शेअर मार्केट म्हणजे काय ? । What is Share Market in Marathi

4.4/5 - (9 votes)

या पोस्टमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय ? (what is share market in marathi) शेअर मार्केटची परिपूर्ण माहिती  (Share market Information in marathi) पाहणार आहोत.

स्टॉक मार्केट ज्याला आपण इक्विटी मार्केट किंवा शेअर मार्केट असे सुद्धा म्हणतो. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर शेअर मार्केट, शेअर मार्केटचा इतिहास, एक्सचेंज म्हणजे काय ? शेअर म्हणजे काय ? डिमेट अकाउंट काय असते ? ब्रोकर किती प्रकारचे असतात ? या विषयी पूर्ण माहिती घेणे खूप गरजेचे असते. या पोस्ट मध्ये आपणास शेअर मार्केटची बेसिक माहिती मिळेल. चला तर शेअर मार्केट म्हणजे काय ? हे जाणून घेऊ.👇

शेअर मार्केट म्हणजे काय ? । What is Share Market in Marathi

मित्रानो तुम्ही what is share market, what is stock market, what is equity market असे शब्द तुम्ही सर्च केले असतील आणि तुम्ही गोंदळुन गेला असाल. परंतु या तीनही वाक्याचा अर्थ एकही मानला तरी चालेल.

शेअर मार्केट म्हणजे काय? (what is share market in marathi) तर ज्या मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करणारा व शेअर विक्री करणारा हे दोघे एकत्र येतात व मार्केटच्या ठराविक वेळेत आपल्या शेअरची खरेदी व विक्री करतात यालाच आपण शेअर मार्केट असे म्हणतात.

शेअर मार्केट मध्ये वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज, वेगवेगळ्या कंपन्या, गुंतणूकदार  यांचा समावेश होतो. शेअर मार्केट मध्ये स्टॉकची खरेदी व विक्री होते. यामध्ये प्राथमिक मार्केट (Primary Market) व दुय्यम मार्केट (Secondary Market) असे दोन प्रकार पडतात. प्रायमरी मार्केटमध्ये I.P.O. (Initial Public Offering) चा समावेश होतो आणि सेकंडरी मार्केटमध्ये त्या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग होते.

कंपनी आपले शेअर एक्सचेंजवर सार्वजनिक ऑफर देहून म्हणजेच IPO आणून स्टॉकची  विक्री करून कंपनीसाठी भांडवल उभारते व ती कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते. एखादा शेअर लिस्ट झाला व खरेदी झाली की दुय्यम मार्केट मध्ये स्टॉकची ट्रेडिंग होण्यास सुरवात होते.    

शेअर मार्केट मध्ये दोन शब्द आहेत एक म्हणजे शेअर व दुसरा मार्केट आपण मार्केट विषयी माहिती घेऊ Market म्हणजे बाजार जेथे वस्तू खरेदी व विक्री केल्या जातात आपण आपल्या दैनंदिन जीवनात सराफा मार्केट, भाजीपाला मार्केट असे विविध मार्केट पाहिले असतील व बाजारात गेलेलो पण असाल व शॉपिंग पण केलेली असाल तर मार्केट म्हणजे काय कि विविध वस्तूची खरेदी व विक्री करण्याचे ठिकाण आणि शेअर मार्केट म्हणजे काय तर कंपनीच्या शेअरची खरेदी व विक्री होते ते ठिकाण.

पहिले शेअर हे कागदोपत्री लेखी किंवा प्रिंट करून व्यवहार होत होता परंतु आजच्या इंटरनेट च्या जगात ऑनलाईन डिजिटल स्वरूपात शेअर खरेदी व विक्रीचा व्यवहार होतो. हया लेखात शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. पुढे दिलेली माहिती वाचून तुमच्या मनात शेअर मार्केट विषयी असलेली शंका पूर्णपणे दूर होईल असे मला वाटते.

शेअर मार्केटचा इतिहास । stock market history in india

मित्रानो चला मग शेअर मार्केटचा थोडा इतिहास जाणून घेऊ कारण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीचा इतिहास माहिती असल्याशिवाय इतिहास माणूस घडवू शकत नाही.

सन 1602 मध्ये Dutch East India Company बनवली किंवा अस्तित्वात आली. हया कंपनीचे काम असे होते कि आपल्या जहाजा मधून दुसऱ्या देशांना कापूस, मसाले, सोने आशा विविध वास्तू  Import व Export करत होती आणि खूप नफा कमावत होती.

कोणतीही कंपनी चालवण्यासाठी व वाढवण्यासाठी पैशाची गरज भासते. Dutch East India Company ने काही श्रीमंत लोकांना पैशाच्या बदल्यात कंपनीचे शेअर देण्यास व कंपनीचा भागीदार बनवण्यास सुरुवात केली हा सदरील प्रकार होत होता  Amsterdam येथे.

Dutch East India Company ने नकळत म्हणा Share market ला किंवा IPO ला जन्म दिला आणि जगातील पहिले Stock Market exchange हे  Amsterdam Stock Exchange आहे. आत्ता नाव बद्दले आहे. 

भारतामध्ये मुंबई मध्ये टाऊन हॉल च्या जवळ वडाचे झाडाखाली काही लोकांनी व्यापारी जहाजाचे शेअर खरेदी व विक्री करणे सुरवात केली. शेअर खरेदी विक्री करणारे लोग वाढले. 9 जुलै 1875 रोजी एक व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी एक संघटन बनवले त्याला “Native shares and Brokers Association” असे नाव दिले. पुढे ते Bombay Stock Exchange (BSE) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले.

BSE मध्ये शेअर खरेदी व विक्री साठी खूप वेळ जात होता. खरेदी व विक्री कागदोपत्री होत होती. सन 1992 रोजी शासनाने National Stock Exchange (NSE) ची स्थापना केली. NSE मध्ये आधुनिक कॉम्प्युटर व इंटरनेटचा वापर केल्यामुळे खरेदी व विक्री करणे सोपे झाले.

स्टॉक एक्सचेंज विषयी माहिती । stock exchange in india

भारतामध्ये   BSE व NSE हे सर्वात मोठे Stock Exchange आहेत. भारतात आजूनही दुसरे काही  Stock Exchange आहेत परंतु मुख्य दोनच Stock Exchange आहेत. Stock Exchange म्हणजे जेथे स्टॉकची खरेदी व विक्री केली जाते. Stock Exchange चे प्रमुख काम हे ब्रोकर च्या हस्ते Seller कडून Buyer ला शेअर देणे.

Stock Exchange हे दोघामध्ये माध्यमचे काम करते. आपण याला एक्सचेंज या शब्दावरून समजून घेऊ. एक्सचेंज ज्याला मराठीमध्ये देवाण-घेवाण असे म्हणू शकतो. एक्सचेंज चे काम हे  Buyer व Seller मध्ये देवाणघेवाण घडवून आणणे. 

Stock Exchange हे स्टॉक मध्ये झालेल्या खरेदी व विक्रीचे रेकॉर्ड व त्याची  माहिती शासनाला आणि गुतंवणूकदाराला म्हणजे ट्रेडरला ऐप वेबसाईट द्वारा दिली जाते. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज [BSE]

BSE म्हणजे Bombay Stock Exchange. BSE हे आशिया खंडातील पहिले व जुने Exchange आहे. BSE वर 5000 च्या वर कंपन्या लिस्ट आहेत. BSE चा निर्देशाक (Index) Sensex आहे. जो कि टॉप 30 कंपनीच्या शेअरचा निर्देशाक आहे. Bombay Stock Exchange ची ऑफिशेल वेबसाईट bseindia.com हि आहे.

Bombay Stock Exchange
By BSEINDIA – Own work, CC BY-SA 3.0, BSE

नॅशनल स्टॉक एक्सचेंज [NSE]

NSE म्हणजे National Stock Exchange. NSE मध्ये सर्वात जास्त ट्रेडिंग केली जाते. NSE वर High Liquidity आहे. NSE वर 2000 च्या वर कंपन्या लिस्ट आहेत. NSE निर्देशाक ज्याला आपण Index असे हि म्हणतो Nifty असा आहे. जो कि टॉप 50 कंपनीच्या शेअरचा निर्देशाक आहे. National Stock Exchange ची ऑफिशेल वेबसाईट nseindia.com हि आहे.

National Stock Exchange
By Nsewebmaster – Own work, CC BY-SA 4.0, NSE

सेबी विषयी माहिती । sebi information in marathi

SEBI म्हणजे Security Exchange Board of India याला मराठी मध्ये भारतीय रोखे व विनिमय महामंडळ असे म्हणतात. स्टॉक मार्केटमध्ये नियंत्रण प्रस्तापित करण्यासाठी 12 एप्रिल 1988 रोजी स्थापना करण्यात आली आणि पुढे 30 जानेवारी 1992 रोजी तिला कायदेशीर दर्जा प्राप्त झाला. SEBI चे हेडऑफिस मुंबई इथे आहे. SEBI ची ऑफिशेल वेबसाईट sebi.gov.in हि आहे.

SEBI च्या स्थापने चे मुख्य उद्देश म्हणजे भारतातील Stock Exchange वर नियंत्रन ठेवणे, गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण करने, Stock Exchange वरचा लोकांचा विश्वास वाढावा. तसेच Stock Exchange मध्ये फसवणूक, अवैध व्यवहाराला आळा  घालणे, नवीन नियमावली जाहिर करणे इत्यादी तसेच बरेच काम SEBI ला करावे लागतात. SEBI हि एक स्वतंत्र एजंसी आहे.  

नवीन Stock Exchange स्थापणे बाबत SEBI ची परवानगी घ्यावी लागते. Stock Exchange चे नवीन ब्रोकराना परवानगी देण्याचे काम SEBI चे आहे. तसेच म्युच्युअल फंड वर नियंत्रण ठेवते. नवीन कंपनीला  NSE व BSE या Stock Exchange वर लिस्ट होण्यासाठी पण SEBI ची परवानगी घ्यावी लागते.        

शेअर म्हणजे काय ? । what is share ?

नमस्कार मित्रांनो तुम्ही टी. व्ही., मोबाईल मध्ये  Stock, Share, Equity असे शब्द अनेकदा ऐकले असतील आणि तुमच्या मनात खूप गोंधळ उडाला असेल की, ह्या तीनही शब्दाचा अर्थ काय ? Share म्हणजे Stock आणि Stock म्हणजेच Equity ज्याला आपण मराठीमधे भाग किंवा हिस्सा असे म्हणतो. परंतु तीनही शब्दामध्ये थोडा वेगळेपणा आहे ते मी तुम्हाला सांगतो.

Share म्हणजे कंपनीने आपल्याला दिलेला मालकी हक्कापैकी एक छोटासा भाग एक छोटासा युनिटआहे, जो कि आपल्याला कंपनीचा भागीदार बनवतो. कंपनीने त्यांची  भागीदारी आपल्या सोबत शेअर केली आहे. 

तसेच Stock म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त Share जे कि वेगवेगळ्या कंपनीचे आपण विकत घेतले आणि आपण ते Share आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ठेवले तेव्हा आपण मानतो कि माझ्यापाशी वेगवेगळ्या कंपनीचे Stock आहेत. Stock म्हणजे साठा जे कि आपण साठवून ठेवतो. उदा. आपण घरी किराणा सामानाचा Stock करून ठेवतो. एखादी कंपनी आपल्या मालाचा गोडाऊन मध्ये साठा म्हणजे Stock करून ठेवते.

Equity म्हणजेच Share आणि दोन्ही मिळून जर आपल्यापाशी Equity किंवा Share असेल तर आपल्या जवळ शेअरचा Stock आहे असे आपण मानू. जर आपण काही कंपनीचे शेअर खरेदी केले तर आपण त्या कंपनीचे भागीदार झालोत आपण त्या कंपनीचे किती टक्केवारीचे भागीदार आहोत ते त्या कंपनीचे एकूण शेअरच्या संख्या वर अवलंबून असते.

उदा.  एक XYZ Ltd. कंपनी आहे. तिचे ऐकूण भांडवल 100₹ रुपये आहे आणि त्या कंपनीने 100 शेअर बाजारामध्ये आणले व तुमच्या जवळ XYZ Ltd. कंपनीचे एकूण 5 शेअर आहेत म्हणजे तुम्ही XYZ Ltd. कंपनीचे  5% टक्केचे भागीदार झालात.

शेवटी प्रश्न पडतो कि आपण शेअर घेतल्याने काय फायदा आहे. आपण एखाद्या कंपनीचे काही शेअर 100₹ रुपये बाजारभावाने 100 शेअर विकत घेतले. म्हणजे  100 X 100 = 10000₹ दहा हजार रुपये आपण गुंतवणूक केली आणि त्या शेअर चा बाजार भाव 110₹ रुपये झाला म्हणजे आपल्याला प्रत्येकी एका शेअर माघे 10₹ रुपये चा नफा झाला. म्हणजे 110₹ X 100₹ = 11000₹ अकरा हजार रुपये म्हणजे आपल्याला 1000₹ एक हजार रुपये चा नफा झाला. 

तसेच काही कंपन्या इयरली डिव्हिडंट (लाभांश) शेअर होल्डरला देतात. कंपनीला झालेल्या नफ्यातून काही रक्कम समान  रूपात वाटून आपल्या शेअर होल्डरला दिली जाते. 

डिमॅट अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट । demat and trading account information

मित्रांनो शेअर मार्केट विषयी माहिती आपण घेतली, मग मार्केटमध्ये काम कसे करावे ज्याला आपण ट्रेडिंग करणे किंवा शेअर मार्केटमध्ये  गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट कशी करावी ? या विषयी माहिती घेऊ.

जर कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करावयाचे असतील तर आपल्याला NSE व BSE ह्या दोन स्टॉक एक्सचेंज वरूनच खरेदी करावे लागतात. खरेदी केलेले शेअर्स विक्री करावयाचे असतील तर NSE व BSE ह्या स्टॉक एक्सचेंज वरच विक्री करावे लागतील, दुसरी एक महत्त्वाची माहिती म्हणजे जर आपण NSE या स्टॉक एक्सचेंज वरून शेअर्स खरेदी केले तर ते विक्री सुद्धा NSE या स्टॉक एक्सचेंज वरच करावे लागतील. BSE या स्टॉक एक्सचेंज वरून शेअर्स खरेदी केले तर ते विक्री सुद्धा BSE या स्टॉक एक्सचेंज वरच करावे लागतील.

सन 1996 च्या अगोदर कोणतेही कंपनीचे शेअर्स खरेदी करावयाचे असतील तर NSE किंवा BSE स्टॉक एक्सचेंज म्हणजे मुंबईला जाऊन तिथे ब्रोकरच्या माद्यमाने पैसे देऊन कागदोपत्री शेअर्स खरेदी करावे लागत. मग शासनाने डिमॅट अकाउंट ची सुविधा आणली. डिमॅट अकाउंट हे आपल्या बँकेच्या अकाउंट सारखेच असते ज्यामध्ये गुंतवणूकदार किंवा ट्रेडर आपले शेअर खरेदी करून जमा ठेऊ शकतात. 

परंतु डिमॅट अकाऊंट व ट्रेडिंग अकाउंट जर तयार करायचे असतील तर SEBI ची मान्यताप्राप्त असलेले व NSE व BSE ने मंजुरी दिलेले ब्रोकर यांच्यापासूनच आपले डिमॅट अकाउंट बनवावे लागते.

ब्रोकर दोन प्रकारचे असतात.

1] फुल सर्विस ब्रोकर (full service broker)

फुल सर्विस ब्रोकर आपल्याला ऍडव्हान्स फॅसिलिटी देतात. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीबद्दल, ट्रेडिंग बद्दल टिप्स, ट्रिक्स व सल्ला मिळतो. रिलेशनशिप मॅनेजर ची सुविधा मिळते. ग्राहकांना चांगला सपोर्ट मिळतो. परंतु ब्रोकरेज फिस खुप जास्त असते. 

टॉप 10 फुल सर्विस ब्रोकर (full service broker) :-

ICICIdirectIIFL Securities
HDFC SecuritiesSBI Securities
Kotak SecuritiesAxis Direct
Motilal OswalChoice Brooking
SharekhanReligare
टॉप 10 फुल सर्विस ब्रोकर

2] डिस्काउंट ब्रोकर (discount broker)

डिस्काउंट ब्रोकर (discount broker) कडून आपल्याला ग्राहकांना चांगला सपोर्ट मिळतो. ब्रोकरेज फिस खूप कमी असते. इंट्राडे ट्रेडिंग, F & O मध्ये काम करावयाचे आसल्यास आपल्याला डिस्काउंट ब्रोकर चे अकाउंट उघडणे चांगले आहे.

टॉप 10 डिस्काउंट ब्रोकर (discount broker) :-

ZerodhaAlice Blue
GrowwBajaj Financial
Angel onePaytm Money
UpstoxFyers
5paisaTradingo
टॉप 10 डिस्काउंट ब्रोकर

अकाउंट ओपनींगसाठी लागणारे डॉकमेंट व सूचना

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • सेविंग अकाउंट 
  • आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असावे.
  • आधार कार्ड व पॅन कार्ड वरील नावाची स्पेलिंग व जन्म दिनांक बरोबर असावा.

मित्रांनो आपण खरेदी केलेले शेअर्स डिमॅट अकाउंट मधून NSE किंवा BSE स्टॉक एक्सचेंज वर जाऊन त्यातून खरेदी केलेले  शेअर्स NSDL  किंवा CDSL इथे स्टोर होतात. NSDL व CDSL हे एक डिपॉझटरी आहेत. CDSL हे BSE साठी डिल करतो व NSDL हे NSE साठी डील करतो.

NSDL व CDSL मध्ये आपले शेअर्स स्टोर करण्याचे कारण हेच कि जर आपली ब्रोकर कंपनी बंद पडली किंवा त्या कंपनीचे ब्रोकरची मान्यता रद्द केली तरी त्या ब्रोकर कडून तयार केलेले डिमॅट अकाउंट मधील शेअर्स आपल्याला NSDL व CDSL मधून परत मिळवता येतात. NSDL व CDSL आपल्यासाठी एका तिजोरी सारखे काम करते आणि ते पण फ्री मध्ये. 

निष्कर्ष :-

शेअर मार्केटची संकल्पना खूप जुनी आहे. शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी एक निश्चित वेळेत व्यापार होतो. ट्रेडिंग किंवा गुंतवणूकीसाठी एक डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट ची गरज लागते. अकाउंट बनवण्यासाठी ब्रोकरची आवशक्ता लागते. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे पूर्वीच्या काळापेक्षा खुप सोपे झाले आहे.

डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

टेक्निकल एनालिसिस विषयी अधिक माहितीसाठी टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय या पोस्टला जरूर भेट दया. 

धन्यवाद !

FAQ :-

शेअर मार्केट म्हणजे काय ?

ज्या मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करणारा व शेअर विक्री करणारा हे दोघे एकत्र येतात व मार्केटच्या ठराविक वेळेत आपल्या शेअरची खरेदी व विक्री करतात यालाच आपण शेअर मार्केट असे म्हणतात.

ब्रोकर किती प्रकारचे असतात ?

ब्रोकर दोन प्रकारचे असतात.
1] फुल सर्विस ब्रोकर (Full service broker)
2] डिस्काउंट ब्रोकर (Discount broker)

ब्रोकर म्हणजे काय?

ब्रोकर म्हणजे स्टॉक एक्सेंज व गुंतवणूकदार या दोघांमधील व्यवहार घडवून आणणारा मध्यस्ती.

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!