P/E Ratio समजून घ्या मराठी भाषेत। PE Ratio Meaning in Marathi

5/5 - (6 votes)

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण P/E Ratio म्हणजे काय ?। pe ratio meaning in marathi याची माहिती घेणार आहोत. शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत. परंतु जेव्हा आपण शेअर खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा आपला विचार असतो कि आपण अश्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी, जी कंपनी आपल्याला पुढे भविष्यामध्ये चांगला प्रॉफेट मिळून देईल. काही कंपन्यांच्या शेअरचा प्राईज खूप कमी असतो, काही कंपन्यांच्या शेअरचा प्राईज खूप जास्त असतो, परंतु आपल्याला कंपनीचा शेअर खरेदी करते वेळी म्हणजे कंपनीमध्ये गुंतवणूक करते वेळी आपण खरेदी करत असलेला शेअर स्वस्त मिळत आहे किंवा महाग मिळत आहे हे आपल्याला कंपनीचा P/E Ratio सांगतो.

तसेच एक चांगला इन्व्हेस्टर हा कंपनीचा P/E Ratio न पाहता कोणत्याही कंपनीचा शेअर विकत घेत नाही. शेअर मार्केट मधील फायनान्सियल रेशो पैकी एक महत्वाचा रेशो म्हणजे P/E Ratio. या पोस्टमध्ये आपण P/E Ratio म्हणजे काय ?, pe ratio meaning in marathi, P/E Ratio रेशोचे प्रकार, P/E Ratio रेशो चा उपयोग व इतर अनेक गोष्टीची माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

अनुक्रमणिका

P/E Ratio म्हणजे काय ?। PE Ratio Meaning in Marathi

P/E Ratio म्हणजे Price to Earning Ratio यालाच P/E Ratio, P/E किंवा PER म्हणून देखील ओळखले जाते. ‘P’ म्हणजे share Price व ‘E’ म्हणजे Earning Per Share. कंपनीच्या शेअरची किंमत आणि कंपनी प्रति शेअरवर किती कमाई किंवा नफा मिळवत आहे यांचे एक गुणोत्तर किंवा प्रमाण यालाच P/E रेशो असे म्हणतात. कंपनीचा P/E Ratio आपल्याला हे दर्शवितो कि, कंपनीच्या शेअरची प्राईज हि त्या कंपनीच्या EPS Ratio च्या किती पटीने मार्केटमध्ये ट्रेड करत आहे.

  • कंपनीच्या शेअर प्राईज (P) ला अर्निंग पर शेअर (EPS) (E) ने भाग दिल्यास येणार भागाकार म्हणजे P/E Ratio होय.

P/E Ratio एक लोकप्रिय Valuation Metric आहे. कंपनीचे मूल्यांकन करण्यासाठी किंवा कंपनीच्या शेअरचा प्राईज स्वस्त आहे का महाग आहे हे P/E रेशो सांगतो. कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे का? कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे? हे  P/E रेशोद्वारे कळते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर गुंतवणूकदार हे 1₹ प्रॉफिट मिळवण्यासाठी किती रुपये कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत किंवा इच्छुक आहेत किंवा आपल्याला 1₹ प्रॉफिट मिळवण्यासाठी किती रुपये गुंतवावे लागतील याची माहिती P/E Ratio सांगतो.

उदा. ABC.Ltd कंपनीचा P/E रेशो 10 असा आहे म्हणजे गुंतवणूकदारांना 1₹ नफा मिळवण्यासाठी 10₹ गुंतवावे लागतील म्हणजे दहा पट रक्कम कंपनीमध्ये अगोदर गुंतवावी लागेल किंवा गुंतवणूकदार 1₹ नफा मिळवण्यासाठी 10₹ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत.

आपण एक दुसरे उदाहरण घेऊ ज्यामुळे तुम्हाला P/E Ratio म्हणजे काय ? हे समजण्यास मदत मिळेल.

उदाहरणार्थ :-

एक A नावाची कंपनी आहे, तिच्या शेअरचा करंट प्राईज 100₹ आहे व कंपनीचा EPS Ratio 20 आहे तेव्हा आपल्याला  कंपनीचा P/E रेशो 5 मिळेल. (100/20 = 5). म्हणजे कंपनीच्या EPS च्या पाच पटीने कंपनीचा शेअर ट्रेड होत आहे. म्हणजे आपल्याला वर्षाकाठी 1₹ कमाई मिळण्यासाठी आपण कंपनीला 5₹ देत आहोत किंवा गुंतवणूकदार 5₹ देण्यास इच्छुक आहेत. म्हणजे कंपनीमध्ये शेअर खरेदी करून जर आपण 100₹ गुंतवणूक केली तर आपल्याला वर्षाकाठी 20₹ कमाई मिळेल.

तेव्हा आपल्याला प्रश्न पडला असेल कि पाच पटीने जास्त पैसे कंपनीला देण्याची गरज काय ? त्याचे कारण असे कि, आपल्याला फक्त एकदाच 5₹ देण्याची म्हणजे गुंतवणूक करण्याची गरज आहे आणि आपल्याला लाईफ टाईम वर्षाकाठी 1₹ अर्निग मिळत राहील. जेव्हा आपण एक शेअर खरेदी करतो तेव्हा आपण एका शेअरची अर्निग म्हणजे EPS च्या किती पटीने शेअर खरेदी करतो यालाच आपण P/E रेशो असे म्हणतात.

P/E रेशोचा फॉर्मुला |P/E ratio formula

पीई रेशोचा फॉर्मुला म्हणजे पीई रेशो काढण्याचे सूत्र कोणते आहे? पीई रेशोचा फॉर्मुला खालील प्रमाणे आहे.

पीई रेशो = एका शेअरची चालू बाजारातील किंमत / प्रति शेअर कमाई 

P/E Ratio = Current market price of one share / Earning per share

PE Ratio Formula
PE Ratio Formula

P/E रेशो चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यासोबत EPS Ratio सुद्धा समजणे खूप गरजेचे आहे.

P/E रेशोचे कॅल्क्युलेशन कसे करावा ?। how to calculation PE ratio

पीई रेशोचे कॅल्क्युलेशन हे वरील फॉर्मुल्याप्रमाणे कंपनीचा चालू असलेल्या शेअर प्राईजला त्याच्या ईपीएस ने भाग दिला तर आपल्या त्या कंपनीचा पीई रेशो मिळतो. खालील उदाहरणाच्या माध्यमाने आपण पीई रेशोचे कॅल्क्युलेशन कसे करावे हे समजून घेऊ.

उदाहरणार्थ :-

समजा एखाद्या कंपनीचा शेअर प्राईज हा 100₹ आहे आणि EPS हा 4 आहे तर त्या कंपनीचा P/E Ratio काय असेल?

100/4 = 25

[येथे 100 हा कंपनीचा शेअर प्राईज आहे, 4 हा त्याचा ईपीएस आहे आणि 25 हा त्या कंपनीचा P/E Ratio आहे.]

वरील उदाहरणावरून आपल्याला हे समजले असेल कि पीई रेशोच्या फॉर्मुल्याचा वापर करून पीई रेशोचे कॅल्क्युलेशन कसे करावे.

P/E रेशोचे प्रकार । types of P/E ratios

P/E रेशोचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. हे दोन्ही प्रकार कंपनीच्या उत्पनाच्या स्वरूपावर अवलंबून असतात.

1] फॉरवर्ड पीई रेशो । forward P/E ratio

फॉरवर्ड पीई रेशो या रेशोच्या नावावरूच आपल्याला समजते कि, फॉरवर्ड पीई रेशो म्हणजे पुढील भविष्यातील रेशो. म्हणजे कंपनीच्या भविष्यातील कमाईच्या अंदाजाच्या आधारावर हा फॉरवर्ड पीई रेशो काढला जातो. कंपनीच्या करंट शेअर प्राईजला कंपनीच्या अंदाजे भविष्यातील एका शेअर मागे असलेल्या कमाईने म्हणजे इस्टमेंट ईपीएसने भाग देऊन फॉरवर्ड पीई रेशो काढला जातो.

आपल्याला प्रश्न पडला असेल कि Estimated EPS म्हणजे काय? Estimated EPS म्हणजेच forward EPS हा EPS Ratio (Earnings Per Share) चाच एक प्रकार आहे. Estimated EPS किंवा forward EPS म्हणजे पुढील वर्षी कंपनी एका शेअर मागे किती कमाई करेल याचे काढलेले अनुमान यालाच आपण Estimated EPS किंवा forward EPS असे म्हणतात.

कोणत्याही कंपनीचा forward EPS काढण्यासाठी पुढील सूत्र म्हणजे फॉर्मुला वापरावा लागेल. Forward EPS = Projected Earnings for the next year / Number of shares outstanding म्हणजे कंपनीची पुढील वर्षासाठी अंदाजित कमाईला कंपनीच्या एकूण शेअर्स ने भाग दयावा लागेल तेव्हा आपल्याला forward EPS मिळेल.

फॉरवर्ड पीई रेशो हा इतका विश्वसनीय नसतो कारण यामध्ये कंपनीची अंदाजे वाढ व अंदाजे कमाई वापरली जाते.

  • Formula : Forward P/E Ratio = Current Market Price per Share / Estimated Earnings per Share (EPS)

2] ट्रैलिंग पीई रेशो । trailing P/E ratio

ट्रैलिंग पीई रेशो हा कंपनीच्या मागील कमाईच्या आधारावर काढला जातो. हा पीई रेशो अचूक असून कंपनीची वास्तविक स्थिती दर्शविते. कंपनीच्या सद्याच्या प्राईजला मागील बारा महिन्यात त्या कंपनीने एका शेअर मागे किती कमाई केली म्हणजे हिस्ट्रोरिकल ईपीएस ने भाग दिला जाऊन ट्रैलिंग पीई रेशो काढला जातो. ट्रैलिंग पीई रेशो ला Reverse P/E Ratio किंवा TTM (Trailing Twelve Months) या नावाने सुद्धा ओळखले जाते.

  • Formula : Trailing P/E Ratio = Current Market Price / Historical Earnings per Share (EPS)

शेअर मार्केटमध्ये पीई रेशो का महत्वाचा असतो । Why PE ratio is Important in share market

  1. शेअर मार्केटमध्ये पीई रेशोला खूप महत्व आहे. एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर हा ट्रेडिंगसाठी किंवा लॉंगटर्म गुंतवणुकीसाठी शेअर खरेदी करण्याच्या वेळी त्या कंपनीच्या शेअरचा पीई रेशो हमखास पाहतो.
  2. शेअर मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीच्या स्टॉकचा एनालिसिस करतेवेळी P/E Ratio या फायनान्सियल रेशोला खूप महत्व आहे. कोणत्याही एका विशिस्ट इंडस्ट्री किंवा सेक्टरमध्ये कोणत्या कंपनीचे शेअर महाग आहे व कोणत्या कंपनीचे शेअर स्वस्त आहेत, हे P/E Ratio मुळे कळते.
  3. जेव्हा आपण एकाच सेक्टरमधील दोन कंपनीची तुलना करत असताना किंवा त्या दोन्ही कंपनीचा एनालिसिस करत असताना सर्व पॅरामीटर जर सारखेच आढळले तर त्या दोन्ही कंपनीचा P/E Ratio पाहून हे आपण ठरऊ शकतो कि, कोणात्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास आपल्याला जास्त व्हॅल्यू (मूल्य) मिळेल.
  4. P/E Ratio मुळे कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करत आहे त्या सेक्टरचा P/E Ratio व कंपनीचा P/E Ratio ची तुलना केल्यास कंपनी भविष्यात किंवा वर्तमान परिस्तीमध्ये कंपनी ग्रो करत आहे का ? हे पाहण्यास मदत मिळते.
  5. P/E Ratio मुळे कंपनी अंडरव्हॅल्यू आहे का ? कंपनी ओव्हरव्हॅल्यूड आहे हे समजते.

पीई रेशोचा उपयोग कसा करावा ? । how to use P/E ratio?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा व्यक्ती P/E रेशो का पाहतो ? कारण त्याला कोणत्या कंपनीचा शेअर स्वस्त आहे व कोणत्या कंपनीचा शेअर महाग आहे हे पहावयाचे असते. कारण त्याला कंपनीची Intrinsic value काढावयाची असते. परंतु आपण P/E रेशोचा उपयोग फक्त शेअर खरेदी करते वेळीच करतो असे नाही, तर कोणतीही इन्व्हेस्टमेंट करते वेळी P/E रेशोचा उपयोग करू शकतो.

खालील उदाहरणाच्या आधारे आपल्याला P/E रेशोचा उपयोग केव्हा, कोठे व कसा केला पाहिजे हे समजेल.

उदाहरणार्थ :-

आपल्या शहरामध्ये एक नवीन कॉम्प्लेक्स तयार झाले आहे. ज्यामध्ये दुकान म्हणजे गाळे विक्रीस निघाले आहेत. आपण विचार करतो कि, एक दुकान खरेदी करावे व ते दुकान भाडेतत्वावर दयावे, जेणे करून आपल्याला प्रति महिना इन्कम मिळेल. तेव्हा आपल्याला प्रश्न पडला कि, कोणते दुकान खरेदी करावे ? व किती रुपयांमध्ये खरेदी करावे ? असे कोणते दुकान आहे कि, ते दुकान जर आपण खरेदी केले तर ते आपल्याला महाग पडणार नाही.

तेव्हा आपल्याला कळले कि, काही दुकान आहेत त्याची किंमत 12 लाख रुपये आहे व काही दुकानाची किंमत 15 लाख रुपये आहे. तेव्हा तुम्ही विचार करा कि, तुम्ही कोणते दुकान खरेदी कराल ? 12 लाख रुपयेवाले कि, 15 लाख रुपयेवाले.

तेव्हा तुम्ही विचार कराल कि, 12 लाख रुपये किमतीचे दुकान स्वस्त आहे, आणि 15 लाख रुपये किमतीचे दुकान महाग आहे. कारण, 15 लाख रुपये किमतीचे दुकान खरेदी केले तर आपले 3 लाख रुपये अधिक मोजावे लागत आहेत. म्हणजे ते दुकान आपल्याला महाग लागत आहे.

परंतु फक्त प्राईज पाहून इन्व्हेस्टमेंट करावयाची नसते. प्राईज सोबत अर्निंग सुद्धा पहावी लागते. तसेच कोणत्या कंपनीच्या शेअरचा प्राईज पाहून इन्व्हेस्टमेंट करावयाची नसते तर कंपनीची अर्निंग सुद्धा पहावी लागते.

अश्या परिस्थितीमध्ये आपल्याला P/E रेशो उपयोगी पडतो. जो कि, आपल्याला बरोबर निर्णय घेण्यास मदत करतो. आता आपण 12 लाख रुपये किमतीचे व 15 लाख रुपये किमतीच्या दोन्ही दुकानाचा P/E रेशो काढू. 12 लाख रुपये किमतीच्या दुकानाला नाव देऊ आपण X व 15 लाख रुपये किमतीच्या दुकानाला नाव देऊ आपण Y.

X नावाच्या दुकानाची किंमत 12 लाख रुपये व तुम्हाला भाडेतत्वावर मासिक महिना 10 हजार रुपये मिळणार आहेत तेव्हा P/E रेशोच्या फॉर्म्युल्यानुसार त्याचा P/E रेशो होईल.

12 लाख रुपये / 10 हजार रुपये = 120

(12 लाख रुपये दुकान X ची किंमत, 10 हजार रुपये दुकान X ची कमाई व 120 हा दुकान X चा P/E रेशो आहे.)

Y नावाच्या दुकानाची किंमत 15 लाख रुपये व तुम्हाला भाडेतत्वावर मासिक महिना 15 हजार मिळणार आहेत. तेव्हा P/E रेशोच्या फॉर्म्युल्यानुसार त्याचा P/E रेशो होईल.

15 लाख रुपये / 15 हजार रुपये = 100

(15 लाख रुपये दुकान Y ची किंमत, 15 हजार रुपये दुकान Y ची कमाई व 100 हा दुकान Y चा P/E रेशो आहे.)

म्हणजे दुकान X ज्याचा P/E रेशो 120 व दुकान Y ज्याचा P/E रेशो 100 आहे. तेव्हा दुकान Y चा P/E रेशो 100 आहे जो कि दुकान X च्या 120 P/E रेशो पेक्षा कमी आहे. म्हणजे दुकान Y हि स्वस्त आहे व दुकान X हि महाग आहे.

आपण जर फक्त दुकानाच्या प्राईजला पाहून डिसिजन घेतले असते तर आपला बेत फसला असता.😀

वरील उदाहरणावरून आपल्याला हे कळाले कि फक्त कंपनीच्या शेअरचा प्राईज पाहून गुंतवणूक करावयाची नसते तर त्या कंपनीची अर्निंग सुद्धा पहावी लागते व P/E रेशोचा उपयोग फक्त स्वस्त शेअर खरेदी करण्याच्या जागी एक व्हॅल्यू स्टॉक शोधण्यास त्याचा उपयोग केला जातो.

महत्वाच्या काही गोष्टी :-

  • कंपनीचा करंट P/E रेशो पहाण्या बरोबर कंपनीची मागील किमान तीन वर्षाची EPS ग्रोथ पण पहिली पाहिजे.
  • तसेच कंपनीचा हिस्टोरिकल P/E पण पाहिला पाहिजे. हिस्टोरिकल P/E ची व करंट P/E ची तुलना करणे आवश्यक आहे.
  • परंतु त्या सोबत कंपनी रेगुलर ग्रोथ करणे आवश्यक आहे.

वरील उदाहरणावरून व माहितीवरून आपल्याला P/E रेशोचा उपयोग कसा करावयाचा आहे हे समजले असेल.

P/E रेशो च्या आधारे कोणता शेअर महाग आहे कि स्वस्त आहे हे कसे कळेल. । how to know which stock is expensive or cheap based on P/E ratio?

खालील उदाहरणावरून आपण समजून घेऊ कि कोणता शेअर स्वस्त आहे व कोणता शेअर महाग.

उदाहरणार्थ :-

एक ABC नावाची कंपनी आहे. त्या कंपनीच्या शेअरचा प्राईज आहे 100₹ रुपये आहे आणि EPS 10 आहे म्हणजे त्या कंपनीचा P/E रेशो होईल

100 कंपनीच्या शेअरचा प्राईज /10 EPS = 10 P/E रेशो.

तेव्हा वरील ABC नावाच्या कंपनीचा P/E रेशो 10 आहे. तर मग हा 10 असलेला P/E रेशो महाग आहे का स्वस्त आहे हे कसे ओळखाल ?

कंपनी ABC चा P/E रेशो महाग आहे का स्वस्त हे ओळखण्यासाठी त्याच कंपनीच्या इंडस्ट्री मधील म्हणजे सेक्टर मधील दुसऱ्या XYZ कंपनीशी तुलना करावी.

समजा तुलना करण्यासाठी घेतलेल्या दुसऱ्या XYZ कंपनीचा शेअर प्राईज 300₹ रुपये व EPS 15 आहे म्हणजे P/E रेशो झाला. 300 / 15 = 20

तसेच कंपनी ABC व कंपनी XYZ ह्या एकाच सेम सेक्टरमधील कंपनी आहेत. परंतु त्या दोन्ही कंपनीच्या सेक्टरचा एव्हरेज P/E रेशो 16 आहे.

वरील दोन्ही कंपन्यांच्या सेक्टरचा एव्हरेज P/E रेशो पहिला असतो आपल्याला लक्षात आले कि, कंपनी ABC चा P/E रेशो 10 आहे. म्हणजे सेक्टरच्या एव्हरेज P/E रेशो पेक्षा कमी आहे. म्हणजे हि कंपनी अंडरव्हॅल्यूड आहे व कंपनी XYZ या कंपनीचा P/E रेशो हा सेक्टरच्या P/E रेशो पेक्षा जास्त आहे म्हणजे कंपनी ओव्हरव्हॅल्यूड आहे.

महत्वाची गोष्ट :-

कोणता शेअर अंडरव्हॅल्यूड आहे म्हणजे तो शेअर चांगला आहे असे नाही. कारण एखादा शेअर ओव्हरव्हॅल्यूड आहे त्या मागचे कारण म्हणजे ती कंपनी खूप जलद गतीने ग्रो करत असेल व गुंतवणूकदारांचा त्या कंपनीवर भरोसा असेल व गुंतणूकदार हायव्हॅल्यूवर सुद्धा त्या कंपनीचे शेअर खरेदी करत असतील.

करंट P/E रेशो व हिस्टोरिकल एव्हरेज P/E रेशो याची तुलना कशी करावी ? । how to compare current P/E ratio and historical average P/E ratio ?

शेअर मार्केटमध्ये एक चांगला व्हॅल्यू स्टॉक शोधताना शेअरच्या करंट P/E रेशोची त्या कंपनीच्या हिस्टोरिकल एव्हरेज P/E रेशोशी तुलना करावी लागते तेव्हा खालील उदाहरणावरून समजून घेऊ कि, करंट P/E रेशोची व हिस्टोरिकल एव्हरेज P/E रेशोशी तुलना कशी करावी ?

उदाहरणार्थ :-

ABC नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचा करंट P/E रेशो 18 आहे आणि त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा एव्हरेज P/E रेशो 24 आहे. तेव्हा आपण म्हणू शकतो कि, ABC कंपनीचा शेअर हा हिस्टोरिकल प्राईज पेक्षा कमी प्राईजवर मिळत आहे. जर कंपनीचा करंट P/E रेशो जर 30 असेल तर आपण असे म्हणू शकतो कि, कंपनीचा शेअर हा हिस्टोरिकल प्राईज पेक्षा जास्त प्राईजने म्हणजे महाग मिळत आहे.

परंतु कंपनीचा करंट P/E रेशो हा हिस्टोरिकल एव्हरेज P/E कमी असेल आणि कंपनीचा बिजनेस हा पहिल्या सारखाच चांगला किंवा त्याहीपेक्षा ग्रो होत असेल किंवा चान्सेस असतील कि कंपनी पुढे चालून ग्रो होईल, कंपनीची अर्निग वाढेल तेव्हा आत्ता असलेल्या करंट P/E रेशोच्या आधारे त्या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हा चांगले डिसिजन असू शकते. परंतु जर हिस्टोरिकल एव्हरेज P/E रेशो पेक्षा करंट P/E रेशो जर जास्त असेल तर एक चांगला इन्व्हेस्टर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यास तयार नसतो किंवा नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात.

तेव्हा आपल्याला कळलेच असेल कि, करंट P/E रेशोची व हिस्टोरिकल एव्हरेज P/E रेशोशी तुलना कशी करावी ?

पीई रेशो पाहून कोणती माहिती मिळते ? 

तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतेल कि, प्रत्येक कंपनीचा P/E रेशो वेगवेगळा असू शकतो मग कंपनीचा P/E रेशो कमी असेल तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का ? किंवा कंपनीचा P/E रेशो जास्त असेल त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी ? हि तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आपण काही कंपन्यांचे उदाहरण घेणार आहोत व त्या सोबत आपल्याला कंपनीचा P/E रेशो पाहून कोणकोणती माहिती मिळते हे पण समजून जाईल. 

उदहारण १ :-

समजा एक A नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे गेली तीन वर्षाचा फायनान्शियल डेटा आपण काढला जो कि खालील प्रमाणे आहे. 

वर्षEPSशेअरची प्राईजP/E रेशो
पहिले वर्ष1212010
दुसरे वर्ष1313010
तिसरे वर्ष1414010
कंपनी A चा फायनान्शियल डेटा

वरील कंपनी A चा फायनान्शियल डेटा पहिला असता, आपल्या हे समजले कि, कंपनीचा EPS हा खूप कमी म्हणजे किमान 10% च्या पटीने वाढत आहे. तसेच प्रत्येक वर्षी कंपनीचा P/E रेशो हा 10 आहे जो कि खूप कमी P/E रेशो आहे असे मानले जाते. त्यामुळे वरील कंपनी A हि Low P/E Low Growth कंपनी आहे असे मानले जाते. 

कंपनीची Growth हि खूप कमी म्हणजे Low Growth आहे. तेव्हा अशा कंपन्याचा प्राईज हा जलद गतीने वाढत नसतो. त्यामुळे त्या कंपनीचा P/E रेशो सुद्धा कमीच असतो. 

आता तुम्ही ठरवा कि वरील A नावाची कंपनीचा P/E रेशो 10 आहे जो कि खूप कमी आहे व कंपनीची ग्रोथ पण कमी आहे. तेव्हा अश्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का  ?

हे पाहण्यासाठी आपण दुसऱ्या कंपनीचे उदहरण घेऊ.

समजा एक B नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे गेली तीन वर्षाचा फायनान्शियल डेटा आपण काढला जो कि खालील प्रमाणे आहे. 

वर्षEPSशेअरची प्राईजP/E रेशो
पहिले वर्ष1015015
दुसरे वर्ष2050025
तिसरे वर्ष40160040
कंपनी B चा फायनान्शियल डेटा

वरील कंपनी B चा फायनान्शियल डेटा पहिला असता, आपल्या हे समजले कि, कंपनीचा EPS हा प्रति वर्षी 100% च्या पटीने वाढत आहे. तसेच कंपनीचे तिसऱ्या वर्षी कंपनीचा P/E रेशो हा 40 आहे जो कि High P/E रेशो आहे. त्यामुळे वरील कंपनी B हि High P/E High Growth कंपनी आहे असे मानले जाते. 

कंपनीचा Growth High असेल तर कंपनीच्या शेअरची प्राईज सुध्दा झपाटयाने वाढते व कंपनीचा EPS सुद्धा जास्त असतो. 

तेव्हा तुम्ही वरील कंपनी A किंवा B या दोन्ही कंपनीपैकी कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कराल?

पहिली कंपनी A हीच P/E रेशो हा खूप कमी म्हणजे 10 आहे, परंतु तिची Growth सुद्धा कमी आहे. हि कंपनी प्रति वर्षी 10% ने ग्रो होत आहे. तसेच 

दुसरी कंपनी B हि 100% च्या पटीने वाढत आहे. त्यामुळे तिचा P/E रेशो जास्त आहे. P/E रेशो जास्त जरी असला तरी कंपनीची Growth पण खूप जास्त आहे. 

कंपनी B हि 100% च्या ऐवजी 50% प्रमाणे ग्रोथ करत राहिली तरी कंपनी चांगलीच म्हणावी व P/E रेशो 40 जरी असला तरी चांगलाच म्हणावा. कंपनी A हि 10% प्रमाणे ग्रोथ करत असेल तर तेव्हा ती कंपनी भविष्यात सुद्धा अशीच ग्रोथ राहील किंवा कंपनी ज्या सेक्टरमधील आहे त्या सेक्टरमध्ये अधीक ग्रोथ होण्याचे चान्सेस खूप कमी असतील. तेव्हा कंपनी B हि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली मानली जाईल.

मित्रांनो वरील दोन्ही कंपन्या जर पहिल्या तर तुम्हाला असे वाटत असेल कि, ज्या कंपनीचा P/E रेशो High असेल अश्याच कंपनीच्या शेअरचा प्राईज खूप जास्त वेगाने वाढतो. त्यामुळे High P/E रेशो कंपनीमध्येच गुंतवणूक करावी, हा मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आपण तेथे एका तिसऱ्या कंपनीचे उदाहरण घेऊ.  

उदाहरण २ :-

समजा एक X नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे गेली तीन वर्षाचा फायनान्शियल डेटा आपण काढला जो कि खालील प्रमाणे आहे. 

वर्षEPSशेअरची प्राईजP/E रेशो
पहिले वर्ष2020010
दुसरे वर्ष1519513
तिसरे वर्ष1018018
कंपनी X चा फायनान्शियल डेटा

वरील कंपनी X चा फायनान्शियल डेटा पहिला असता, आपल्या हे समजले कि, कंपनीचा EPS हा प्रति वर्षी कमी होत आहे व कंपनीच्या शेअरची प्राईज पण कमी होत आहे परंतु कंपनीचा P/E रेशो वाढत आहे.

तेव्हा कंपनी B प्रमाणे जर आपण समजले कि कंपनीचा P/E रेशो वाढत आहे, म्हणजे कंपनी चांगली आहे का ? परंतु असे नाही कंपनी X चा P/E रेशो का वाढत आहे तर कंपनीचा EPS हा कंपनीच्या शेअरच्या प्राईजच्या तुलनेने प्रति वर्षी खूप कमी होत आहे त्यामुळे कंपनी X चा P/E रेशो कमी होण्याच्या ऐवजी P/E रेशो वाढत आहे. तसेच कंपनीचा EPS प्रति वर्षी कमी होत असल्यामुळे कंपनीची शेअरची प्राईज पण कमी होत आहे.

वरील उदाहरणावरुन आपणास असे निदर्शनास आले कि कोणत्याही कंपनीचा P/E रेशो वाढत आहे म्हणजे कंपनी ग्रो करत आहे असे नाही. कारण कंपनी X ची प्रतिवर्षी अर्निंग कमी होत आहे म्हणजे कंपनीची ग्रोथ निगेटिव्ह आहे आणि ज्या कंपनीची ग्रोथ निगेटिव्ह आहे अश्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे बरोबर नाही. 

आपण एक शेवटीचे एका कंपनीचे उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला P/E रेशो चा कन्सेप्ट समजण्यास मदत होईल.

समजा एक Y नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे गेली तीन वर्षाचा फायनान्शियल डेटा आपण काढला जो कि खालील प्रमाणे आहे. 

वर्षEPSशेअरची प्राईजP/E रेशो
पहिले वर्ष2040020
दुसरे वर्ष4040010
तिसरे वर्ष804005
कंपनी Y चा फायनान्शियल डेटा

वरील कंपनी Y चा फायनान्शियल डेटा पहिला असता, आपल्या हे समजले कि, कंपनीचा EPS हा 100% ने वाढत आहे जो कि खूप जास्त आहे, परंतु कंपनीच्या शेअरची प्राईज मध्ये काही बदल झाला नाही त्यामुळे कंपनीच्या P/E रेशो हा वाढण्याच्याऐवजी कमी होत गेला आहे. तेव्हा फक्त P/E रेशो पाहून हे निश्चित करू शकत नाहीत कि कंपनी ग्रो करत नाही परंतु खरे पाहता असे नाही. 

वरील कंपनीची अर्निंग दुपटीने वाढत आहे परंतु कंपनीच्या शेअरचा प्राईज हा प्रति वर्षी सारखाच राहिला त्यामुळे कंपनीचा P/E रेशो हा वाढण्याच्या ऐवजी कमी कमी होत गेला आहे. तेव्हा कंपनीचा P/E रेशो जरी कमी होत राहिला तरी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे चांगले राहील. 

वरील आपण चार वेगवेगळ्या म्हणजे कंपनी A, कंपनी B, कंपनी X व कंपनी Y चे सखोल उदाहरण पाहिले. तेव्हा आपल्याला हे समजले कि जरी कंपन्यांचा P/E रेशो वेगवेगळा असलातरी कोणत्या कंपनीचा P/E रेशो Low असेल तर Low असण्याचे कारण काय ? किंवा जर कोणत्या कंपनीचा P/E रेशो High असेल तर तो High असण्याचे कारण काय ? याचा एनालिसिस करणे खूप गरजेचे असते.

शेअरचा P/E रेशो केव्हा Low होतो व Low होण्याचे कारणे.

शेअर मार्केटमध्ये कंपनीचा P/E रेशो कमी असण्याचे अनेक कारणे असू शकतात जसे की,

1] शेअर अंडरव्हॅल्यूड असणे : कोणत्याही कंपनीचा शेअरचा P/E रेशो कमी जर असेल तर ती कंपनी अंडरव्हॅल्यूड असू शकते आणि ट्रेडरला व इन्वेस्टरला त्या कंपनी विषयी माहितीच नाही. तेव्हा अश्या कंपनीचा P/E रेशो कमी असतो म्हणजे Low असतो.

2] ग्रोथ कमी असणे : कंपनीचा P/E रेशो कमी असण्याचे कारण म्हणजे P/E ची ग्रोथ कमी असू शकते, किंवा कंपनीची ग्रोथ कमी असू शकते, किंवा कंपनी ज्या इंडंस्ट्रीशी संबंधीत आहे त्या इंडस्ट्रीची ग्रोथ कमी असू शकते, किंवा कंपनीवर अतिरिक्त जास्त कर्ज (debt) असल्यामुळे पण P/E रेशो कमी असू शकतो किंवा कंपनीचे प्रॉफिट डिक्लाईन होत असल्यामुळे सुद्धा P/E रेशो कमी असू शकतो.

3] भविष्यात कंपनीच्या ग्रोथची संभावना कमी असणे : कंपनी अश्या इंडंस्ट्रीशी संबंधीत असेल ज्या इंडंस्ट्री मध्ये पुढे भविष्यात ग्रोथ होण्याची जास्त संभावना नसते अश्या कंपनीचा P/E रेशो कमी असू शकतो. उदा. कापड उद्योग ज्यामध्ये कंपनी 5% ते 10% ने ग्रोथ होत असते. इन्व्हेस्टरला कंपनीच्या Future Performance वर भरोसा नसतो अश्या परीस्तीमध्ये सुद्धा कंपनीचा P/E रेशो कमी असू शकतो.

वाचा : स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग कशी सुरु करावी ?

शेअरचा P/E रेशो केव्हा High होतो व High होण्याचे कारणे.

शेअर मार्केटमध्ये कंपनीचा P/E रेशो खूप जास्त असण्याचे अनेक कारणे असू शकतात जसे की,

1] शेअर ओव्हरव्हॅल्यूड असणे : कोणत्याही कंपनीचा शेअरचा P/E रेशो जर खूप जास्त वाढला असेल तर ती कंपनी ओव्हरव्हॅल्यूड झालेली असू शकते. ओव्हरव्हॅल्यूड म्हणजे कंपनीविषयी काही चांगल्या गोष्टी समजल्यामुळे जास्त प्रमाणात इन्व्हेस्टर यांनी त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली असू शकते. 

2] कंपनीची High Growth असणे : कंपनीची ग्रोथ खूप जास्त असल्यामुळे सुद्धा  P/E रेशो High असू शकतो.

3] भविष्यात कंपनीची ग्रोथ होण्याची जास्त संभावना असणे : एखादी कंपनी अश्या इंडंस्ट्रीशी संबंधीत आहे कि, भविष्यामध्ये त्या इंडंस्ट्रीला खूप महत्व येणार आहे. तसेच भविष्यामध्ये त्या इंडंस्ट्रीचे डिमांड खूप वाढणार आहे. उदा. इलेक्ट्रिक वाहन याची दिवसेंदिवस डिमांड खूप वाढेल व अश्या इंडंस्ट्रीचा व इंडंस्ट्री मधील कंपन्यांचा P/E रेशो वाढलेला आपल्याला दिसेल.

P/E रेशो विषयी काही महत्वाचे पॉईंट.। some important points about P/E ratio.

1] शेअर मार्केटमध्ये असे निदर्शनास आले आहे कि, ज्या कंपनीचा P/E रेशो जास्त असेल त्या कंपनीची ग्रोथ पण जास्त असते व ज्या कंपन्यांचा P/E रेशो कमी असेल त्या कंपन्यांची ग्रोथ कमी असते.

2] जेव्हा एकाद्या कंपनीची ग्रोथ खूप जास्त असते परंतु तिचा P/E रेशो काही कारणास्तव कमी होतो त्या स्टॉकला आपण व्हॅल्यू स्टॉक असे म्हणतो तेव्हा हुशार इन्व्हेस्टर अश्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्ये देतात.

3] तसेच ज्या कंपन्याची ग्रोथ कमी आहे किंवा ग्रोथ मेडीयम आहे परंतु त्या कंपनीचा P/E रेशो खूप वाढलेला असेल अश्या स्टॉकला ओव्हरव्हॅल्यूड स्टॉक मानला जातो व गुंतवणूकदार अश्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक नसतात.

4] परंतु जर दोन कंपन्या आहेत आणि त्या एकाच इंडस्ट्री मधील असतील आणि त्यांची ग्रोथ पण सारखीच असेल तेव्हा ज्या कंपनीचा P/E रेशो कमी असले त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे चांगले.

5] तसेच आपण जेव्हा Low P/E रेशो पाहून गुंतवणूक करतो कारण आपल्याला व्हॅल्यू इन्वेस्टींग करावयाची असते तेव्हा ती कंपनी किती जलद गतीने ग्रोथ करत आहे हे पाहणे पण खूप महत्वाचे असते. 

6] ज्या कंपनीचा P/E रेशो कमी असेल तेव्हा खूप जास्त चान्सेस आहेत कि, ती कंपनी जास्त गतीने ग्रोथ करत नसेल त्यामुळेच मार्केटने त्या कंपनीचा P/E रेशो हा कमी ठेवलेला आहे. 

7] तसेच दुसरी अशी कंपनी आहे कि तिचा P/E रेशो खूप जास्त आहे असे मानून आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत परंतु हि आपली चूक ठरू शकते कारण जर ती कंपनी नवनवीन इनोव्हेशन करत असेल आणि तिची ग्रोथ पण झपाट्याने वाढत असेल तर पहिल्या कंपनीच्या मानाने अश्याच कंपनीमध्ये गुंतवणुक करणे हा एक चांगला निर्णय ठरू शकतो. 

8] कंपनीचा P/E रेशो खूप जास्त आहे हे पाहून आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत नाहीत, कारण त्या कंपनीचा P/E रेशो High असतो परंतु जर त्या कंपनीचे प्रॉफिट खूप वाढत आहे, कंपनी नवनवीन इन्व्हेशन करत आहे कंपनीची अर्निग पण झपाट्याने वाढत आहे तेव्हा अश्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे चांगले कारण High P/E रेशो High ग्रोथ.

9] तसेच जर आपण Low P/E रेशो असणाऱ्या कंपन्यांच्या मागे लागलात तर अशी कंपनी बंद पडणारी पण असू शकते किंवा बँक करप्ट पण असू शकते. त्यामुळेच तिचा P/E रेशो कमी असतो ना.

10] तसेच फक्त P/E रेशो पाहूनच शेअर खरेदी करू नये कारण P/E रेशो हा फंडामेंटल एनालिसिसचा एक छोटासा भाग आहे परिपूर्ण स्टॉकचा एनालिसिस करूनच शेअर खरेदी करावा. कारण कोणतीही वस्तू स्वस्त आहे म्हणजे चांगलीच आहे असे नाही. 

कोणत्याही दोन कंपन्याची तुलना करत असताना दोन्ही कंपन्या ह्या सेम इंडस्ट्री मधील असाव्यात. उदा. जर एक कंपनी फार्मा सेक्टर मधील असेल तरी तुलना करत असताना दुसरी कंपनी सुद्धा फार्मा सेक्टर मधीलच असावी. कंपनीचा P/E रेशो कमी आहे का ? जास्त आहे ? हे पण पाहावे. तसेच कंपनीची ग्रोथ हि टेम्परवारी आहे का सस्टेनिबल ग्रोथ आहे हे पण पहावे. कंपनीची डिमांड भविष्यामध्ये वाढणार आहे का हे पण पहावे. तसेच त्याच कंपनीच्या कॉम्पिटेटर कंपनीचा पण एनालिसिस करावा.

निष्कर्ष :-

वरील माहितीच्या आधारे असा निष्कर्ष लागतो कि, P/E रेशो अतिशय महत्वाचा फाइनेंसियल रेशो आहे. तसेच P/E रेशो हा फंडामेंटल एनालिसिसचा एक महत्वपूर्ण भाग आहे. कोणत्याही कंपनीचा P/E रेशो पाहण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, जसे कि Tickertape.in या वेबसाईट वर आपण वेगवेगळ्या कंपनीची माहिती व P/E रेशो पाहू शकतो. 

डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

शेअर मार्केटमध्ये लॉंगटर्मसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर गुंतवणुकीसाठी शेअर्स कसा निवडावा या पोस्टला अवश्य भेट द्या.

FAQ :-

P/E रेशो म्हणजे काय ?

कंपनीच्या शेअरची किंमत आणि कंपनी प्रति शेअरवर किती कमाई किंवा नफा मिळवत आहे यांचे एक गुणोत्तर किंवा प्रमाण यालाच P/E रेशो असे म्हणतात.

P/E रेशोचा फॉर्मुला ?

पीई रेशो = एका शेअरची चालू बाजारातील किंमत / प्रति शेअर कमाई.
P/E Ratio = Current market price of one share / Earning per share

P/E रेशो म्हणजे काय ?

कंपनीच्या शेअर प्राईज (P) ला अर्निंग पर शेअर (EPS) (E) ने भाग दिल्यास येणार भागाकार म्हणजे P/E Ratio होय.

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!