ईपीएस रेशो [EPS Ratio] विषयी माहिती । Earning Per Share in Marathi

4.8/5 - (5 votes)

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण ईपीएस म्हणजे काय ? Earning Per Share in Marathi या विषयी माहिती घेणार आहोत.

तुम्ही EPS किंवा Earning Per Share हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल. या पोस्टमध्ये आपण ईपीएस विषयी सविस्तर माहिती पहाणार आहोत. ईपीएस म्हणजे काय ? ईपीएस कसे कॅल्कुलेट करावे ? ईपीएसचे किती प्रकार आहेत, ईपीएसचा उपयोग कसा करावा ? ईपीएसचा फॉर्मुला आणि शेअर मार्केटमध्ये ईपीएसचे काय महत्व आहे. या विषयी संपूर्ण माहिती पहाणार आहोत. हा पोस्ट तुम्ही पूर्ण वाचा तुम्हाला ईपीएस विषयी संपूर्ण माहिती मिळेल व तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंका दूर होतील.

ईपीएस म्हणजे काय |what is earning per share in marathi

शेअर मार्केटमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक करतेवेळी कंपनी विषयी बऱ्याच गोष्टी पहाव्या लागतात. मार्केटमध्ये गुंतवणूक करते वेळी कोणती कंपनी गुंतवणूक करण्यास चांगली आहे? कोणत्या कंपनीपासून आपल्याला पुढील भविष्यात चांगले प्रॉफिट मिळेल ? याची खातीर जमा गुंतवणूकदार करतो. तेव्हा तो वेगवेगळ्या इंडस्ट्री मधील वेगवेगळ्या कंपन्यांचा फंडामेंटल एनालिसिस करतो. फंडामेंटल एनालिसिस करतेवेळी त्याला वेगवेगळे Financial Ratio पहावे लागतात. EPS हा एक Financial Ratio आहे.

कोणत्याही कंपनीचा EPS रेशो पाहिल्यामुळे गुंतवणूकदारांना प्रति शेअर वर किती कमाई मिळेल जेणेकरून आपण केलेली गुंतवणूक हि किती वर्षांमध्ये दुप्पट होईल याचे अनुमान काढणे सहज शक्य होते. उदा. कंपनी जर एका शेअरवर प्रति वर्षी 20 टक्के प्रॉफिट मिळवून देत असेल तर येत्या पाच वर्षांमध्ये आपली गुंतवणूक दुप्पट होईल.

महत्वाची पोस्ट :- शेअर मार्केटमधील इंडेक्सची माहिती.

EPS किंवा Earning Per Share ज्याला आपण मराठी मध्ये प्रति शेअर कमाई असे म्हणतो. EPS रेशोचा लॉंगफॉर्म आहे, E म्हणजे Earning P म्हणजे Per आणि S म्हणजे Share. यालाच आपण इंग्लिशमध्ये Earning Per Share असे म्हणतो.  EPS असा एक नंबर असतो जो कि कंपनीची अर्निंग पॉवर कशी व किती आहे हे दर्शवते. ईपीएस रेशो आपल्याला कंपनीची Financial स्तिथी दर्शवतो, एखादी कंपनी प्रॉफिट मध्ये आहे का नाही, हे कंपनीच्या ईपीएस रेशो वरून आपणाला कळते.

तुम्हाला पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे ईपीएस म्हणजे काय ? (Earning Per Share in Marathi)-

ईपीएस म्हणजे एका ठराविक कालावधीमध्ये एक कंपनी एका शेअर वर किती कमाई म्हणजे प्रॉफिट मिळवत आहे, म्हणजेच  प्रति एका शेअर वर कंपनीला किती प्रॉफिट मिळत आहे आणि प्रॉफिट दर्शवणाऱ्या नंबरलाच आपण EPS (प्रति शेअर कमाई) किंवा Earning Per Share असे म्हणतो.

वरील माहिती वरून आपल्याला EPS म्हणजे काय ? हे समजले असेल परंतु आपण EPS म्हणजे काय ? हे एका उदाहरणाच्या माध्यमाने समजून घेऊ.

ईपीएस रेशोचे उदाहरण । example of Earning Per Share in marathi

उदाहरणार्थ :

एक ABC.Ltd नावाची कंपनी आहे. ABC.Ltd कंपनीचा एका वर्षाचा Revenue आहे 5,00,000/- (पाच लाख रुपये) आहे. या एका वर्षाच्या Revenue मधून कंपनीचा सर्व खर्च उदा. कंपनीला भरावा लागणारा टॅक्स, इंट्रेस्ट, डिवीडेंट, कंपनी चालवण्यासाठी लागणारा सर्व खर्च वगळून कंपनीचे Net Income 3,00,000/- (तीन लाख रुपये) आहे व कंपनीचे Outstanding Shares आहेत 10,000/- (दहा हजार) आहेत.

  • Net Income – 3,00,000/- / (भागिले) Outstanding Shares – 10,000/- = 30 [EPS]

वरील उदाहरणामध्ये कंपनीचे नेट प्रॉफिट ला कंपनीचे ऑउटस्टँडिंग शेअर्स ने भाग दिला तर येणार भागाकार म्हणजेच कंपनीचा ईपीएस होय. म्हणजेच ABC.Ltd कंपनीचा EPS आहे 30.

परंतु कंपनीचा ईपीएस काढतेवेळी EPS चे कसे कॅल्कुलेट कसे करावे हे पण आपणाला समजले पाहिजे. चला तर मग EPS किंवा Earning Per Share चे कॅल्क्युलेशन कसे करावे ते आपण पाहू.

ईपीएस रेशो कसा कॅल्कुलेट करावा । how to calculate earning per share

आपणाला वरील उदाहरणावरून EPS म्हणजे काय आहे ? हे समजले असेल. आता आपण EPS रेशो कसा कॅल्कुलेट करावा हे आपण पाहू त्यासाठी आपणाला सूत्राची म्हणजे फॉर्मुल्याची गरज लागेल –

कोणत्याही कंपनीचा EPS काढण्यासाठी फॉर्मुला लागतो तो पुढील प्रमाणे  –

ईपीएस रेशो चा फॉर्मुला । EPS Ratio Formula

  • EPS = Net Profit – Preferred Dividends / Average Number of outstanding shares

EPS काढण्यासाठी वरील फॉर्मुला वापरतात. चला तर मग या फॉर्मुल्याचा वापर करून आपण EPS रेशो कसा कॅल्कुलेट करावा हे पाहू.

समजा, सन – 2023 मध्ये कंपनी XYZ.Ltd चे नेट प्रॉफिट हे 50 करोड रुपये झाले, आणि कंपनीने 5 करोड रुपयाचे Preferred Dividends वाटप केले तसेच कंपनीचे आऊटस्टँडिंग शेअर हे 5 करोड आहेत.

तेव्हा वरील माहिती घेऊन व फॉर्मुल्याचा वापर करून कंपनीचा EPS झाला –

EPS = 50 करोड – 5 करोड / 5 करोड = 9 रुपये

परंतु आपणाला येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, कोणत्याही कंपनीला Preferred Dividends देणे कम्पलसरी नसते. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या त्यांना मिळालेल्या प्रॉफिट मधील काही हिस्सा डिविडेंड (लाभांश) स्वरूपात शेअर धारकांमध्ये वाटप करतात, परंतु काही कंपन्या मिळाले प्रॉफिट हे कंपनीच्या ग्रोथसाठी खर्च करण्यास इच्छुक असतात, त्यामुळे प्रत्येक कंपनी Preferred Dividends देत नाही.

तेव्हा कंपनी जर Preferred Dividends देत नसेल अशा परीस्तीमध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिट ला कंपनीचे आऊटस्टँडिंग शेअरने भाग द्यावा लागतो.

जसे कि,

EPS = Net Profit / outstanding shares

तेव्हा वरील फॉर्मुल्यानुसार कंपनीला जर Preferred Dividends वाटप करावयाचा नसेल तर तेव्हा त्या कंपनीचा EPS हा खालील प्रमाणे निघेल.

EPS = 50 करोड / 5 करोड = 10 रुपये

तेव्हा आपण फॉर्मुल्याचा वापर करून कंपनीचा EPS कसा कॅल्कुलेट करावयाचा हे आपण पहिले.

आता आपण कंपनीचा EPS केंव्हा वाढतो व केंव्हा कमी होतो हे आपण पाहू.

EPS रेशो कसा वाढतो ? कसा कमी होतो ? व त्याचे कारणे । how does EPS ratio increase ? how does it decrease ? and its reasons

जेव्हा आपण EPS चा फॉर्मुला पाहतो तेव्हा आपणाला एक गोष्ट आढळून येते कि, कोणत्याही कंपनीचा EPS हा त्या कंपनीच्या आऊटस्टँडिंग शेअरशी विरुद्व संबंध असतो, म्हणजे आऊटस्टँडिंग शेअर वाढले तर EPS कमी होईल व आऊटस्टँडिंग शेअर कमी झाले तर EPS वाढेल.

काही कंपन्या EPS रेशो वाढण्यासाठी मार्केटमधून आपले शेअर बायबॅक करतात ज्यामुळे मार्केटमधील एकूण आऊटस्टँडिंग शेअर कमी होतात. त्यामुळे कंपनीचा EPS रेशो वाढतो. शेअर बायबॅक करणे म्हणजे परत शेअर्सधारकांकडून कंपनी शेअर्स खरेदी करते यालाच शेअर बायबॅक करणे असे म्हणतात. 

एखादी कंपनी आपले शेअर्स बायबॅक का बरे करत असेल ? तर, इन्वेस्टर प्रति शेअर वर चांगले प्रॉफिट मिळवत आहे, हे दाखवण्यासाठी कंपनी आपले शेअर्स बायबॅक करते किंवा कंपनीला वाटले कि आपल्या कंपनीचे शेअर्स खूप Undervalue आहेत तेव्हा पण कंपनी आपले शेअर्स बायबॅक करते किंवा बायबॅक करून राहिलेल्या शेअर्सची value वाढवण्यासाठी पण कंपनी शेअर्स बायबॅक करते.

आता, आपण पहिले कि, कंपनीचा EPS रेशो कसा वाढतो व EPS रेशो वाढण्याचे कारण पहिले. आता आपण पाहणार आहोत कि, कंपनीचा EPS रेशो कमी का होतो ?

काही कंपन्या एम्पलॉयला ESOPs आणि मोठ्या इन्वेस्टरला warrants आणि convertible securities issue करते. जेव्हा  warrants आणि convertible securities ला कॉमन आऊटस्टँडिंग शेअर मध्ये कन्व्हर्ट केले जातात तेव्हा total number of outstanding shares वाढतात त्यामुळे कंपनीचा EPS कमी होतो.

ईपीएस रेशोचे महत्व । importance of EPS ratio in marathi

1. कंपनीमध्ये गुंतवणूक करते वेळी ईपीएस महत्वाचा ठरतो.

एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतेवेळी EPS रेशो महत्वाचा ठरतो. कंपनीच्या EPS मुळे आपल्याला वर्तमान परीस्तीमध्ये किंवा भविष्यामध्ये कंपनीचे उत्पन्न वाढेल किंवा नाही हे समजण्यास मदत मिळते.

जर कंपनी प्रति वर्षी आपला EPS वाढवत असेल तर कंपनीचे प्रॉफिट पण वाढेल व कंपनीचे प्रॉफिट वाढल्यास कंपनी गुंतवणूकदारांना डिवीडेंट पण चांगल्या प्रकारे वाटप करेल. जर कंपनीचा EPS तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा जास्त असेल तर इन्वेस्टरला भविष्यामध्ये चांगले प्रॉफिट होण्याची शक्यता असते. तेव्हा कंपनीमध्ये गुंतवणूक करते वेळी ईपीएस महत्वाचा ठरतो.

2. कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी हे समजण्यास ईपीएस रेशो महत्वाचा ठरतो.

जेव्हा इन्व्हेस्टर एकाच इंडस्ट्रीमधील वेगवेगळ्या कंपन्यांचा फंडामेंटल एनालिसिस करतो. तेव्हा तो इंडस्ट्री सोबत कोणत्या कंपनीचा EPS जास्त व स्थिर आहे किंवा प्रति वर्षी वाढत आहे हे पाहतो. तेव्हा तो प्रत्येक कंपन्यांचा EPS पाहतो. तेव्हा त्याला कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी हे समजण्यास ईपीएस रेशो महत्वाचा ठरतो.

3. कोणत्याही कंपनीचा पीई रेशो काढण्यासाठी ईपीएस रेशो महत्वाचा ठरतो.

एखाद्या कंपनीचा फंडामेंटल एनालिसिस करते वेळी ईपीएस रेशो सोबत त्या कंपनीचा पीई रेशो पण पाहतो. तेव्हा त्या कंपनीचा पीई रेशो काढण्यासाठी कंपनीच्या शेअर प्राईजला त्याच कंपनीच्या ईपीसी ने भाग दिल्यास पीई रेशो मिळतो. तेव्हा कोणत्याही कंपनीचा पीई रेशो काढण्यासाठी ईपीएस रेशो महत्वाचा ठरतो.

ईपीएस चे प्रकार । types of EPS in marathi

EPS चे दोन प्रकार आहेत –

1. Basic EPS

2. Diluted EPS

Basic EPS म्हणजे काय ?

Basic EPS म्हणजे एखादी कंपनी एका वर्षांमध्ये जे नेट प्रॉफिट मिळवते, त्या नेट प्रॉफिटला कंपनीच्या एकूण शेअर्सच्या संख्याने भाग दिल्यास येणार भागाकार म्हणजे Basic EPS होय.

उदाहरणार्थ –

एखादी कंपनी एका वर्षांमध्ये 50 करोड रुपये प्रॉफिट मिळवत असेल आणि Total Number of Shares 5 करोड आहेत. तेव्हा त्याचा Basic EPS होईल –

Basic EPS = Net Profit / Total Number of Shares

बेसिक ईपीएस = 50 करोड / 5 करोड = 10 रुपये

हे कंपनीचे अर्निंग पर शेअर म्हणजेच EPS आहे.

Diluted EPS म्हणजे काय ?

Diluted EPS म्हणजे असा अर्निंग पर शेअर ज्यामध्ये टोटल आऊटस्टँडिंग शेअर सोबत कन्वर्टेबल शेअर्स सुद्धा मिळवले जातात व त्याचा फॉर्मुला होईल –

Diluted EPS = Net Income – Preferred dividend / Average outstanding common shares + convertible shares

उदाहरणार्थ –

समजा एक कंपनी आहे तिची नेट इनकम 50 करोड आहे, तिने 2 करोड रुपयाचे डिविडेंड दिले, तिचे आऊटस्टँडिंग शेअर 5 करोड आणि कन्वर्टेबल शेअर्स 2 करोड तेव्हा त्या कंपनीचा Diluted EPS होईल –

50 करोड – 2 करोड / 5 करोड + 2 करोड = 6.86 रुपये जो कि कंपनीचा Diluted EPS होईल.

मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही कंपनीचा Basic EPS व Diluted EPS पहावयाचा असेल व कंपनीचा फंडामेंटल एनालिसिस करावयाचा असलेलं तर Tickertape.in या वेबसाईटला जरूर भेट द्या.

ईपीएस चा उपयोग । Uses of EPS in Marathi

EPS हा कोणत्याही कंपनीची अर्निंग पॉवर दर्शवते. ज्या कंपनीचा EPS High असतो असाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टर गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात. ज्या कंपनीचा EPS High असेल अशीच कंपनी जास्त प्रॉफेटबल आहे असे इन्व्हेस्टर समजतात आणि कोणत्याही कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यासाठी EPS Ratio आवश्य पाहिला जातो व हा रेशो खूप महत्वाचा पण असतो.

तसेच EPS चा सर्वात जास्त उपयोग हा कोणत्याही कंपनीचा PE Ratio काढण्यासाठी म्हणजेच PE Ratio कॅल्कुलेट करण्यासाठी केला जातो.

संबधीत पोस्ट : P/E Ratio समजून घ्या मराठी भाषेत.

परंतु कोणत्याही कंपनीचा एका वर्षाचा EPS हा त्या कंपनी विषयी अधिक माहिती नाही देऊ शकत कारण कोणती कंपनी एका वर्षांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणाने जास्त प्रॉफिट मिळऊ शकते त्यामुळे त्या कंपनीच्या EPS मध्ये वाढ होऊ शकते. एखाद्या कंपनीचा EPS एका वर्षांमध्ये खूप वाढला म्हणजे पुढे सुद्धा कंपनीचा EPS वाढेल असे नाही. ती कंपनी ज्या इंडस्ट्री मधील आहे त्या इंडस्ट्रीचा सुद्धा EPS पहावा व त्याच इंडस्ट्री मधील दुसऱ्या कंपनीचा EPS सुद्धा पहावा.

तेव्हा कोणत्याही कंपनीचा स्टॉक, गुंतवणुकीसाठी निवडताना त्या कंपनीचा किमान 3 ते 5 वर्षाचा EPS पहाणे खूप महत्वाचे असते. जेव्हा एखादी कंपनी वर्षानुवर्षे आपला EPS वाढवत असेल तर अशी कंपनी इन्वेस्टमेन्टसाठी चांगली कंपनी समजली जाते.

निष्कर्ष :-

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतेवेळी फंडामेंटल एनालिसिस करणे खूप महत्वाचे असते. कंपनी विषयी अधिक माहिती घेणे गरजेचे असतेच परंतु कंपनीचा EPS रेशो सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. जर एखाद्या कंपनीचा EPS हा निगेटिव्ह मध्ये असेल तेव्हा ती कंपनी प्रॉफिटेबल नाही. तेव्हा इन्व्हेस्टमेंट करतेवेळी EPS रेशो पाहूनच इन्व्हेस्टमेंट करावी. तेव्हा EPS रेशो विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली ? स्टॉक निवडण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा पोस्ट तुम्हाला नक्की मदत करेल.

डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

तसेच तुम्हाला फंडामेंटल एनालिसिस विषयी अधिक माहिती हवी असेल तर फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय ? या पोस्टला अवश्य भेट द्या.

धन्यवाद.

FAQ :- 

ईपीएस (Earning Per Share) म्हणजे काय ?

एका ठराविक कालावधीमध्ये एक कंपनी एका शेअर वर किती कमाई म्हणजे प्रॉफिट मिळवत आहे, म्हणजेच  प्रति एका शेअर वर कंपनीला किती प्रॉफिट मिळत आहे आणि प्रॉफिट दर्शवणाऱ्या नंबरलाच आपण EPS (प्रति शेअर कमाई) किंवा Earning Per Share असे म्हणतो.

ईपीएसचे किती प्रकार आहेत ?

EPS चे दोन प्रकार आहेत –
1. Basic EPS
2. Diluted EPS

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!