शेअर मार्केट मधील Index ची माहिती । Share Market Index Marathi

5/5 - (1 vote)

(share market index marathi) शेअर मार्केट मधील इंडेक्सची माहिती, (what is index in marathi) इंडेक्स म्हणजे काय ? (what is index number) इंडेक्स नंबर काय आहे ?

या पोस्टमध्ये आपल्याला इंडेक्स म्हणजे काय ? इंडेक्सचे प्रकार, इंडेक्स नंबर काय आहे ?  शेअर मार्केटमधील इंडेक्सचे फायदे काय आहेत ? इंडेक्स कोणत्या आधारावर बनवला जातो ? अशी बरीच माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत ज्यामुळे आपणाला शेअर मार्केट मधील इंडेक्सला समजण्यास मदत होईल.

अनुक्रमणिका

इंडेक्स म्हणजे काय ? 

शेअर मार्केट मधील वेगवेगळे इंडेक्स समजण्या अगोदर किंवा इंडेक्सचे आणि स्टॉक मार्केटमधील असलेले संबंध समजण्या अगोदर आपण इंडेक्स म्हणजे काय ? आणि त्याचा सविस्तर अर्थ समजून घेऊ. इंडेक्स (Index) म्हणजे एखाद्या गोष्टीचा भाव, दर, किंमत, मूल्य इत्यादी मध्ये होणाऱ्या बदलाला मोजण्याचे एक साधन म्हणजे इंडेक्स (Index) ज्याला आपण मराठीमध्ये “निर्देशांक” असे म्हणतो आणि ते आपल्यासाठी एका इंडिकेटर प्रमाणे काम करतो.

शेअर मार्केट व्यतिरिक्त दुसरे वेगवेगळे इंडेक्स आहेत. जसे कि, CPI (Consumer Price Index) ज्यामध्ये आपल्याला देशातील इन्फ्लुएशन विषयी माहिती मिळते. Bond Index मध्ये जे डेट मार्केटशी संबधीत असतात, Commodity मार्केटचे पण इंडेक्स असतात व कांही स्पेशल इंडेक्स सुद्धा असतात जसे कि, Human Development Index या इंडेक्समध्ये देशाचे development कशा पद्धतीने वाढत आहे किंवा कमी होत आहे याची मोजणी केली जाते आणि होणारा बदल मोजला जातो.

इंडेक्स फक्त शेअर मार्केट मध्येच वापरले जातात असे नाही. इत्तर ठिकाणीही इंडेक्स बनवून होणारा बदल मोजू शकतो. मला आशा आहे की तुम्हाला इंडेक्स म्हणजे काय ? आणि त्याचा अर्थ समजला असेल आता आपण शेअर मार्केट मधील इंडेक्स विषयी जाणून घेऊ.👇

शेअर मार्केट मधील इंडेक्सची माहिती । Share Market Index Marathi

भारतीय शेअर मार्केटमध्ये (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 आणि (सेन्सेक्स) SENSEX हे दोन प्रमुख इंडेक्स आहेत. या इंडेक्सला बेंचमार्क इंडेक्स असे सुद्धा म्हणतात. (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 हा इंडेक्स टॉप 50 कंपन्यांचा मिळून बनलेला आहे आणि  (सेन्सेक्स) SENSEX हा टॉप 30 कंपनीचा मिळून बनलेला आहे.

NSE या स्टॉक एक्सचेंजचा (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 हा इंडेक्स आहे आणि BSE स्टॉक एक्सचेंजचा (सेन्सेक्स) SENSEX हा इंडेक्स आहे तसेच NSE वर 2200 च्या वर आणि BSE वर 5000 च्या वर कंपन्या लिस्ट आहेत. या दोन्ही एक्सचेंज वर मिळून 7200 च्या वर कंपन्या लिस्ट आहेत.

वरील कंपन्यांचा एकूण संख्या पहिली असता शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी किंवा शेअर मार्केट कुणीकडे जात आहे म्हणजे स्टॉक मार्केट वाढले आहे कि कमी झाले आहे. स्टॉक मार्केटची ग्रोथ कशी होत आहे ? हे समजून घेण्यासाठी प्रत्येक कंपनीचा परफॉर्मन्स पाहणे शक्य नाही आणि प्रत्येक कंपनीचा डेटा समजून कोणताही निष्कर्स काढणे चुकीचे ठरू शकते व समजून घेणे पण खूप अवघड आहे. त्यामुळे प्रत्येकी कंपनीचा परफॉर्मन्स पाहण्या पेक्षा ज्या कंपन्या एक सारख्या आहेत त्यांचा एक ग्रुप करून एक इंडेक्स बनवला जातो.

आपणाला कोणी विचारले कि, आज स्टॉक मार्केटचा मूड कसा आहे ? त्यासाठी आपणाला प्रत्येक कंपनीचा डेटा पहावा लागेल, कोणत्या कंपन्याच्या शेअरचा प्राईज कमी झाला आहे आणि कोणत्या कंपनीचा प्राईज वाढला आहे नंतर त्यांची बेरीज करून एव्हरेज काडून आज स्टॉक मार्केट किती वाढले व कमी झाले हे कळेल परंतु असे करणे शक्य नाही एवढे सर्व करण्या अगोदर वेळ निघून गेलेली असेल.

हा सर्व तामझाम करण्यापेक्षा स्टॉक मार्केट मधील असलेले इंडेक्स संपूर्ण स्टॉक मार्केटचा मूड सांगतात. आज मार्केट कसे आहे ते आपणाला इंडेक्सचा ट्रेंडिग चार्ट पहिला असता कळते कि आज स्टॉक मार्केट वर गेले आहे कि खाली गेले आहे.

भारतामध्ये अनेक छोटे मोठे बिजनेस आहेत आणि कोणता बिजनेस कसा प्रोफॉर्मेन्स करत आहे ? किती ग्रो करत आहे ? हे पहाण्यासाठी प्रत्येक बिजनेचा डेटा आपण पाहून केलक्युलेशन करू शकणार का ? नाही न ! त्यामुळे हि सर्व माहिती पाहण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेले बिजनेसच्या शेअरची प्राईज किती कमी झाली आणि किती वाढली हे पहाण्यासाठी आणि समजण्यासाठी आपल्याला इंडेक्स मदत करतात ते एका इंडिकेटर प्रमाणे व काम करतात आणि ट्रेडिंग चार्टने प्रदर्शित केले जातात.

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 हा इंडेक्स 50 कंपन्यांचा का मिळून बनलेला आहे ? आणि  (सेन्सेक्स) SENSEX हा 30 कंपनीचा का मिळून बनलेला आहे ? कारण स्टॉक मार्केटमध्ये दोन्ही एक्सचेंज वर 7200 च्या वर कंपन्या लिस्ट आहेत मग असं का ? कारण तुम्ही तर म्हणताल कि, फक्त 50 कंपन्याच किंवा फक्त  30 कंपन्याच पूर्ण मार्केटची माहिती कश्या बर सांगतील ?

कारण असे आहे कि, NIFTY च्या 50 कंपन्यांचा मार्केटचे व्हॅल्यूवेशन पहिले असता संपूर्ण मार्केटच्या 50 टक्के पेक्षा जास्त व्हॅल्यूवेशन आहे त्यामुळे या 50 कंपन्या हल्ल्या कि पूर्ण मार्केट हलते. 😊 कारण ह्या टॉप 50 व टॉप 30 कंपन्याजवळच  मार्केटचे जास्त व्हॅल्यूवेशन असते 💪

परंतु इंडेक्स सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते कोणते व कसे ते आपण आता पाहू.👇

शेअर मार्केट मधील इंडेक्सचे प्रकार ?

शेअर मार्केटमध्ये अनेक वेगवेळे इंडेक्स आहेत आणि हे इंडेक्स वेगवेगळ्या गोष्टीचा आधार घेऊन बनवलेले असतात जसे कि, मार्केट कॅपिटॅलिझशन (Market Capitalization), सेक्टर (Sector), स्टॉक प्राईस (Stock Price), यांचा आधार घेऊन असे वेगवेगळे प्रकारचे इंडेक्स बनवले जातात. तसेच दुसरे वेगवेगळे इंडेक्स पण असतात जसे कि, वोलॅटिलिटी इंडेक्स (Volatile Index) जो कि, वोलॅटिलिटी किती आहे हे मोजतो. शेअर मार्केटमधील इंडेक्स कोणत्या प्रकारामध्ये मोडतात ते पाहू.👇

बेंचमार्क इंडेक्स

शेअर मार्केटमधील NIFTY 50 (निफ्टी फिफ्टी) या इंडेक्स मध्ये 50 आणि SENSEX (सेन्सेक्स) मध्ये 30 अश्या कंपन्या आहेत ज्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे अश्याच कंपन्या NIFTY 50 व SENSEX मध्ये समाविस्ट असतात.  तसेच हे इंडेक्स NSE व BSE या एक्सचेंज चे इंडेक्स आहेत. अश्या स्टॉकच्या समूहाला बेंचमार्क इंडेक्स म्हणून ओळखले जाते. कारण निवडलेल्या कंपन्याचे नियमन करण्यासाठी एक सर्वोत्तम मापदंडाचा वापर करतात. या इंडेक्समुळे आपल्याला कळते कि, स्टॉक मार्केटची परिस्तिथी कशी आहे आणि स्टॉक मार्केटची माहिती मिळवण्यासाठी हे ‘इंडेक्स’ एक विश्वसनीय स्रोत मानला जातो.

मार्केट कॅप इंडेक्स

काही इंडेक्स हे त्या कंपनीच्या मार्केट कॅप म्हणजे मार्केट कॅपिटॅलिझशन वर आधारित कंपन्यां निवडतात. मार्केट कॅपिटॅलिझशन च्या आधारावर बनलेले इंडेक्स म्हणजे (निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स) Nifty Small Cap Index, (बी.एस.ई मिड कॅप इंडेक्स) BSE Mid Cap Index तसेच (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 आणि (सेन्सेक्स) SENSEX हे (लार्ज कॅप इंडेक्स) Large Cap Index आहेत.

सेक्टरवर आधारित इंडेक्स

तसेच (निफ्टी बँक इंडेक्स) Nifty Bank Index, (निफ्टी मेटल इंडेक्स) Nifty Metal Index हे सर्व सेक्टर वाईज इंडेक्स आहेत जे कि, एका सेक्टरचे प्रतिनिधीत्व करतात. उदा. निफ्टी ऑटो इंडेक्स, निफ्टी आय.टी. इंडेक्स, निफ्टी फार्मा इंडेक्स अशा प्रकारचे इंडेक्स असतात जे कि सेक्टर वाईज इंडेक्स आहेत.

भारतात NSE व BSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर (ब्रॉड बेस्ड इंडेक्स) Broad-based Index (थिमॅटिक इंडेक्स) Thematic Index, (सेक्टरॉल इंडेक्स) Sectoral Index, (इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजि इंडेक्स) Investment Strategy Index, (सस्टेनेबिलिटी इंडेक्स) Sustainability Index, (कस्टमाईज्ड स्ट्रॅटेजि इंडेक्स) Customized Strategy Index असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक इंडेक्स आहेत. 

NSE IndexBSE Index या वेबसाईट वर जाऊन कोणकोणते इंडेक्स आहेत हे पाहू शकता. परंतु या सर्व इंडेक्सचा आपल्याला काय उपयोग आहे हे पण जाणून घेऊया 👇

शेअर मार्केट मधील इंडेक्सचा उपयोग.

शेअर मार्केटमधील इंडेक्सचे तसे खूप उपयोग आहेत परंतु काही चांगले व महत्वाचे उपयोग आहेत ते खालील प्रमाणे :-

शेअर मार्केटची माहिती मिळवण्यासाठी इंडेक्सचा उपयोग केला जातो.

शेअर मार्केटमधील इंडेक्सचा महत्वाचा उपयोग म्हणजे शेअर मार्केटची माहिती मिळवणे हा होय. इंडेक्समुळेच आपणाला बाजाराची दिशा व दशा या दोन्ही स्थितीचा तसेच एकूण देशाची आर्थिक परिस्तिथी शेअर मार्केटमधील इंडेक्स वरूनच आपणाला हे कळते कि, देशातील लोक आपल्या भविष्या बद्दल आशावादी आहेत कि, निराशावादी आहेत. इंडेक्समुळे मार्केटमधील लोकांचा मूड कळतो. जर इंडेक्स वाढला तर देशातील इन्व्हेस्टर आशावादी आहेत आणि जर इंडेक्स खाली आला तर इन्व्हेस्टर निराशावादी आहेत असे कळते.

इंडेक्सचा बेंचमार्कसाठी पण उपयोग होतो.

बेंचमार्कचा उपयोग पोर्टफोलिओ मध्ये असणारी जोखीम आणि मिळणारे रिटन तसेच पोर्टफोलिओ डाव्हर्सीफिकेशन म्हणजे वितरित करण्यासाठी होतो. जसे कि, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आपण स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट मध्ये आहात का ? नुकसानीत आहात जर प्रॉफिट झाले तर ते किती झाले हे तुम्ही कसे पहाल ?

समजा तुम्ही (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 च्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली वर्षांमध्ये तुम्ही 20 टक्के प्रॉफिट मिळवले परंतु  (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 ने वर्षभरामध्ये 28% टक्के प्रॉफिट दिले. या गोष्टी वरून आपणाला कळाले कि, आपणाला मार्केटमधून 8% टक्के प्रॉफिट कमी मिळाले तुम्हीच विचार करा कि, (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 इंडेक्स नसेल किंवा आपण इंडेक्स सोबत तुलना केली नसती तर आपणाला कसे कळते असते कि आपल्या पोर्टफोलिओचा ओव्हरऑल प्रोफॉर्मनेन्स कसा आहे ते. तेव्हा इंडेक्सला एक बेंचमार्क सारखे वापरले जाते.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व गुंतवणुकीसाठी इंडेक्सचा उपयोग केला जातो.

शेअर मार्केटमध्ये इंडेक्सचा ट्रेडिंगसाठी व गुंतवणुकीसाठी जास्त उपयोग केला जातो, बहुतेक ट्रेडर हे इंडेक्समध्ये ट्रेडिंग करतात. मार्केटच्या दिशाचे म्हणजे मार्केट वर जाणार आहे कि खाली याचे भविष्य किंवा अनुमान लावून इंडेक्समध्ये ट्रेडिंग केली जाते. उदाहरण घ्या कि, तुम्हाला वाटले कि, आज मार्केटमध्ये एक चांगली बातमी येणार आहे. त्यावरून तुम्ही इंडेक्स खरेदी केला आणि मार्केट तुमच्या अनुमानानुसार जाते व मार्केट वर जाते तेव्हा इंडेक्स जेवढे पॉईंट ने वर गेला तेवढे तुमचे प्रॉफिट झाले.

अशा प्रकारची ट्रेडिंग हि डेरिव्हेटीव्ह सेगमेंट (Derivatives Segment) मध्ये होतात. डेरिव्हेटीव्ह सेगमेंट मधील ट्रेडिंगचे उदाहरण घ्यावयाचे गेले तर (Future) फ्युचर आणि (Options) ऑप्शन ची ट्रेडिंग जी कि शेअर मार्केट मध्ये खूप जास्त प्रमाणात केली जाते.

पोर्टफोलिओ हेजिंगसाठी इंडेक्सचा उपयोग केला जातो.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार हा आपला एक पोर्टफोलीओ (Portfolio) बनवतो ज्यामध्ये काही 10 ते 12 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून ठेवलेले असतात. जे कि, लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी करून ठेवलेले असतात. परंतु मार्केटमध्ये काही असे दिवस येतात कि, मार्केटची खूप खराब परिस्तिथी येते मार्केट कोसळते. तेव्हा आपण गुंतवणूक केलेले पैसे हे कमी होऊ नये म्हणून गुंतवणूकदार इंडेक्समध्ये गुंतवणूक करून हेजिंग करतो. तेव्हा आपला पोर्टफोलीओ (Portfolio)  मॅनेज करण्यासाठी इंडेक्सचा उपयोग होतो.

आपण इंडेक्स चा उपयोग पहिला परंतु शेअर मार्केटमध्ये असणारे इंडेक्स याची निर्मिती कशी केली जाते. हे पाहणे खूप गरजेजे असते कारण आपण जो पर्यंत इंडेक्सला पूर्ण जाणून घेतले नाही तर आपण इंडेक्सचा कसा उपयोग करावयाचा आहे हे समजणे खूप कठीण होईल. खास करून जे ट्रेडर इंडेक्समध्ये ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी तर इंडेक्स बनतो कसा ? हे पाहणे खूप गरजेचे आहे. चला तर मग आपण इंडेक्सची निर्मिती कशी केली जाते ते पाहू.👇

शेअर मार्केट मधील इंडेक्सची निर्मिती कशी केली जाते ?

इंडेक्स कसा बनवला जातो? इंडेक्सची निर्मिती कशी होते ? इंडेक्स कशाच्या आधारावर बनवला जातो ? याची एका ट्रेडरला किंवा इन्वेस्टरला महत्वाचे म्हणजे एका इंडेक्स ट्रेडरला माहिती असणे खूप गरजेचे आहे. आपण वर पहिलेच आहे कि, एका  इंडेक्स मध्ये अनेक सेक्टर मधील कंपन्यांचा समावेश असतो. अश्या इंडेक्स वरूनच कळते कि, देशाची आर्थिक परिस्तिथी कशी आहे.

जेव्हा एका इंडेक्समध्ये एक कंपनीची निवड होते तेव्हा अशा कंपन्या त्या इंडेक्समध्ये असतात ज्यांच्यामध्ये काही वैशिष्टये असतात. अश्याच वैशिष्टयेपूर्ण असणाऱ्या कंपन्या इंडेक्समध्ये आपली जागा निश्चित करतात. जेव्हा कंपनीचे वैशिष्टये संपते किंवा कमी होते त्या ठिकाणी दुसऱ्या वैशिष्टयेपूर्ण कंपन्यांचा समावेश होतो. इंडेक्स बनवण्यासाठी अश्या कंपन्यांची लिस्ट बनवली जाते कि, ज्या कि, इंडेक्ससाठी लागणारे वैशिष्टये, नियम आणि अटींची पूर्तता करते. त्या नंतर प्रत्येक कंपनीचे एक वेटेज ठरवले जाते.

कंपनीचे वेटेज (Weightage) म्हणजे त्या एका कंपनीचे त्या इंडेक्समधील दुसऱ्या कंपनीपेक्षा किती महत्व आहे. ज्याला आपण मराठीमध्ये वजन असे म्हणतो. जसे कि सध्या (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 मध्ये रिलायन्स कंपनीचे वेटेज म्हणजे महत्व दुसऱ्या कंपनीपेक्षा जास्त आहे. रिलायन्सचे वेटेज 12.86 आहे. म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स वाढण्या मागे किंवा कमी होण्या मागे या रिलायन्स कंपनीचा 12.86 ची वाटा म्हणजेच भूमिका आहे.

आता आपणाला एक प्रश्न पडला असेल कि हे वेटेज कशाच्या आधारावर ठरवले जाते ?

मुख्य करून दोन आधार आहेत या आधाराचा वापर करून इंडेक्स बनवले जातात.

1) मार्केट कॅपीटलायझेशन

जर इंडेक्स बनवण्यासाठी मार्केट कॅपीटलायझेशन आधार घेऊन इंडेक्स बनवला जातो तेव्हा ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपीटलायझेशन म्हणजे “बाजार भांडवल” जास्त अश्याच कंपन्यांचा इंडेक्समध्ये समावेश करतात. ज्या कपंनीचे बाजार भांडवल म्हणजे मार्केट कॅपीटलायझेशन जास्त त्या कंपनीचे त्या इंडेक्समध्ये वेटेज म्हणजे वजन पण जास्त असते.

इंडियन स्टॉक मार्केट म्हणजेच इंडियन एक्सचेंज कंपनीचे वेटेज ठरवण्यासाठी जो मार्ग किंवा आधार वापरला जातो त्याला “फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन” Free Float Market Capitalization) असे म्हणतात.

इंडेक्समधील असलेल्या स्टॉक चे वेटेज हे त्या स्टॉकचे असणारे फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशनच्या आधारावर ठरवले जाते. ज्या स्टॉक चे फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन जास्त त्या स्टॉकचे इंडेक्समधील वजन म्हणजेच वेटेज जास्त अश्या प्रकारे वेटेज ठरवले जाते.

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, ‘फ्री फ्लोट मिडकॅप’ किंवा ‘फुल मिडकॅप’ हे दोन्ही वेगळे कसे आहेत ? त्यासाठी मार्केटकॅप काय असते ते पहा. मार्केटकॅप म्हणजे कंपनीनीचे एकूण आऊटस्टॅंडिंग शेअरची एकूण व्हॅल्यू परंतु फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन मध्ये कंपनीच्या प्रमोटरचे शेअर धरले जात नाहीत, फक्त बाजारामध्ये जेवढ्या शेअरची ट्रेडिंग होते असेच शेअर्स धरले जातात. परंतु मार्केटकॅप मध्ये सर्व शेअर धरले जातात.

कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन काढण्यासाठी त्या कंपनीचे एकूण ट्रेडिंगसाठी अव्हेलेबल असलेल्या स्टॉकच्या संख्याला त्या कंपनीच्या स्टॉकची चालू असणारी प्राईज म्हणजे किमतीने गुणले म्हणजे दोन्हीचा गुणाकार केला कि, त्या कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन निघते.

उदा. एका या XYZ या कंपनीचे बाजारात ट्रेडिंगसाठी अव्हेलेबल असलेल्या स्टॉकची संख्या आहे 1000 आहे आणि त्या स्टॉकची  किंमत म्हणजे प्राईज आहे 100 आहे तेव्हा XYZ या कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन झाले

1000 ×100 = 1,00,000. (अक्षरी : एक लाख रुपये)

महत्वाची एक गोष्ट आपणास समजली पाहिजे कि, कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन हे त्या कंपनीच्या स्टॉकच्या किंमत म्हणजे प्राईजच्या बदलानुसार दररोज बदलते. त्यामुळे स्टॉकचे वेटेज दररोज बदलते.

2) कंपनीच्या स्टॉकची प्राईज

या पद्धतीत कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन किंवा कंपनीचे पूर्ण मार्केट कॅपीटलायझेशन म्हणजे मार्केटकॅप ला  महत्व न देता त्या स्टॉकची प्राईज म्हणजे किमतीला महत्व दिले जाते ज्या स्टॉकची प्राईज जास्त त्या स्टॉकचे इंडेक्समध्ये वेटेज जास्त. उदा. जापान चा Nikkei 225 इंडेक्स.

भारतीय शेअर मार्केटमध्ये फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशनचा आधार घेऊन इंडेक्स बनवले जातात. हे अगोदरच वर पहिले आहे. भारतीय स्टॉक मार्केटमध्ये महत्वाचे असणारे (निफ्टी फिफ्टी) NIFTY 50 व (सेन्सेक्स) SENSEX हे महत्वाचे दोन बेंचमार्क इंडेक्स आहेत. हे इंडेक्स बनवण्यासाठी फ्री फ्लोट मार्केट कॅपीटलायझेशन व काही नियम व अटींची पूर्तता करून इंडेक्समध्ये कंपन्या सामाविस्ट केल्या जातात.

मित्रांनो मला अशा आहे कि, शेअर मार्केट मधील इंडेक्सची माहिती तसेच इंडेक्स म्हणजे काय ? याची माहिती तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका आणि हा लेख तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेन्टच्या स्वरूपात अवश्य सांगा.

निष्कर्ष :-

स्टॉक मार्केट असो किंवा इत्तर दुसरे कोणते मार्केट असो इंडेक्स हा त्या मार्केटचा एक अविभाज्य भाग आहे. इंडेक्समुळे मार्केटची दिशा कळते.इंडेक्सचा ट्रेडरला व  गुंतवणूकदारांना खूप लाभ मिळतो.  परंतु जर आपल्याला इंडेक्स म्हणजे काय ? हेच जर माहित नसेल तर आपणाला मार्केटमध्ये काय चाललंय तसेच आपल्या देशाची आर्थिक प्रगती कशी आहे हे समजण्यास खूप अडचण निर्माण होईल. हेच काम इंडेक्स सोपे करतात. 

डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी किंवा ट्रेड घेते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

धन्यवाद.

इंडेक्स (Index) म्हणजे काय ?

इंडेक्स (Index) म्हणजे एखाद्या गोष्टीचा भाव, दर, किंमत, मूल्य इत्यादी मध्ये होणाऱ्या बदलाला मोजण्याचे एक साधन म्हणजे इंडेक्स (Index) ज्याला आपण मराठीमध्ये “निर्देशांक” असे म्हणतो .

कंपनीचे वेटेज (Weightage) म्हणजे काय ?

कंपनीचे वेटेज (Weightage) म्हणजे त्या एका कंपनीचे त्या इंडेक्समधील दुसऱ्या कंपनीपेक्षा किती महत्व आहे. ज्याला आपण मराठीमध्ये वजन असे म्हणतो.

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

1 thought on “शेअर मार्केट मधील Index ची माहिती । Share Market Index Marathi”

  1. खूप छान लेख आहे. महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!