्त पैसा हा ट्रेडिंग फीस मध्येच कटला जातो. त्यामुळे ओव्हरट्रेडिंग करणे टाळावे.
9. दुसऱ्यांच्या टिप्स वर अवलंबून राहणे । trading on others tips
शेअर मार्केटमध्ये नवीन ट्रेडरची नऊवी चूक म्हणजे दुसऱ्याच्या टिप्स वर अवलंबून राहणे. नवीन ट्रेडरला कोणीतरी टिप्स देतात, एखादा शेअर खरेदी करण्याचे सांगतात. यामध्ये आपण कोणताही विचार न करता, आपला कोणताही ट्रेडिंग एनालिसिस न करता, ट्रेड घेतात आणि लॉस करून घेतात. कोणी तरी सांगितलेली टिप्स हि समजून, त्याची पूर्ण माहिती घेऊन, आपला एनालिसिस करूनच ट्रेड घेण्याचा विचार करावा. ट्रेडिंगसाठी व ट्रेडसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये.
10. रिव्हेंज ट्रेड । revenge trade
शेअर मार्केटमध्ये नवीन ट्रेडरची दहावी चूक म्हणजे रिव्हेंज ट्रेड करणे. ‘रिव्हेंज या शब्दाचा अर्थ म्हणजे बदला’ रिव्हेंज ट्रेड म्हणजे बदला घेण्याच्या भावनेने ट्रेड घेणे. ट्रेडिंग मध्ये जसे प्रॉफिट होते तसेच लॉस पण होतो. परंतु लॉस हा छोटा असावा. संपूर्ण ट्रेडिंग फंड पैकी जास्तीत जास्त 2% च्या वर लॉस होऊ देऊ नये.
उदा. एखाद्या ट्रेडमध्ये तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही आणि तुम्हाला त्या ट्रेड मध्ये 10000 रुपयेचा लॉस झाला. तो झालेला लॉस भरून काढण्यासाठी तुम्ही जास्त फंड लावून ट्रेड करतात. परत त्यामध्ये लॉस झाला तर परत पुन्हा ट्रेडिंग फंड वाढून ट्रेड घेतात. शेअर मार्केटमध्ये कधीही लॉस रिकव्हरी करण्यासाठी ट्रेड करू नये. शेअर मार्केटमध्ये कधीही लॉस भरून काढण्यासाठी सूड भावनेने ट्रेड घेऊ नये.
निष्कर्ष :-
शेअर मार्केटमध्ये नवीन ट्रेडर ट्रेडिंग सुरु करतो तेव्हा नकळत का होईना त्याच्याकडून चुका होतात. आपण ट्रेडिंगमध्ये कोणकोणत्या चुका करत आहोत याची माहिती घेऊन त्या चुका सुधाराव्यात जर आपण चूक सुधारण्यावर भर दिला तर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे सोपे होईल व परिणामी आपल्याला प्रॉफिट होत राहील.
डिस्केलमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्धेशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु करण्यासाठी ‘स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग कशी सुरु करावी ?’ या पोस्टला जरूर भेट द्या.
धन्यवाद !