परिचय

नमस्कार मित्रांनो,

मी संजयकुमार,

मी “शेअर मार्केट इन मराठी” या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो. ब्लॉग मध्ये जी आपणास मी माहिती देतो, त्यासाठी माझा अनुभव व त्या माहिती विषयी रिसर्च करून ती माहितीआपल्या मराठी भाषामध्ये आपल्या पर्यन्त पोचवतो. मी एक ग्रामीण भागातील रहिवाशी असुन, ब्लॉगर सोबत शेअर मार्केट मध्ये सुद्धा काम करतो. शेअर मार्केट मध्ये घालवलेला प्रधीर्ग कालावधी मध्ये मला असे दिसुन आले की, शेअर मार्केट विषयी बेसिक पासुन ऍडव्हान्स पर्यन्तची माहिती मराठी भाषेमध्ये मराठी माणसापर्यंत उपलब्ध होत नाही.

माझा हा ब्लॉग तयार करण्यामागे असा उद्देश आहे कि, शेअर मार्केट विषयी माहिती मराठी भाषेमध्ये आपणा पर्यन्त पोहंचवणे  जेणे करून  शेअर मार्केटमध्ये आपणास काम करण्यास मदत मिळेल.

तसेच मी सेबी नोंदणीकृत सल्लागार नाही. सदरील ब्लॉग हा फक्त माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. मी कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी जबाबदार नाही. कारण शेअर बाजार गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.

आपला – संजयकुमार

error: Content is protected !!