फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय । What is Fundamental Analysis In Marathi

4.7/5 - (4 votes)

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय ? (what is fundamental analysis in marathi) या विषयी माहिती पाहणार आहोत. 

मित्रानो, या लेखात तुम्हाला fundamental analysis ची संपूर्ण माहिती मिळेल. शेअर मार्केटमध्ये आपणास टेक्निकल एनालिसिस व फंडामेंटल एनालिसिस यांचा वापर करून गुंतवणूक किंवा ट्रेड घेतो. शेअर मार्केटमध्ये कोणी ट्रेडर असू शकतो कोणी इन्व्हेस्टर असू शकतो. शेअर मार्केटमध्ये खूप अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर आपण fundamental analysis चा वापर करतो.

फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय । What is Fundamental Analysis In Marathi

फंडामेंटल एनालिसिस यालाच आपण मराठीमध्ये मूलभूत विश्लेषण असे म्हणतो. फंडामेंटल एनालिसिस म्हणजे कंपनीचे शेअर किंवा स्टॉकची Intrinsic Value काढण्याची एक प्रकीर्या आहे. अशी प्रक्रिया की ज्यामध्ये कंपनीमध्ये अधिक काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी त्या कंपनीची गुणात्मक व परिमाणात्मक लेखी स्वरूपात असलेली माहिती मिळवणे.

कोणत्याही कंपनीची शेअरची किंमत MRP सारखी नसती. शेअरची ची किंमत हि चालू असलेल्या बाजार भावावर अवलंबून असते. फंडामेंटल एनालिसिसचा वापर करून कंपनीचा शेअर ओव्हर व्हॅल्यू मध्ये आहे का अंडर व्हॅल्यू मध्ये आहे हे पाहण्यास मदत मिळते.

कंपनीची Fair Value शेअरच्या चालू असलेला प्राईज पेक्षा जास्त असेल तर शेअर अंडर व्हॅल्यू मध्ये आहे व कंपनीची Fair Value शेअरच्या चालू असलेला प्राईज पेक्षा कमी असेल तर ओव्हर व्हॅल्यू मध्ये आहे असे समजावे.

फंडामेंटल एनालिसिस आपल्याला कोणत्याही कंपनीचे शेअर आपल्याला स्वस्तामध्ये चिप प्राईजवर खरेदी करण्यासाठी मदत करते. यालाच आपण फंडामेंटल एनालिसिस करणे असे म्हटले तरी चालेल. जेणे करून कमीत कमी दरात त्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी व लॉन्ग टर्म इनव्हेसमेंट करण्यासाठी माहिती मिळते.

आपण कळत न कळत का होईना दैनंदिन व्यवहारात कित्येकदा आपण फंडामेंटल एनालिसिस वापर करूनच निर्णय घेतो. उदा. आपल्याला एखादे घर, प्लॉट, शेती खरेदी करावयाची असेल, तर आपण बारीक सारीक गोष्टीची माहिती काढतो. आपण खरेदी करणारी मालमत्ता हि चांगली परिसरात आहे का? आजुबाजुचे रस्ते, मार्केट यांचा विचार करतो.

आपणास सर्व सुविधा म्हणजे वीज कनेक्शन, पाणी, मुलांची शाळा, आपले ऑफिस यांचा पूर्णपणे अभ्यास करतो. नंतरच ती मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करतो.

त्या मालमत्तेचे पुढील भविष्यात किमत वाढेल का ? आपण गुंतवणूक केलेत्या किमतीपेक्षा अधिक किमत वाढेल का ? या सर्व गोष्टीचा विचार करून नंतरच निर्णय घेतो की, ती मालमत्ता आपण किती रुपये मध्ये खरेदी करावी?

हे उदाहरण आपणास देण्यामागचा माझा हेतू हाच आहे की ती मालमत्ता खरेदी करते वेळेस आपण त्या मालमत्तेचा फंडामेंटल एनालिसिस करूच निर्णय घेतो. मग आपण कंपनीमध्ये आपला पैसा गुंतवणूक करताना त्या कंपनीचा फंडामेंटल एनालिसिस का करू नये ?

खूप लोक असे असतात की, एखाद्या कंपनीची चांगली बातमी किंवा लोकांच्या सांगण्यावरून आपण गुंतवणूक करतात आणि नुकसान करून घेतात. वारेन बफेट व भारतातील राकेश झुनझुनवाला हे फंडामेंटल एनालिसिस करूनच कंपनीमध्ये गुंतवणूक करत असत. आपणही फंडामेंटल एनालिसिसचा वापर करून अशा कंपनीमध्ये आपली लॉन्ग टर्म इनव्हेसमेंट करू शकतो जेणे करून भविष्यात पुढे चालून विप्रो, एम.आर.एफ., इन्फोसेस या कंपन्या सारख्या मल्टीब्यागर कंपन्या होतील. 

फंडामेंटल एनालिसिस मध्ये कंपनीच्या प्रोडक्टची कॉलेटी कशी आहे ? कंपनीवर किती कर्ज आहे ? कंपनी किती प्रॉफिटमध्ये आहे ?, कंपनी जी.डी.पी. पेक्षा जास्त ग्रो करत आहे का ? कंपनीचे प्रोडक्ट भविष्यात किती दिवस चालू शकते, कंपनीने  उत्पादन केलेली वस्तू लोकांना गरजेची आहे का ? दिवसेंदिवस प्रोडक्टची गरज लोकांमध्ये वाढेल का ? या सर्व गोष्टीची माहिती  घेणे म्हणजेच त्या कंपनीचा फंडामेंटल एनालिसिस करणे.

वाचा : शेअर मार्केट मधील इंडिकेटर्सची माहिती. 

टेक्निकल एनालिसिस मध्ये कंपनीच्या शेअरचा आपण अभ्यास करतो, परंतु फंडामेंटल एनालिसिसने कंपनीचा अभ्यास करून कंपनीच्या शेअरची Intrinsic Value निश्चित करण्याचा प्रयत्न करतोत.

फंडामेंटल एनालिसिसचे महत्व|importance of fundamental analysis

मित्रांनो फंडामेंटल एनालिसिसमुळे कोणत्याही कंपनीचा शेअर चांगल्या किमतीवर खरेदी करण्यास मदत मिळते. एक गोस्ट महत्वाची आहे की, कोणत्याही शेअरची खरेदी करते वेळेस त्या कंपनीची शेअरची प्राईस बरोबर आहे की नाही याची माहिती घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी फंडामेंटल एनालिसिस आपल्याला मदत करतो.

फंडामेंटल एनालिसिसचे उद्देश|purpose of fundamental analysis

  • कंपनीच्या शेअरची प्राईज भविष्यामध्ये किती वाढेल याचा अनुमान काढणे.
  • कंपनीच्या संपत्तींची माहिती मिळवणे.
  • कंपनी व्यापार कसा करत आहे तिचा परफॉर्मेन्स कसा आहे हे जाणून घेणे.
  • कंपनीचे  शेअर खरेदी करते वेळेस किती जोखीम आहे हे जाणून घेणे.
  • कंपनीचे मॅनेजमेंट कसे आहे, मॅनेजमेंट कसे निर्णय घेत आहे, त्यांचा भविष्या मधला प्लान काय आहे हे जाणून घेणे.
  • कंपनीच्या शेअरची Intrinsic Value काढणे.

बेसिक फंडामेंटल एनालिसिस|basic of fundamental analysis

  • कंपनी किती प्रॉफिट कमावतो कंपनीची इनकम किती आहे याची माहिती घेणे, कारण कंपनीने प्रॉफिट मिळवले तरच आपल्याला प्रॉफिट होईल.
  • प्रत्येक वर्षांला कंपनी किती इनकम मध्ये आहे व इनकमची ग्रोथ कशी आहे याची बारकाईने माहिती घेणे.
  • कंपनीवर किती कर्ज आहे ? हे पाहणे खूप गरजेचे आहे, कंपनीवर जास्त कर्ज असेल आणि कंपनीच्या शेअरची प्राईज खूप वाढलेली असेल तर अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करणे बरोबर नाही.
  • कंपनीचा कॅशफ्लो किती आहे, कंपनी किती खर्च करत आहे याची माहिती घेणे.
  • कंपनीची करंट मार्केट प्राईज हि बुक व्हॅल्यू पर शेअरच्या आसपास असले तर स्टॉक अंडर व्हॅल्यू आहे असे समजावे.

वरील काही बेसिक गोष्टी आहेत ज्याची शेअर खरेदी वेळेस प्राथमिकता देणे गरजेचे असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीची Intrinsic Value मिळवणे आणि ती माहिती करून घ्या की आपण काढलेली Intrinsic Value मार्केटमध्ये बरोबर आहे कि नाही. 

फंडामेंटल एनालिसिसचे प्रकार|types of fundamental analysis

कंपनीचा फंडामेंटल एनालिसिस आपण दोन प्रकारे करू शकतो.

१. Qualitative Analysis (गुणात्मक विश्लेषण )

मित्रांनो Qualitative Analysis मध्ये कंपनीची Quality पहिली जाते. कंपनीच्या गुणात्मक गोष्टीचा अभ्यास केला जातो. यामध्ये कंपनीचे बिजनेस मॉडेल कसे आहे ? कंपनीने बनवलेले प्रोडक्ट कसे आहेत ? कंपनी आपल्या ग्राहकांना सर्विस चांगली देते का ? कंपनीचे असणारे प्रतिस्पर्धी यांच्यापेक्षा कंपनी किती चांगली व किती पुढे आहे.

कंपनीचे मॅनेजमेंट कसे आहे ? कंपनीचे भविष्यातील प्लॅन काय आहेत, ज्यामध्ये कंपनीची प्रगती होईल का ? कंपनीचा ब्रँड कसा आहे ? कंपनीचा ब्रँड लोकांना आकर्षित करतो का ? कंपनी आपल्या बनवलेल्या प्रोडक्टमध्ये रिसर्च करते का ? कंपनी आपल्या प्रोडक्टमध्ये लोकांच्या गरजेनुसार बदल करते का ? अशा प्रकारच्या प्रश्नाच्या आधारावर आपण त्या कंपनी विषयी अधिकाधिक जाणून घेतो.

२. Quantitative Analysis (परिमाणात्मक  विश्लेषण )

मित्रांनो Quantitative Analysis मध्ये आपण कंपनीची अशा प्रकारची माहिती घेतो जी माहिती नंबरच्या स्वरूपात असते त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. कंपनीचे Finance Statement पहिले जाते, ज्यामध्ये कंपनीचे बॅलन्स शिट, इनकम स्टेटमेंट, कॅशफ्लो स्टेटमेंट पहावे लागते. तसेच कंपनीचे Financial Ratio पाहणे खूप गरजेचे आहे. Financial Ratio मुळे कंपनीची Financial Health व प्रॉफिटॅबिलिटी चा अंदाज लागतो. यामध्ये वेगवेगळे  Financial Ratio असतात.

  • Current Ratio :- Total Current Assets / Total Current Liabilities = Current Ratio करंट रेशो हा २ पेक्षा जास्त असेल तर करंट रेशो चांगला आहे असे मानले जाते.
  • EPS Ratio :- (Earnings per share) : Total Earning / Total Number of Share = EPS Ratio. EPS Ratio म्हणजे प्रत्येकी एका शेअर मागे किती प्रॉफिट कमावले. EPS Ratio हा गुंतवणूकदारांचा महत्वाचा व जास्त पसंत करणारा टूल आहे.
  • PE Ratio :- (Price to Earning) : Share Price / Earnings per share = PE Ratio उदा. एखाद्या कंपनीचा PE Ratio २० आहे म्हणजे त्या कंपनीमध्ये १ रु. कमावण्यासाठी २० रु. मार्केटमध्ये गुंतवावे लागतील तेव्हा १ रु.चे प्रॉफिट मिळेल  त्यामुळे PE Ratio जितका कमी असेल तितका चांगला आहे असे मानले जाते.
  • PB Ratio :- (Price to Book) : Share Price / Book Value Per Share = PB Ratio, PB Ratio जितका कमी असेल तितका चांगला आहे असे मानले जाते, PB Ratio जर १ रु. पेक्षा कमी असेल ते त्या कंपनीचे शेअर खूप कमी भावात मिळत आहेत असे समजावे.
  • DE Ratio :-  (Debt to Equity) : Total Debt / Total Shareholders Equity = DE Ratio १ पेक्षा कमी पाहिजे. कंपनीने कर्ज स्वरूपात मिळवलेले पैसे व एकूण शेअर होल्डर कडून Equity देऊन मिळवलेले पैसे याचा रेशो असतो.
  • Interest Coverage Ratio :- Earnings Before Interest and Tax  [EBIT] / Interest Expense = Interest Coverage Ratio. उदा. कंपनीचा Interest Coverage Ratio जर ५ असेल तर कंपनीची कर्ज फेडण्याची ५ पट ताकत आहे.
  • ROE Ratio :- (Return to Equity) : ROE Ratio म्हणजे Equity वर कंपनी किती रिटर्न देत आहे.  १०% Ratio किंवा त्याहीपेक्षा जास्त Ratio हा चांगला मानल्या जातो.
  • ROCE Ratio :-(Return on Capital Employed) : कंपनीने शेअर होल्डर कडून किती फंड उचलेला आहे. कंपनीच्या मॅनेजमेंट यांचा किती फंड आहे. कंपनीने लोन किती घेतले आहे. या सर्वांवर कंपनी किती प्रॉफिट कमवत आहे. किती टक्के रिटन मिळत आहे. १०% Ratio किंवा त्याहीपेक्षा जास्त Ratio हा चांगला मानल्या जातो.
  • Dividend Yield :- Annual Dividend / Stock Price X 100 = Dividend Yield मित्रांनो कंपनी किती टक्के लाभांश देत आहे. याची माहिती मिळते.
  • Book Value :- Total Assets – Total Liabilities = Book value मित्रांनो बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीचे टोटल ऍसेट्स म्हणजे कंपनीची जागा, कंपनीपाशी असलेली सर्व मशिनरी यांच्या एकूण रक्कमे मधून कंपनी वरील कर्ज वजा केले तर आपल्याला कंपनीची Book Value मिळते.
  • Book Value  Per Share :- Book Value / Number of Share = Book Value Per Share मित्रांनो बुक व्हॅल्यू  पर शेअर म्हणजे बुक व्हॅल्यू भागिले एकूण शेअर शेवटी येणार भागाकार म्हणजे बुक व्हॅल्यू पर शेअर उदा. कंपनीची बुक व्हॅल्यू आहे ५०,००,०००/- आणि कंपनीचे एकूण शेअर आहेत १०.०००/- आहेत. ५०,००,०००/- भागिले १०,०००/- भागाकार आला ५००/- कंपनीची बुक व्हॅल्यू पर शेअर ५००/- रुपये.

फंडामेंटल एनालिसिस करण्यासाठी tickertape.in व  Screener.in या वेबसाईटचा वापर करू शकता.

निष्कर्ष :-

शेअरची Intrinsic Value काढणे हि सोपी गोष्ट  नाही, खूप रिसर्च आणि पेशनची गरज लागणे. शेअर खरेदी करणे अगदी सोपे आहे. परंतु शेअर अगदी बरोबर प्राईज वर खरेदी करणे महत्वाचे आहे. फंडामेंटल एनालिसिस हि वेळखाऊ प्रकीर्या आहे परंतु लॉन्ग टर्म इनव्हेसमेंट करण्यासाठी फंडामेंटल एनालिसिस शिवाय पर्याय नाही. 

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजी विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय या पोस्टला जरूर भेट दया. 

धन्यवाद !

FAQ :-

फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय ?

फंडामेंटल एनालिसिस म्हणजे कंपनीचे शेअर किंवा स्टॉकची Intrinsic Value काढण्याची एक प्रकीर्या आहे. अशी प्रक्रिया की ज्यामध्ये कंपनीमध्ये अधिक काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी त्या कंपनीची गुणात्मक व परिमाणात्मक लेखी स्वरूपात असलेली माहिती मिळवणे.

फंडामेंटल एनालिसिसचे प्रकार ?

फंडामेंटल एनालिसिस करण्यासाठी १. Qualitative Analysis (गुणात्मक विश्लेषण ) २. Quantitative Analysis (परिमाणात्मक  विश्लेषण ) या दोन प्रकारचा वापर करतात.

लॉन्ग टर्म इनव्हेसमेंटसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते?

लॉन्ग टर्म इनव्हेसमेंटसाठी स्टॉकची इंट्रिनसिक व्हॅल्यू व पेशन्स खूप महत्वाची गोष्ट आहे.

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!