शेअर मार्केट मधील इंडिकेटर्सची माहिती | Indicators in Stock Market in Marathi

5/5 - (4 votes)

नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मधील इंडिकेटर्सची माहिती | indicators in stock market in marathi या विषयी या पोस्ट मध्ये आपण माहिती घेणार आहोत.

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी टेक्निकल एनालिसिसचा संपूर्ण अभ्यास असने खूप महत्वाचे आहे. त्यासाठी चार्टचा वापर करावा लागतो. परंतु टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी चार्ट सोबत ‘ट्रेडिंग इंडिकेटर’ चा पण वापर करतात. ट्रेडिंग इंडिकेटर हे टेक्निकल एनालिसिसचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये आपण शेअर मार्केट मधील इंडिकेटर्सची माहिती | indicators in stock market in marathi ची माहिती घेणार आहोत.

शेअर मार्केट मधील इंडिकेटर्सची माहिती | Indicators in Stock Market in Marathi

शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी TradingView किंवा ब्रोकरची वेबसाईट किंवा इत्तर फायनांशियल मार्केट एनालिसिस प्लॅटफॉर्मचा वापर करतो तेव्हा त्या प्लॅटफॉर्म वर अनेक प्रकारचे ‘ट्रेडिंग इंडिकेटर’ उपलब्ध असतात. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक इंडिकेटर आहेत. ज्यांचा टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी वापर करतात.

शेअर मार्केटमध्ये नवीन ट्रेडर हा ट्रेडिंग इंडिकेटरचा वापर करून मार्केटचा ट्रेंड पाहण्यासाठी, मार्केट बुलिश आहे का, मार्केट बेरिश आहे का, मार्केट साईडवेज आहे यांचे अनुमान लावू शकतात. कारण नवीन ट्रेडरचा टेक्निकल एनालिसिसचा संपूर्ण अभ्यास झालेला नसतो. नवीन ट्रेडरला टेक्निकल एनालिसिस शिकताना व कंपनीच्या शेअरची किंवा मार्केटच्या इंडेक्सची माहिती मिळवण्यासाठी, प्राईसची स्टडी करण्यासाठी व कान्फरमेन्शन मिळवण्यासाठी टेक्निकल इंडिकेटर्सचे सहाय्य घ्यावे लागते.

ट्रेडिंग इंडिकेटर्स  हे एका प्रोफेशनल ट्रेडर कडून बनवलेले असतात. त्यामुळेच दररोज एखादा नवीन इंडिकेटर प्लॅटफॉर्म वर उपलब्ध होतोच. शेअर मार्केटमध्ये सध्या जे पब्लिकली इंडिकेटर उपलब्ध आहेत हे इंडिकेटर कोणी तरी बनवलेलेच असतात. आपण सुद्धा आपले स्वतःचे इंडिकेटर बनवू शकतो. सध्या उपलब्ध असलेल्या इंडिकेटरमध्ये काही चांगल्या गोष्टी व काही कमीपणा आढळतोच. कोणतेही इंडिकेटर बनवल्या नंतर त्याची बॅकटेस्टिंग करावी लागते. वेगवेगळे रेशो पाहावे लागतात. त्या इंडिकेटरची कॅप्चर इफिसिएंशी किती आहे हे पाहावे लागते. त्याचा स्ट्राईक रेट किती आहे हे पाहावे लागते. त्या इंडिकेटरचे विंनिंग ट्रेड किती आहेत याचा अभ्यास करावा लागतो. वेगवेळ्या मार्केटमध्ये हे इंडिकेटर कसे काम करत आहे, वेगवेगळ्या टाईम फ्रेम मध्ये कसे काम करत आहे हे पाहावे लागते तेव्हा एक चांगला इंडिकेटर बनतो.

शेअर मार्केटमध्ये Moving Averages हे सर्वात जुने इंडिकेटर आहे. कालांतराने या इंडिकेटरमध्ये बदल झालेले आहेत. तसेच Stochastic इंडिकेटर हे 1950 मध्ये George Lane यांनी बनवलेले आहे. तसेच आजचे जास्त वापरात असणारे इंडिकेटर म्हणजे RSI (Relative Strength Index) हे इंडिकेटर J. Welles Wilder Jr. यांनी बनवलेले आहे. या इंडिकेटरचा उल्लेख त्यांच्या 1978 मध्ये प्रकाशित झालेल्या New Concepts in Technical Trading Systems या पुस्तकामध्ये आढळतो. तसेच 1970 च्या शेवटी Gerald Appel यांनी MACD (Moving Average Convergence/Divergence) हे इंडिकेटर बनवले. तसेच OBV (On- Balance Volume) हे इंडिकेटर पहिल्यांदा Joseph Granville यांनी बनवले आहे. या इंडिकेटरचा उल्लेख 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या  Granville’s New Key to Stock Market Profits या पुस्तकामध्ये उल्लेख आढळतो.

टेक्निकल इंडिकेटर म्हणजे काय ? । what is a technical indicator?

टेक्निकल इंडिकेटर हि डेटा पॉईंटची साखळी असते जी सिक्युरिटीच्या प्राईस डेटावर फॉर्मुला लागू करून मिळवली जाते. म्हणजे प्राईस, स्टक्चर, मोमेंटम व इत्तर डेटा यांचा वापर करून एक प्रकारचे मॅथमेटिकली कॅल्कलुशन करून एक फॉर्मुला बनवला जातो यालाच इंडिकेटर असे म्हणतात. इंडिकेटर म्हणजे इंडिकेट करणे यालाच आपण मराठीमध्ये निर्देशक किंवा सूचना करणारा सूचक असे हि आपण म्हणतो. इंडिकेटर हे ट्रेडिंग चार्टच्यावर किंवा चार्टच्या खालच्या भागी ग्राफिकल स्वरूपात दर्शवले जातात.

स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल इंडिकेटर्सचा वापर कसा करावा ? । how to use technical indicators in stock market

शेअर मार्केटमधील बहुतेक ट्रेडर हे ट्रेडिंगसाठी Price Action Strategies चा वापर करतात. परंतु ट्रेडिंग इंडिकेटरचा वापर करणे चुकीचे आहे असे पण नाही. प्रोफेशनल ट्रेडर पण इंडिकेटरचा वापर करतात. कारण इंडिकेटरचा वापर करणे पण एक कला आहे, जे कि प्रत्येक ट्रेडरला जसा जसा मार्केटचा अनुभव येईल, तसे तसे एका प्रोफेशनल ट्रेडरला इंडिकेटरचा केव्हा, कधी व कशासाठी वापर करावयाचा आहे हे समजते.

शेअर मार्केट मध्ये इंडिकेटरचा वापर हा अलर्ट व मार्केटचा ट्रेंड पाहण्यासाठी करतात. उदा. मार्केटचा ट्रेंड बुलिश असेल आणि आपला ट्रेड बाइ साईडने ट्रेड चालू असेल आणि Price Action Strategies नुसार मार्केटचा ट्रेन्ड बदलन्याचे संकेत देत असेल आणि इंडिकेटर हि ट्रेंड बदलत असल्याचा सूचना देत असेल तर तो आपल्यासाठी एक अलर्ट समजावा. तसेच मार्केटचा ट्रेंड कन्फम करण्यासाठी ट्रेंड इंडिकेटर्सचा वापर करावा.

शेअर मार्केटमध्ये कोणताही इंडिकेटर हा आवडता इंडिकेटर नसावा. प्रत्येक इंडिकेटर हे वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात. शेअर मार्केटमध्ये मोमेंटम पाहण्यासाठी मोमेंटम इंडिकेटरचा वापर करून कन्फरमेशन मिळवावे, मार्केटमधील ट्रेंड पाहण्यासाठी ट्रेंड इंडिकेटरचा वापर करावा, व्हॉल्युम पाहण्यासाठी व्हॉल्युम इंडिकेटरचा वापर करावा, वोलॅटिलिटी पाहण्यासाठी वोलॅटिलिटी इंडिकेटरचा वापर करावा. कारण प्रत्येक इंडिकेटरचे वेगवेगळे काम असते, वेगवेगळ्या कामासाठीच वेगवेगळे इंडिकेटर बनवले जाते. उदा. एखाद्या डॉक्टरला आपण विचारू शकत नाही कि तुमचे आवडते फेव्हरेट मेडिशन कोणते ते कारण प्रत्येक वेगवेगळ्या उपचारासाठी वेगवेगळे मेडिशन असते तसेच प्रत्येक इंडिकेटरचे त्याचे एक निश्चित कामासाठीच बनवलेले असते.

इंडिकेटर वापरासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेडिंग करतेवेळी जास्त इंडिकेटरचा वापर करू नये, कारण प्रत्येक इंडिकेटर हा त्याच्या फॉर्मुला नुसार इंडिकेशन देतात त्यामुळे जास्त इंडिकेटरचा वापर केल्यामुळे वेगवेगळे इंडिकेटर वेगवेगळे इंडिकेशन देतील तेव्हा तुम्ही गोंधळात पडून योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त तीन इंडिकेटरचा वापर करावा.

स्टॉक मार्केटमधील टेक्निकल इंडिकेटर्सचे प्रकार । types of technical indicators in stock market

शेअर मार्केट मध्ये टेक्निकल इंडिकेटर्स हे दोन प्रकारामध्ये विभागलेले आहेत. म्हणजे टेक्निकल इंडिकेटर्सचे दोन प्रकार आहेत.

  • 1. लिडिंग इंडिकेटर (Leading Indicators)
  • 2. लॅगिंग इंडिकेटर (Lagging Indicators)

1. लिडिंग इंडिकेटर :- लिडिंग म्हणजे Lead करणारा किंवा अग्रभागी असणारा. लिडिंग इंडिकेटर म्हणजे असे इंडिकेटर जे कि प्राईसला Lead करतात. प्राईस मध्ये येणाऱ्या मूव्हमेंटला लीड करतात. लिडिंग इंडिकेटर प्राईसमध्ये जोभी मूव्ह येणार आहे ते अगोदरच सांगतात. लिडिंग इंडिकेटर असे संकेत देतात कि स्टॉकची प्राईस जर वाढणारी असेल किंवा स्टॉकची प्राईस कमी होणार असेल तर लिडिंग इंडिकेटर हे प्राईस वाढण्याच्या व प्राईस कमी होण्याच्या अगोदरच आपल्याला संकेत देतात म्हणजे एक प्रकारचे सिग्नल देतात कि प्राईस मध्ये अश्या – अश्या प्रकारे मूव्हमेंट होणार आहे. म्हणजे अगोदरच लिडिंग इंडिकेटर हे Entry Points आणि Exit Points चे सिग्नल देण्याचा प्रयत्न करतात.

लिडिंग इंडिकेटर हे आपल्याला मार्केटमध्ये निश्चित असे अनुमान लावण्यास मदत करतात. भविष्यात एखाद्या स्टॉकची किमतीमध्ये कशा प्रकारे परिवर्तन होऊ शकते, असे अनुमान लावण्यास मदत मिळते. परंतु लिडिंग इंडिकेटरने लावलेले अनुमान किंवा केलेली भविष्यवाणी दिलेला संकेत दिलेले इंडिकेशन 100% खरे नसते. लिडिंग इंडिकेटर सुध्दा फेल सिग्नल व फॉल सिग्नल देतात.

लिडिंग इंडिकेटरचे काही उदाहरण :-

1. Relative Strength Index (RSI)

2. On- Balance Volume (OBV)

3. Stochastic Oscillator

4. Williams%R

2. लॅगिंग इंडिकेटर :- लॅगिंग म्हणजे थांबत थांबत चालणे किंवा मागे राहणे लॅगिंग इंडिकेटर म्हणजे असे इंडिकेटर जे कि Price Action च्या मागे मागे चालतात. अगोदर Price Action चालतो नंतर लॅगिंग इंडिकेटर चालतात. उदा. रेल्वे स्टेशन वरून रेल्वे पुढे गेल्या नंतर रेल्वे मध्ये बसण्याचे सिग्नल देणे, म्हणजे लेट सिग्नल देतात. अशा प्रकारे लॅगिंग इंडिकेटर काम करतात.

परंतु लॅगिंग इंडिकेटर हे प्राईसला फॉलो करतात त्यामुळे मार्केटचा ट्रेंड पाहण्यासाठी अशा लॅगिंग इंडिकेटरचा जास्त वापर करतात. लॅगिंग इंडिकेटरच्या आधारावर सिग्नल घेऊन ट्रेड करणे चुकीचे आहे कारण लॉस होण्याची संभावना जास्त असते. लॅगिंग इंडिकेटर हे लेट Entry Points आणि लेट Exit Points देतात त्यामुळे लॉस होण्याची संभावना जास्त असते.

लॅगिंग इंडिकेटरचे काही उदाहरण :-

1. Moving Averages (MA) (Exponential, Simple, weighted, variable)

2. Moving Average Convergence/Divergence (MACD)

3. Bollinger Bands

स्टॉक मार्केटमध्ये इंडिकेटर्स वापरण्याचे फायदे । advantages of using indicators in the stock market

  1. शेअर मार्केटमध्ये इंडिकेटरचा वापर करणे हि जुनीच संकल्पना आहे. खूप दिवसापासून ट्रेडर ट्रेडिंग इंडिकेटरचा वापर करत आलेले आहेत. विचार करा कि मार्केटमध्ये एकही इंडिकेटर उपलब्ध नसतील तर टेक्निकल एनालिसिस करणे किती अवघड झाले असते. आज टेक्निकल एनालिसिस करते वेळी मार्केटचा ट्रेंड पाहण्यासाठी आपण इंडिकेटरचाच उपयोग करतात. मार्केटमध्ये किती व्हॉल्युम येत आहे हे पण आपण व्हॉल्युम इंडिकेटरचा उपयोग करून पाहू शकतात. मार्केटमधील मोमेंटम, ट्रेंड, व्हॉल्युम, वोलॅटिलिटी पाहण्यासाठी टेक्निकल इंडिकेटरचा वापर करतात.
  2. शेअर मार्केटमध्ये इंडिकेटरचा वापर कधी, कोठे, केव्हा वापर करावा हे जर माहित झाले तर इंडिकेटरचे खूप फायदे आहेत. फक्त मार्केटमध्ये इंडिकेटर वापर करण्याची पद्धत शिकणे खूप महत्वाचे आहे.
  3. शेअर मार्केटमध्ये ट्रेडरला ट्रेडिंग इंडिकेटर खूप मदत करतात. ट्रेडिंग इंडिकेटरमुळे आपल्याला मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे हे कळते. त्यासाठी ट्रेंड इंडिकेटरचा वापर करून लॉंगटर्म मध्ये मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे. शॉर्टटर्म मध्ये मार्केटचा कोणता ट्रेंड चालू आहे हे कळते. ट्रेंड इंडिकेटर उदा. Moving Averages, Super Trend, Parabolic SAR अश्या इंडिकेटरमुळे आपल्याला ट्रेंड जाणून घेण्यास मदत मिळते.
  4. शेअर मार्केटमध्ये मार्केटचा मोमेंटम केंव्हा बदलणार आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. मोमेंटम म्हणजे स्पीड  किंवा वेग. मोमेंटम म्हणजे मार्केटमध्ये एखाद्या स्टॉकचा किंवा इंडेक्सची स्पीड म्हणजे मोमेंटम बदलणार आहे हे समजते. मोमेंटम जर वाढत असेल किंवा मोमेंटम कमी होत असेल तर मोमेंटम इंडिकेटर आपल्याला इंडिकेट करतात कि मोमेंटम शिफ्ट होणार आहे. मार्केटमध्ये ट्रेडिंग करते वेळी मोमेंटम पाहण्यासाठी मोमेंटम इंडिकेटर उदा. MACD, RSI, ADX, Stochastic यांचा वापर करतात. या इंडिकेटरमुळे एखाद्या स्टॉक किती लवकर वर जाणार आहे व किती लवकर खाली येणार आहे किंवा तो स्टॉक साईडवेज चालणार आहे हे कळते अश्या प्रकारे मोमेंटम इंडिकेटर ट्रेडिंग करते वेळी ट्रेडरला खूप मदत करतात.
  5. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतेवेळी व्हॉल्युम पाहणे खूप महत्वाचे आहे. व्हॉल्युम म्हणजे किती शेअर्सची ट्रेडिंग झाली म्हणजे आजच्या दिवशी किती बायर व सेलर यांच्या दोघांना मिळून किती शेअर्सची ट्रेडिंग झाली. व्हॉल्युम पाहण्यासाठी उदा. VWAP, OBV, Volume ह्या इंडिकेटरचा वापर करतात. त्यामुळे ट्रेडरला व्हॉल्युमच्या आधारावर ट्रेडिंग डिसिजन घेणे सोपे होते.
  6. शेअर मार्केटमध्ये वोलॅटिलिटी चेक करणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी इंडिकेटर असतात. मार्केटमध्ये एखाद्या शेअर्समध्ये किती वोलॅटिलिटी आहे. वोलॅटिलिटी कमी होत आहे का ? वोलॅटिलिटी जास्त होत आहे ? हे पाहणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा प्राईस खूप स्पीडने कमी जास्त होते, खूप स्पाईक येतात तेव्हा समजावे कि मार्केट खूप वोल्टाइल आहे. मार्केटमध्ये वोलॅटिलिटी असणे चांगले आहे. परंतु वोलॅटिलिटी च्या आधारावर ट्रेडरला ट्रेड चे डिसिजन घेण्यास मदत मिळते. वोलॅटिलिटी चेक करण्यास वोलॅटिलिटी इंडिकेटरचा उपयोग होतो. उदा. Bollinger Bands, ATR हे वोलॅटिलिटी इंडिकेटर आहेत. या इंडिकेटरचा उपयोग करून आपण मार्केटमध्ये किंवा एखाद्या शेअर्समध्ये वोलॅटिलिटी पाहण्यासाठी त्यांचा वापर करतात. असे इंडिकेटर ट्रेडिंग करतेवेळी उपयोगी पडतात.

स्टॉक मार्केटमध्ये इंडिकेटर्स वापरण्याचे नुकसान । disadvantages of using indicators in the stock market

  1. शेअर मार्केटमध्ये इंडिकेटरचा वापर करून कोणताही ट्रेड घेणे फार चुकीचे आहे. कोणत्याही इंडिकेटरची एक्युरीशी 100% नसते.
  2. ट्रेडिंग इंडिकेटरचा वापर करून त्याच्या आधारावर ट्रेड घेणे चुकीचे आहे. कारण ट्रेडिंग इंडिकेटर हे आपल्याला फक्त इंडिकेट करतात ते कधीही कन्फम नसतात. इंडिकेटर बेस ट्रेडिंग करणे धोकादायक असते. ट्रेडिंग इंडिकेटर हे फक्त हुमून कॅल्कलुशन कमी करतात आणि ते फक्त मार्केटचा व्हीव सांगतात.
  3. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते वेळी अनेक ट्रेडर हे इंडिकेटरच्या आधारावर ट्रेड घेतात, ज्याला आपण इंडिकेटबेस ट्रेडिंग असे म्हणतो. इंडिकेटबेस ट्रेडिंग केल्यामुळे अनेकदा फॉल सिग्नल मिळतात, त्यामुळे ट्रेड चुकीच्या मार्गाने जाऊन लॉस होण्याचे चान्स असतात. इंडिकेटर हे ट्रेड घेण्यास पूर्णपणे सक्षम नसतात.
  4. शेअर मार्केटमध्ये लॅगिंग इंडिकेटरमुळे आपल्याला ट्रेडचे संकेत म्हणजे सिग्नल उशिरा मिळतात. त्यामुळे चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी इंट्री मिळते त्यामुळे लॉस होण्याची संभावना जास्त असते.
  5. एखादा ट्रेडर ट्रेडिंग इंडिकेटरवर डिपेंडेंशी म्हणजे अवलंबून राहिला तर तो नेहमी प्रॉफिट मध्ये राहत नाही.  तो ट्रेडर ट्रेडिंग सायकॉलॉजी वाढवण्यास व ट्रेडिंग सायकॉलॉजी सुधारण्यास व आपले माइंडसेट मजबूत करण्यास प्रयत्न करत नाही. टेक्निकल एनालिसिस शिकण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला असे वाटते कि मला एक असे इंडिकेटर मिळावे कि इंडिकेटर Buy चे सिग्नल दिले कि Buy करावे आणि इंडिकेटर Sell चे सिग्नल दिले तर मी Sell करावे व मला प्रॉफिट मिळावे अशी ट्रेडरची मानसिकता बनते त्यामुळे इंडिकेटरवर डिपेंड राहणे चुकीचे आहे.

निष्कर्ष :-

शेअर मार्केटमध्ये बहुतेक ट्रेडर ट्रेडिंग करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी चार्ट सोबत ट्रेडिंग इंडिकेटरचा वापर करतात. परंतु ट्रेडिंग इंडिकेटर म्हणजे काय ? ट्रेडिंग इंडिकेटर चा उपयोग कसा करावा ? केव्हा करावा ? कशासाठी करावा ? या सर्व गोष्टीची माहिती असणे खूप गरजेचे आहे. कोणते ट्रेडिंग इंडिकेटर कोणते काम करते ? ते कशासाठी बनवले आहे ? त्या ट्रेडिंग इंडिकेटरचा वापरण्याचा उद्देश काय ? याची सर्व माहित असणे खूप गरजेची आहे. चुकीच्या ठिकाणी चुकीचे इंडिकेटर वापरल्यामुळे ट्रेडिंगमध्ये नुकसान होते. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेडिंग इंडिकेटर हे फक्त कान्फरमेशनसाठी वापरावे ट्रेडच्या सिग्नल म्हणून वापर करू नये. ट्रेडिंग इंडिकेटरचे प्रकार वेगळे तसे त्यांचे कार्य सुद्धा वेगळे असते.

डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

शेअर मार्केटमध्ये लॉंगटर्मसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर गुंतवणुकीसाठी शेअर्स कसा निवडावा या पोस्टला अवश्य भेट द्या.

टेक्निकल इंडिकेटर म्हणजे काय ?

टेक्निकल इंडिकेटर हि डेटा पॉईंटची साखळी असते जी सिक्युरिटीच्या प्राईस डेटावर फॉर्मुला लागू करून मिळवली जाते. म्हणजे प्राईस, स्टक्चर, मोमेंटम व इत्तर डेटा यांचा वापर करून एक प्रकारचे मॅथमेटिकली कॅल्कलुशन करून एक फॉर्मुला बनवला जातो यालाच इंडिकेटर असे म्हणतात.

टेक्निकल इंडिकेटर्सचे दोन प्रकार कोणते?

1. लिडिंग इंडिकेटर (Leading Indicators)
2. लॅगिंग इंडिकेटर (Lagging Indicators)

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!