RSI इंडिकेटर : माहिती, वापर, फायदे । RSI indicator information in Marathi

5/5 - (2 votes)

(Relative Strength Index) RSI इंडिकेटर म्हणजे काय ? (RSI Indicator in Marathi) व RSI इंडिकेटरची माहिती (RSI indicator information in Marathi) 

स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकचा एनालिसिस करण्यासाठी अनेक इंडिकेटर उपलब्ध आहेत. परंतु बहूतांश ट्रेडर स्टॉकचा एनालिसिस करण्यासाठी RSI Indicator चा जास्त वापर करतात. या पोस्टमध्ये आपण RSI इंडिकेटर म्हणजे काय ? (RSI Indicator in Marathi), RSI इंडिकेटर काम कसे करते ?, RSI इंडिकेटरचा फॉर्मुला उदाहरणास, RSI इंडिकेटर चार्ट वर कसे लावावे ? RSI इंडिकेटरचे महत्त्व व मर्यादा आणि RSI इंडिकेटर कसे वापरावे ? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

RSI इंडिकेटरची माहिती । RSI indicator information in Marathi

RSI म्हणजे काय ? । what is RSI ?

RSI म्हणजे Relative Strength Index यालाच आपण मराठीमध्ये “सापेक्ष शक्ती निर्देशांक” असे म्हणतात व Indicator म्हणजे सूचना करणारा “सूचक” जो कि, एका प्रोफेशनल ट्रेडर कडून बनविला जातो. चला तर मग आपण RSI Indicator ची बेसिक माहिती पाहू.👇

RSI इंडिकेटरची बेसिक माहिती । Basics information about RSI indicator

RSI इंडिकेटर हे वेगवेगळ्या मार्केटमध्ये जसे कि, स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केट, कमोडिटी मार्केट किंवा क्रिप्टो मार्केट अशा विविध प्रकारच्या मार्केटमध्ये याचा उपयोग केला जातो. RSI इंडिकेटर “लिडिंग इंडिकेटर” या प्रकारामध्ये मोडते व टेक्निकल एनालिसिस मध्ये वापरला जाणारा एक Momentum oscillator आहे. RSI इंडिकेटरचा अविष्कार J. Welles Wilder यांनी केला. त्यांचे सन 1978 मध्ये प्रकाशित झालेले ‘New Concepts in Technical Trading Systems’ या पुस्तकामध्ये त्यांनी RSI इंडिकेटर विषयी तपशीलवार माहिती दिलेली आहे. 

RSI इंडिकेटर चार्ट वर कसे लावावे ? । how to apply rsi indicator on chart ?

RSI इंडिकेटरला आपण कोणत्याही मार्केटमध्ये आणि कोणत्याही टाईम फ्रेम मध्ये वापरू शकतो. आपण RSI इंडिकेटरला इंट्राडे ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये वापरता येते. RSI इंडिकेटर हे बँक निफ्टी, निफ्टी किंवा कोणत्याही स्टॉकवर वापरता येते. 

त्यासाठी  Tradingview.com हि वेबसाईट वापरली जाते. या वेबसाईट मध्ये अकाउंट तयार करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला ज्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा टेक्निकल एनालिसिस करावयाचा आहे त्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा चार्ट उघडावा आणि नंतर Indicators च्या सेक्शनवर क्लिक करून Search बॉक्स मध्ये RSI टाईप करावे. त्यानंतर पहिल्यांदाच Relative Strength Index दिसेल त्यावर क्लिक करावे, त्यावर क्लिक केल्यानंतर चार्टवर RSI इंडिकेटर लागेल.

इंडिकेटरच्या वर डाव्या बाजूला वर RSI इंडिकेटरचे Settings वर क्लिक करून RSI इंडिकेटरची Settings बदलू शकता. ज्यामध्ये Inputs, Style, Visibility हे तीन वेगवेगळे टॅब दिसतात त्यामध्ये आवश्यकतेनुसार Settings ज्यामध्ये अप्पर बँड, मिडल बँड, लोवर बँड, RSI ची Length, मुविंग एव्हरेज व वेगवेगळ्या ठिकाणी वापरणारे कलर म्हणजे रंग बदलू शकता. परंतु Visibility या टॅब मध्ये कोणताही बदल करू नये. महत्वाचे म्हणजे Inputs मध्ये जाऊन RSI Length च्या खालीच Show Divergence वर क्लिक केल्यास चार्ट मध्ये बनलेले  RSI Divergence इंडिकेटरवर दाखवतात.

RSI इंडिकेटर काम कसे करते ? । how rsi indicator works

RSI इंडिकेटर हे स्टॉकच्या किमतीच्या हालचालीचा वेग (स्पीड-Speed) आणि बदल मोजतो. RSI इंडिकेटर हे स्टॉकची स्ट्रेंथ व विकनेस सांगतो. RSI इंडिकेटरद्वारे मार्केट ओव्हर बॉऊट (Overbought) झोन मध्ये आहे का, ओव्हर सोल्ड (Oversold) झोन मध्ये आहे याची माहिती देतो. RSI 70 च्या वर गेला कि, ओव्हर बॉऊट व RSI 30 च्या खाली गेला कि, ओव्हर सोल्ड आहे असे समजले जाते. RSI इंडिकेटर हे एक मोमेंटम ऑसिलेटर आहे, जो कि एका फिक्स सेटअप व्हॅल्यू (Fix setup Value) किंवा रेंज (range) मध्ये चालतो. RSI इंडिकेटरची रेंज व्हॅल्यू हि 0 ते 100 मध्ये असते. परंतु RSI हा कधीही (0) शून्याच्या खाली जात नाही किंवा कधी (100) शंबरच्या वर जात नाही. RSI indicator information marathi

जर स्टॉकचा Average Gain जास्त असेल  तेव्हा RSI ची व्हॅल्यू वाढलेली असेल व स्टॉकचा Average Loss जास्त असेल तर RSI ची व्हॅल्यू कमी झालेली असेल जर स्टॉकचा Average Gain व Average Loss वाढत नसेल किंवा कमी पण होत नसेल तेव्हा RSI ची व्हॅल्यू मिडल मध्ये असेल. जो कि 70 ते 30 च्या दरम्यान असेल याला आपण मार्केट साईडवेज आहे असे समजतो.

जर स्टॉकच्या प्राईसमध्ये स्ट्रॉंग बेअरीस मोमेंटम असेल तर RSI हा 30,20,10 पर्यंत खाली पण जाऊ शकतो आणि जर स्टॉकच्या प्राईसमध्ये स्ट्रॉंग अप मोमेंटम असेल तर RSI ची व्हॅल्यू 70, 80, 90,100 पर्यन्त पण जाऊ शकते. जे. वेल्स वाइल्डर यांच्या नुसार RSI ची तीन लेव्हल खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे 30 ,50 70

RSI 30 च्या खाली गेल्यास काय समजावे ?। what to understand if RSI goes below 30 ?

जेव्हा RSI हा 30 च्या खाली गेला म्हणजे स्टॉक ओव्हर सोल्ड (Oversold) झोन मध्ये गेला आहे. म्हणजे स्टॉक मध्ये खूप सेलिंग झाली आहे आणि Supply खूप कमी झालेली आहे किंवा संपुष्ठात आली आहे. तेव्हा आता मार्केटमध्ये बुल्सनेस म्हणजेच मार्केटमध्ये स्टॉकची पुन्हा एकदा चांगली खरेदी होऊ शकते म्हणजे मार्केट वर जाऊ शकते असे मानले जाते. परंतु हि अर्धवट माहिती आहे.

कारण RSI हा 30 च्या खाली गेला म्हणजे ओव्हर सोल्ड झोन मध्ये गेला आणि आता मार्केट वर जाणार असे नाही. या बेसवर मार्केटमध्ये ट्रेड घेऊ नये. जेव्हा RSI 30 च्या खाली जाऊन नंतर  30 चे लेव्हल तोडून त्याचा वर मार्केट टिकून राहील व त्या सोबत बुलीस कॅण्डल स्टिक चार्ट पॅटर्न किंवा बुलीस कॅण्डल बनेल तेव्हाच आपण समजावे कि, आता मार्केट ओव्हर सोल्ड झोन मधून बाहेर पडला आहे आणि आता मार्केट वर जाऊ शकते.

RSI 70 च्या वर गेल्यास काय समजावे ?। what to understand if RSI goes above 70 ?

जेव्हा RSI 70 च्या वर गेला म्हणजे स्टॉक ओव्हर बाऊट (Overbought) झोन मध्ये गेला आहे. म्हणजे स्टॉक मध्ये खूप बाईंग झाली आहे आणि Demand खूप कमी झालेली आहे किंवा संपुष्ठात आली आहे. तेव्हा आता मार्केटमध्ये बेरिसनेस म्हणजेच मार्केटमध्ये स्टॉकची पुन्हा एकदा चांगली विक्री होऊ शकते म्हणजे मार्केट खाली येऊ शकते असे मानले जाते. परंतु हि अर्धवट माहिती आहे. 

कारण RSI हा 70 च्या वर गेला म्हणजे ओव्हर बाऊट झोन मध्ये गेला आणि आता मार्केट खाली जाणार असे नाही. या बेसवर मार्केटमध्ये ट्रेड घेऊ नये. जेव्हा RSI 70 च्या वर जाऊन नंतर 70 चे लेव्हल तोडून खाली येईल व मार्केट 70 खाली टिकून राहील व त्या सोबत एखादी बेरीस कॅण्डल स्टिक चार्ट पॅटर्न किंवा बेरीस कॅण्डल बनेल तेव्हाच आपण समजावे कि, आता मार्केट ओव्हर बाऊट झोन मधून बाहेर पडला आहे आणि आता मार्केट बेरीस झाले आहे आता मार्केट खाली येऊ शकते.

एका महत्वाच्या गोष्टीचा येथे उल्लेख करतो ते म्हणजे फक्त RSI च्या बेसवर कोणताही ट्रेड घेऊ नये, RSI हे एक इंडिकेटर आहे, आणि इंडिकेटर फक्त सूचित करतात ते खात्री देत नाहीत आणि आपल्या ट्रेडची खात्री मिळवण्यासाठी त्या सोबत प्राईज एक्शनबुलिश किंवा बेरिश कँडलस्टिक कान्फरमेशन मिळाले तरच ट्रेडची खात्री होते.

मला अशा आहे कि, तुम्हाला RSI इंडिकेटरची माहिती समजली असेल परंतु आपण RSI इंडिकेटरला अधिक जाणून घेण्यासाठी RSI इंडिकेटरचे कॅल्क्युलेशन व फॉर्मुला समजून घेतला पाहिजे तेव्हाच आपल्याला RSI इंडिकेटरचा वापर करण्यास सोपे जाईल.

चला तर मग RSI इंडिकेटरला अधिक जाणून घेऊ.👇

RSI इंडिकेटरचे कॅल्क्युलेशन कसे करावे ? । how to calculate rsi indicator

RSI इंडिकेटरचे कॅल्क्युलेशन कसे करावे हे आपणास समजण्यासाठी आपल्याला अगोदर  RSI इंडिकेटरचा फॉर्मुला समजून घेणे गरजेचे आहे. तेव्हा आपणास 0 ते 100 मध्ये असणारी फिक्स सेटअप व्हॅल्यू किंवा रेंज समजेल. चला तर मग RSI इंडिकेटरचा फॉर्मुला समजून घेऊ.

RSI इंडिकेटरचा फॉर्मुला । rsi indicator formula

RS (Relative Strength ) = Average Gain / Average Loss

वरील फॉर्मुला दिसायला खूप किचकट म्हणजे खूप काठीण आहे असे आपणास वाटेल परंतु तसे नाही वरील फॉर्मुला खूप सोपा आहे. RSI चा फॉर्मुला व RSI चे कॅल्क्युलेशन समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ जेणे करून आपणाला RSI फॉर्मुला वापरून RSI कसे काढतात व RSI चे कॅल्क्युलेशन कसे करतात हे पाहू.👇

RSI चे उदाहरण । Example of RSI

कोणत्याही स्टॉकचा RSI कसा काढावा हे पहाण्यासाठी आपण एका ABC नावाच्या स्टॉकचे उदाहरण घेऊ. परंतु RS किंवा RSI काढण्याअगोदर 14 दिवसांमध्ये स्टॉकने किती Gain व किती Loss केला हे काढावे लागेल. खालील टेबलच्या माध्यमाने आपण एका ABC नावाच्या स्टॉकने 14 दिवसांमध्ये किती Gain व किती Loss केला ते पाहू.👇

14 दिवसामध्ये ABC नावाच्या स्टॉकमध्ये किती Gain व किती Loss झाला याचे केलेले कॅल्युलेशन.

DateClose
(1)
Change
(2)
Gain
(3)
Loss
(4)
02-01-2023280.00
03-01-2023282.50+2.502.500.00
04-01-2023281.31-1.190.001.19
05-01-2023284.22+2.912.910.00
06-01-2023286.00+1.781.780.00
09-01-2023288.12+2.122.120.00
10-01-2023286.00-2.120.002.12
11-01-2023289.13+3.133.130.00
12-01-2023287.50-1.630.001.63
13-01-2023286.41-1.090.001.09
16-01-2023290.00+3.593.590.00
17-01-2023292.30+2.302.300.00
18-01-2023290.40-1.900.001.90
19-01-2023293.22+2.822.820.00
20-01-2023295.25+2.032.030.00
31.1123.187.93
14 दिवसामध्ये किती Gain व किती Loss झाला याची केलेली मांडणी

वरील टेबल वरून आपणास असे दिसून येते कि ABC नावाच्या स्टॉकने 14 दिवसांमध्ये 9 दिवस Gain केला व 5 दिवस Loss केला आहे व Gain 23.18 आहे व Loss 7.93 असा आहे.

आता आपणास ABC नावाच्या स्टॉकचा  Gain 23.18 Loss 7.93 मिळाला.

Average Gain म्हणजे मागील 14 दिवसामध्ये किती वेळा स्टॉकची प्राईस पॉजिटीव्ह मध्ये क्लोज झाली व त्याचे काढलेले  Average व Average Loss म्हणजे मागील 14 दिवसामध्ये किती वेळा स्टॉकची प्राईस निगेटिव्ह मध्ये क्लोज झाली व त्याचे काढलेले Average.

आता Average Gain व Average Loss कसा काढावा हे पाहू. 👇

ABC कंपनीचा 14 दिवसाचे Average Gain : 23.18/14 = 1.65

ABC कंपनीचा 14 दिवसाचे Average Loss : 7.93/14 = 0.56

Average Gain = 1.65

Average Loss = 0.56

वरील प्रमाणे आपणास Average Gain व Average Loss ची संख्या मिळाली आता Average Gain Average Loss यांचा भागाकार करावा आणि जो भागाकार येईल ती संख्या म्हणजे Relative Strength ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये RS असे म्हणतात.

आता आपण मुख्य फॉर्मुल्या मधील RS काढू.

RS = (Average Gain / Average Loss)

RS = (1.65 / 0.56)

RS = 2.94

आता आपणास वरील प्रमाणे RS ची संख्या मिळाली आता आपण मुख्य फॉर्मुल्या मध्ये RS ची संख्या टाकून 0 ते 100 मध्ये मध्ये असणारी फिक्स सेटअप व्हॅल्यू म्हणजे RSI ची रेंज काढूत.

RSI = 100 – 100/(1+RS)

RSI = 100 – 100/(1+2.94)

RSI = 100 – 100/3.94

RSI = 100 – 25.38

RSI = 74.62

या उदाहरणावरून आपण समजू शकतो कि, सध्या परीस्तीमध्ये ABC नावाच्या स्टॉकचा RSI 74.62 आहे जो कि, ओव्हर बॉऊट (Overbought) ची स्थिती दर्शवत आहे.

RSI 14 दिवसाची का आहे ? । why is rsi 14 days ?

वरील उदाहरणामध्ये आपण 14 दिवस घेतलेले आहेत व RSI इंडिकेटर मध्ये डिफॉल्ट पिरेड 14 असतो. परंतु आपल्याला मनामध्ये विचार येत असतील कि RSI इंडिकेटर मध्ये डिफॉल्ट पिरेड 14 का असतो, तर त्याचे कारण असे कि एका महिन्यामध्ये 28 दिवसाचा Lunar Cycle (लुनार सायकल) असतो जो कि पौर्णिमा ते अमावश्या चा असतो.

Half of The Lunar cycle हा 14 दिवसाचा असतो त्यामुळे RSI इंडिकेटर मध्ये 14 दिवसाचा डिफॉल्ट पिरेड वापरला आहे असे मला वाटते. परंतु RSI इंडिकेटर हे Hourly, Daily, Weekly, किंवा Monthly अशा कोणत्याही टाईम फ्रेम मध्ये काम करते. जर आपण ट्रेडिंगचा टाईम फ्रेम Weekly ठेवला तर एक कॅण्डल हि Weekly अशी 14 Weekly कॅण्डल घेऊन RSI मोजला जातो. जर ट्रेडिंग टाईम फ्रेम Hourly घेतला 14 तासाचा पिरेड घेऊन RSI मोजला जातो. परंतु तुम्ही RSI इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये जाऊन डिफॉल्ट पिरेड 14 असतो ते तुमच्या गरजेनुसार बदलू शकतो. परंतु पिरेड 14 हि जास्त ऍक्युरेट रिझल्ट देते असे मानले जाते.

RSI इंडिकेटरचे महत्व । importance of rsi indicator

  • RSI इंडिकेटरमुळे मार्केट ओव्हर बॉऊट (Overbought) आहे का ? ओव्हर सोल्ड (Oversold) आहे ? हे समजते त्यामुळे ट्रेडरला ट्रेड घेण्यास मदत मिळते.
  • RSI इंडिकेटर हे एक मोमेंटम इंडिकेटर असल्यामुळे मार्केटचा मोमेंटम केव्हा बदलेल याचे इंडिकेशन दुसऱ्या इंडिकेटर पेक्षा लवकर देतो.
  • RSI इंडिकेटरमुळे स्टॉकची किंवा मार्केटची मोमेंटम आणि स्ट्रेंथ समजण्यास मदत मिळते.
  • RSI इंडिकेटर हे कोणत्याही मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केट, क्रिप्टो मार्केट, कमोडिटी मार्केट किंवा कोणत्याही इंडेक्सचा टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी वापरला जातो.
  • RSI इंडिकेटर Hourly (तासी), Daily (दैनिक), Weekly (साप्ताहिक), किंवा Monthly (मासिक) अश्या वेगवेळ्या टाईम फ्रेम मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी वापरता येतो.
  • RSI इंडिकेटरने मार्केटमध्ये ट्रेड घेण्यासाठी खूप लवकर इंडिकेशन देतो. परंतु त्यासोबत प्राईज एक्शन (Price Action), कॅन्डलस्टिक पॅटर्न (Candlestick Pattern) किंवा चार्ट पॅटर्न (Chart Pattern) चा वापर करूनच कन्फरमेशन मिळवले जाते.

RSI इंडिकेटर च्या मर्यादा । limitations of the rsi indicator

  • RSI इंडिकेटर हे एखादे फॉल सिग्नल देऊ शकते ज्यामध्ये चुकीची गुंतवणूक किंवा ट्रेड घेऊ शकतो.
  • जेव्हा मार्केटचा स्ट्रॉंग ट्रेंड चालू असतो तेव्हा RSI इंडिकेटर उपयोगी पडत नाही.
  • जेव्हा मार्केट ओव्हर बाऊट (Overbought) झोनमध्ये किंवा ओव्हर सोल्ड (Oversold) झोन जाते तेव्हा RSI जास्त वेळ राहू शकतो तेव्हा ट्रेडरला मार्केटचा मोमेंटम किंवा ट्रेंड ओळखण्यास RSI इंडिकेटर मदत करत नाही.

मित्रांनो मला अशा आहे कि, RSI इंडिकेटर बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

निष्कर्ष :-

शेअर मार्केटमध्ये खूप इंडिकेटर आहेत परंतु, RSI इंडिकेटर हा सर्वात लोकप्रिय इंडिकेटर आहे जे कि, ट्रेडरला किंवा इन्व्हेस्टरला टेक्निकल एनालिसिस करते वेळी ट्रेडिंग डिसिजन घेण्यास व कन्फरमेशन मिळवण्यास मदत करते. RSI इंडिकेटरमुळे मार्केट समजण्यास मदत मिळते. RSI इंडिकेटरचा वापर करून आपण ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मार्केटविषयी किंवा एखाद्या स्टॉक विषयी खूप माहिती मिळवू शकतो. 

डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी किंवा ट्रेड घेते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

धन्यवाद.

FAQ:-

RSI म्हणजे काय ?

RSI म्हणजे Relative Strength Index यालाच आपण मराठीमध्ये “सापेक्ष शक्ती निर्देशांक” असे म्हणतात

RSI मध्ये 14 दिवसाचा डिफॉल्ट पिरेड का वापरला आहे ?

Half of The Lunar cycle हा 14 दिवसाचा असतो त्यामुळे RSI इंडिकेटर मध्ये 14 दिवसाचा डिफॉल्ट पिरेड वापरला आहे असे मला वाटते.

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!