ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय ? (what is trading psychology in marathi) सर्च करत असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. या लेखात तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय ? या विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे.
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये येणारे खूप ट्रेडर टेक्निकल एनालिसिस, फंडामेंटल एनालिसिस, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट हे सर्वकाही शिकतात परंतु ते शेअर मार्केट मध्ये पैसे घालवतात. ते कुठे ना कुठे ट्रेडिंग सायकोलॉजी समजण्यामध्ये व सुधारण्यामध्ये कमी पडतात. ट्रेडिंग सायकोलॉजी हा शेअर मार्केटचा खुप महत्वाचा भाग आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सायकोलॉजी माहिती करून घेणे, तिला समजणे व ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप करणे खुप महत्वाचे आहे.
मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजी मधील महत्वाचा दुश्मन म्हणजे आपल्या मनातील भीती. तुम्ही कधी ना कधी भय, लालच,दबाव अशा मनातील भावनेला तुम्हाला सामोरे जावेच लागले असेल, एक चांगला ट्रेडर कधीही आपण घेतलेल्या ट्रेंडवर भय, लालच, दबाव किंवा कोणतेही मानसिक स्थितीचा प्रभाव पढू देत नाही. आपण घेतलेल्या निर्णयावर आपल्या भावना, इमोशन यांचा प्रभाव पडू न देणे यालाच आपण ट्रेडिंग सायकोलॉजी सुधारने असे म्हणतात.
ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय ? । What is Trading Psychology in Marathi
मित्रांनो ट्रेडिंग या शब्दाचा अर्थ व्यापार जो की आपण मार्केटमध्ये ट्रेड घेतो व सायकोलॉजी या शब्दाचा मराठीत अर्थ म्हणजे मानसशास्त्र, पण शब्दशः अर्थ न घेता ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये ट्रेडरची मानसिकता (mindset), ट्रेडरचे वागणूक (behavior), ट्रेडरच्या भावना (emotion) यांचे खूप महत्व आहे.
खूप ट्रेडरला ट्रेडिंग करतेवेळी भीती, लालच, पच्छाताप, आनंदी भावना, ओव्हर कॉन्फिडन्ट, राग येणे, मन बेचेन होणे, शंका, सुडबुद्धीची भावना, जास्त आशा म्हणजे जास्त भरोसा बाळगणे, मनात गर्वाची भावना निर्माण होणे. या भावनांमधून प्रत्येक ट्रेडर गेलेलाच असतो. परंतु या भावनांना कंट्रोल करण्याचे काम ट्रेडिंग सायकोलॉजीने केले जाते. ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय ?(what is trading psychology in marathi) ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे ट्रेडरचे Mindset, Behavior व Emotion यावर मिळवलेले नियंत्रण.
आत्मविश्वास असणे हि एक चांगली गोष्ट आहे परंतु भीती, लालच म्हणजेच लोभ या भावना एक चांगल्या ट्रेडरसाठी नुकसानकारक असतात. ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे एका ट्रेडरला ट्रेडिंग करतेवेळी निर्माण होणाऱ्या या सर्व भावनांना नियंत्रित करणे व त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याची एक कला आहे. ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्टअप करून आपण एक यशस्वी व प्रोफीटेबल ट्रेडर बनू शकता. परंतु ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप करणे, आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवणे, आपला माईंडसेट स्ट्रॉंग कसा करावयाचा हे फक्त तुमच्यावर अवलंबून असते.
मित्रांनो जेव्हा आपण एखादे मोबाईलवर गेम खेळतो मग तो कोणताही असो जो कि आपल्याला आवडणारा. तो गेम खेळते वेळी आपल्याला खूप आंनद मिळतो, मन असं तल्लीन होत. पुन्हा-पुन्हा खेळण्याची इच्छा मनात येते. हरलो कि परत खेळतो. म्हणजे गेम खेळण्याची इच्छा खूप वाढते. मग तो गेम असो कि ट्रेडिंग असो.
जेव्हा आपली अशी परिस्थिती असते तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन नावाचा केमिकल खूप वाढतो, त्यामुळे अनपेक्षित आनंदाची अनुभूती होते. मग पुढे चालून आपल्याला सवय लागते. आपण गेम खेळण्याची किंवा ट्रेडिंग करण्याची लत लागते, मित्रांनो आपण ठरवावे कि आपल्याला ट्रेडिंगची लत लागून घ्यावयाची आहे का ? एका प्रोफेशनल ट्रेडरसारखी ट्रेडिंग करायची आहे ? हे सर्वस्वी आपणावर असते.
ट्रेडरला व गुंतवणूकदारांना नेहमी सामोरे जावे लागणाऱ्या भावना व त्यावरील उपाय.
१. भिती (Fear) :- भिती ही एक नॅचरल प्रतिकीर्या आहे. आपल्याला केव्हा भिती वाटते जेव्हा आपण कोणती तरी मोठी रिस्क घेतली आहे. तसेच आपली मार्केटमध्ये गुंतवणूक आहे व एखादी वाईट बातमी येते तेव्हा भिती वाटते. किंवा एखादा ट्रेड घेतला आणि आपल्या मनासारखा जात नाही पैसे जाण्याची भीती निर्माण होते तेव्हा आपण ओव्हररियाक्ट होऊन आपण त्या ट्रेड मधून किंवा आपल्या होल्डिंग मधून बाहेर पडतो. परंतु यशस्वी व प्रोफीटेबल ट्रेडर तोच जो की आपली भीती आपल्या ट्रेडवर किंवा होल्डींगवर फरक पडू देत नाही.
उपाय :- प्रत्येक ट्रेडरला हे समजले पाहिजे कि आपण कोणत्या गोष्टीला भीत आहोत ? व भीतीचे कारण काय ? या गोष्टीचे एकांतात किंवा मित्रांत चिंतन करा. आपल्या भीतीचा प्रॉब्लम काय आहे हे जाणून घ्या व त्याच्यावर काय उपाय आहते हे शोधा. परंतु हे मात्र लक्षात ठेवा कि, आपल्याला नुकसान होईल हि मनात असलेल्या भीती तुम्हाला मिळणाऱ्या प्रॉफिटला रोखू शकणार नाही.
२. लालच (Greed) :- मनात केव्हा लालच येते जेव्हा अधिकाधिक प्रॉफिट मिळावे या आशेने माणूस लालची बनतो. परंतु एका दिवसात मनुष्य श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्हाला जर प्रॉफिट दिसत असेल तर प्रॉफिट बुक करा, आणि पुढच्या ट्रेड शोधा. जेंव्हा आपण जास्त लालच करतो तेंव्हाच आपल्याला जास्त नुकसान होते.
उपाय :- आपल्या मनातील येणारी लालच ह्या भावनेला तोंड देण्यासाठी आपल्यापाशी प्रॉफिट केव्हा बुक करावयाचा याचे लेव्हल काढून ठेवले पाहिजे. कोणताही ट्रेड घेतेवेळेस स्टॉप लॉस व टेक प्रॉफिट आगोदरच निश्चित करा जेणे करून लालच भावनेला बळी पडू शकणार नाहीत.
३. पच्छाताप (Regret):- ट्रेडरला दोन गोष्टीमुळे पच्छाताप होतो. एक म्हणजे असा ट्रेड घेतलेला जो की ट्रेड घेतला पाहिजे नव्हता कारण त्यामध्ये नुकसान होत असतं आणि दुसरा पच्छाताप म्हणजे असा ट्रेड जो की त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळत असेत परंतु तो ट्रेड आपण घेऊ शकलो नाहीत किंवा त्या ट्रेड मधून आपण लवकर बाहेर पडला असाल. या पच्छातापाच्या भावनेमुळे आपण एखादा चुकीचे ट्रेड घेऊ शकतात.
उपाय :- ट्रेडरला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, मार्केट मधील प्रत्येक ट्रेड घेऊ शकत नाही. मार्केटमध्ये आपण प्रॉफिट बनवले असेल तर कधी नुकसानही होत असतं. या भावनेचा आपण जर स्विकार केला तर तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी खूप सुधारेल.
४. आशा (Hope) :- खूप लोकांना शेअर मार्केट हे एक प्रकारचा सट्टा आहे असे वाटते. सट्टा म्हणजे मटका यामध्ये प्रत्येकजण जिकंण्याच्या भावेनेचाच असतो. शेअर मार्केटमध्ये मटका मानून ट्रेड करतात आणि समजतात कि हरलं, नाहीतर जिंकेल परंतु ते नेहमी हरतात. त्यासाठी आपल्या जवळ एक ठोस ट्रेडिंग सायकोलॉजीची गरज लागते. केवळ आशा किंवा कोणत्याही भरोशावर बसून चालणार नाही. मी लवकरात लवकर श्रीमंत होईल हि भावना चुकीची आहे.
उपाय :- जर आपला कोणता ट्रेड नुकसानीत जात असेलतर त्यामधून लवकर भाहेर पडा. त्या ट्रेडला एव्हरेज करत बसू नका, कि पुढे चालून हा ट्रेड मला किंवा लॉन्ग टर्म मध्ये चांगला प्रॉफिट देईल अशा भरोशावर बसू नका, व्यवहारिक बना स्टॉप लॉस हिट जर झाला त्या नुकसानीचा स्वीकार करा.
५. राग (Anger):- राग हि एक नकारात्मक भावना आहे. रागामुळे माणसाचे ब्लडप्रेशर वाढते रागामुळे माणूस चांगला विचार करू शकत नाही, काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही. निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. राग कशामुळे पण येऊ शकतो भांडणामुळे किंवा मार्केट मध्ये झालेल्या नुकसानीमुळे राग येऊ शकतो. राग-रागामध्ये जर आपण ट्रेड घेतला त्या ट्रेडमध्ये नुकसानच होण्याची जास्त संभावना असते.
उपाय :- आपण एक गोष्ट समजून घ्यावी कि, ट्रेडींग करणे म्हणजे हे एक मानसिक कार्य आहे. त्यामध्ये आपल्या बुध्दिचा उपयोग करावा लागतो. मन साफ असेल तर आपण निर्णय पण चांगला घेऊ शकतो. रागाच्या भरामध्ये कोणताही ट्रेड घेऊ नये.
६. सूडबुद्धिची भावना (Revenge):- मित्रांनो जेव्हा आपल्याला सलग दोन, तीन वेळा लॉस होतो, तेंव्हा कळत न कळत का होइन आपण मार्केट सोबत सूडबुद्धिची भावनेने लढू लागतो, मी माझे झालेले नुकसान भरूनच काढेल, बघुत कसा प्रॉफिट होत नाही ते, आशा भावना निर्माण होतात यालाच आपण सूडबुद्धिची भावना Revenge Treading असे म्हणतात. सूडबुद्धिची भावने मध्ये ट्रेडर ओव्हरट्रेडिंग करतो आणि शेवटी नुकसानच होत.
उपाय :- मित्रांनो आपल्याला हे समजले पाहिजे कि मार्केट हे अस्थिर आहे कधी आणि केव्हाही काहीही होऊ शकत, शेअर मार्केटला आपण कंट्रोल करू शकत नाही. मार्केटला आपल्यासारखे नाही तर आपल्यालाच मार्केट सारखे बदलावे लागते. कधीही सूडबुद्धिची भावनेने ट्रेड करू नये. शेअर मार्केटचा सम्मान करावा. मार्केटच्यापुढे कोणीही जाऊ शकत नाही.
७. फोमो ट्रेडिंग (FOMO):- FOMO – (fear of missing out) म्हणजे कोणतातरी ट्रेड आपल्या कडून मिस तर नाही होणार हि भावना यालाच फियर ऑफ मिसिंग आऊट असे म्हणतात. एक मनात भीती असते कि सर्व जण एखादा xyz नावाचा शेअर आहे, त्याच्या खुप बातम्या येत आहे, जो तो त्या शेअर विषयी बोलू लागतो तेव्हा आपल्या मनात अशी भावना निर्माण होते कि आपण सुद्धा हा xyz नावाचा शेअर विकत घ्यावा आता हा कमी भावामध्ये मिळत आहे पुन्हा जर भाव वाढला तर, आणि आपण असेल त्या किमतीत तो शेअर विकत घेतो.
उपाय :- फोमो पासून वाचायचं असेल तर एखादा शेअर खूप वाढला असेल ट्रेड मिस झाला असेल तर त्यासाठी निरास होऊ नये. आपल्याला हे समजले पाहिजे कि मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी प्रत्येकाला वेग वेगळी संधी मिळते. प्रत्येक संधीमध्ये आपण प्रॉफिट कमाऊ शकत नाही.
ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप कशी करावी
१. पहिले स्वतःला ओळख.✅
मित्रांनो आपण पहिल्यांदा स्वतः ला ओळखले पाहिजे. आपल्यामधील सुप्त गुण काय आहेत, आपण कोणत्या भावनेला जास्त बळी पडतो. शेअर मार्केट विषयी आपली भूमिका काय आहे ? आपण मार्केटला काय समजतो ? मार्केट विषयी आपले काही समज, गैरसमज आहेत का ? त्याचा परिणाम आपल्या ट्रेडींग वर होतो. आपण ट्रेडींगचे सर्व नियम व डिसिप्लिन पाळतो का? ट्रेडींग विषयी आपल्यात काही कमीपणा असेल तर त्याला दूर करण्याचे काम करावे. आपल्या मनातील भावना, काही समज गैरसमज आणि आपले सुप्त गुण व अवगुण यांची माहिती मिळून त्यामध्ये चांगले बदल आपण घडून आणू शकतो.
२. संयम बाळगायला शिका, Patient ठेवा.✅
मित्रांनो नेहमी आपण ऐकत असता की संयम बाळगा Patient ठेवा. संयम आणि शिस्त या दोन्ही गोष्टी माणसात असल्या पाहिजे. आपण गुंतवणुकीमध्ये किंवा ट्रेड मध्ये संयम बाळगायला शिका. एखदा नुकसान होईल या भीतीपोटी ट्रेडमधून बाहेर पडू शकतात व पुढे होणाऱ्या प्रॉफिट पासून वंचित राहू शकता. किंवा एखादा ट्रेड घेण्याच्यावेळी आपल्या सेटअप मध्ये ट्रेड बसतो का ? बसत जर नसेल तर पेशन्स ठेवा शिस्तबद्ध आपल्या ट्रेडची वाट पहा. आपण केलेल्या टेक्निकल एनालिसिस वर विश्वास ठेवा. केंव्हाही भावनेच्या भरात ट्रेड घेऊ नये. जास्तकरून लोकांमध्ये Patient ची खूप कमतरता असते. आधीमधी कोठेही, कधीही, कोणताही विचार न करता ट्रेड घेऊ नये. आपण केलेल्या सेटअप मध्ये जोपर्यंत ट्रेड येत नाही तोपर्यंत Patient ठेऊन आपल्या ट्रेडची वाट पहावी.
३. आपली मानसिकता व्यवस्तीत ठेवा.✅
आपण ट्रेडींग करतेवेळी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात कि, मार्केट केव्हाही बदलू शकते. मार्केट मध्ये आपल्याला मार्केटच्या हिशेबाने बदलावे लागते. केव्हाही ट्रेंड बदलू शकतो कधी अपट्रेन्ड तर कधी डाउनट्रेंड सुरू होतो. तेव्हा अशा परीस्तीमध्ये आपली मानसिकता स्ट्रॉन्ग ठेवावी लागेल. मनातील भावनेच्या भरात येऊन चुकीचा निर्णय घेऊ नये. आपली ट्रेडिंग सायकोलॉजी वाढवण्याचा जस्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्या भावनांवर कंट्रोल करण्याचे शिका.
४. पाहिले शेअर मार्केट शिका.✅
मित्रांनो आपली ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट शिका, शेअर मार्केटमध्ये टेक्निकल एनालिसिस, फंडामेंटल एनालिसिस, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, मार्केटचे ट्रेंड या सर्व गोष्टींची माहिती असने खुप गरजेचे आहे. शेअर मार्केटमधील तुमचे ज्ञान वाढवा, नकारात्मक सायकोलॉजी पासून दूर रहा. शेअर मार्केट विषयी जागरूक रहा, नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
५. यशस्वी ट्रेडर पासून काहीना काही शिकत राहा.✅
मित्रांनो शेअर मार्केट मध्ये काम करण्याची प्रत्येकांची आप आपली शैली असते. तुमच्या ओळखीचे यशस्वी ट्रेडर असतील ते कसे ट्रेड घेतात, कसे काम करतात, कोणती स्ट्रॅटजी वापरतात याची माहिती घ्यावी, त्यांच्या कामाची कॉपी करू नये. फक्त त्यांच्याकडून जे पण शिकण्या सारखे असेल ते शिकावे. स्वतःला परफेक्ट व परिपूर्ण समजण्याची चूक करू नका, नेहमी दुसऱ्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करावा.
६. नेहमी प्रॅक्टिस करा.✅
मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजी वाडवण्यासाठी प्रॅक्टिस शिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. आपली मानसिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी नेहमी प्रॅक्टिस करावी. प्रॅक्टिस करण्यामुळे खुप गोष्टीची माहिती होते तुम्ही तुमच्या स्ट्रॅटजी बनवू शकताल. प्रॅक्टिसमुळे मार्केटची कोणताही टेंड असो त्यामध्ये तुम्ही निर्भीडपणे काम करू शकताल. प्रॅक्टिसमुळे तुम्ही तुमच्या भावनांवर कंट्रोल करण्यास शिकू शकतात. प्रॅक्टिसमुळे तुमचे कोणतेही समज गैरसमजाची माहिती मिळू शकते व त्यामध्ये सुधारणा आपण घडवून आणू शकतो. आपली मॅन्टेलटी सुधारण्यासाठी खूप परिश्रम आणि प्रॅक्टिसची गरज लागते.
७. ओव्हर कॉन्फिडन्स पासून दूर राहा.✅
मित्रांनो जर तुम्ही अति आत्मविश्वाशी असाल तर, तुमच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर एक चुकीचा विश्वास मनात बाळगावतो. आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर आपण घेतलेले निर्णय, आपले विचार बरोबर असतात. आत्मविश्वास म्हणजे “हो मी मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकतो” आणि अति आत्मविश्वाशी किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे “हो मी मार्केटमध्ये प्रॉफिट करणारच.” या भावनेमुळे कुठेतरी मनात गर्व निर्माण होतो आणि मार्केट सोबत भांडण करता.
८. घेतलेल्या ट्रेड चे रेकॉर्ड ठेवा.✅
मित्रांनो आपला आत्मविश्वास वाडवण्यासाठी व ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप करण्यासाठी नेहमी आपण घेतलेल्या ट्रेडचा डेटा एक्सेल शीट मध्ये सेव्ह करून ठेवा. ज्यामध्ये आपण ट्रेड केव्हा घेतला, स्टॉप लॉस किती होता, टारगेट कोणते होते, किती टारगेट हिट झाले या सर्वांची नोंद एक्सेल शीट मध्ये सेव्ह करून ठेवावी नंतर त्या शीटमुळे तुम्हाला ट्रेडचे आकलन, निरीक्षण करण्यास सुलभ जाते. यामध्ये आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्याची माहिती मिळते.
९. केलेल्या चुकांपासुन काहीतरी शिका.✅
मित्रांनो ट्रेडमध्ये जर स्टोपलॉस हिट होऊ लागला किंवा नुकसान होऊ लागले तर. ट्रेड करणे बंद करावे, व आपण केलेली चुकांचे निरीक्षण करावे, आपल्या काय चुका झाल्या, आपल्या चुकांचे काय कारण होते, याचे एक नोटबुक बनवा. त्यामध्ये आपण केलेल्या चुकांची नोंद ठेवा. एक यशस्वी ट्रेडर आपण केलेल्या चुकांपासुन शिकून परत त्या चुका होऊ नये याकडे लक्ष देतो. प्रत्येक ट्रेड हा सक्सेसच होईल याची गॅरंटी नसते. काही ट्रेडमध्ये प्रॉफिटपण होते, काही ट्रेड मध्ये लॉस पण होतो. यशस्वी ट्रेडर तोच जोकी केलेल्या चुकांमधून शिकून नवीन ट्रेड मध्ये त्याचा अवलंब करतो. यामुळे आपली तणाव, चिंता दूर होण्यास मदत मिळते.
१०. स्टॉपलॉस व ट्रेलिन्ग स्टॉपलॉसचा वापर करावा.✅
मित्रांनो आपण जेव्हा ट्रेड घेतो तेव्हा आपण टारगेट किंवा प्रॉफिटला जास्त महत्व देतो. त्यामुळे आपण आपल्या ट्रेडच्या P & L नेहमी पाहत राहतो. सारखे P & L पाहत राहिले तर मनात भीती किंवा लालच निर्माण होते. त्यामुळे भावनेच्या भरात आपण चुकीचा निर्णय घेऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी आपण टारगेट पेक्षा स्टॉपलॉसला जास्त महत्व देण्याची गरज आहे.
ट्रेडमध्ये आणि गुंतवणुकीमध्ये स्टॉपलॉसला खुप महत्व आहे. स्टॉपलॉस हा एखाद्या कारच्या ब्रेक सारखा असतो, कारला ब्रेक नसतील तर त्याचा अपघात होऊ शकतो. तसेच ट्रेड मध्ये जर आपण स्टॉपलॉस नाही लावला तर आपली रिस्क हि अनलिमिटेड होते. एक यशस्वी ट्रेडर आपल्या ट्रेड मध्ये स्टॉपलॉस जरूर लावतो, यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो व मानसिक स्थिती बरोबर राहते.
ट्रेडमध्ये प्रॉफिट शिवाय आपले कॅपिटल सुद्धा वाचवण्याची जिम्मेदारी असती, कॅपिटल जर वाचले तरच आपण दुसरा ट्रेड घेऊन प्रॉफिट घेऊ शकतो. ट्रेडमध्ये जस जसे प्रॉफिट मध्ये येतात तस तसे स्टॉपलॉस ट्रेल करावा. म्हणजे ट्रेलिन्ग स्टॉपलॉस चा अवलंब करावा. जेणे करून प्रॉफिट व कॅपिटल दोन्ही पण वाचू शकते.
निष्कर्ष :-
मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप करणे खुप महत्वाची आहे, Technical Analysis, Fundamental Analysis या गोष्टी मार्केटमध्ये २० टक्के व Trading Psychology हि मार्केटमध्ये ८० टक्के वर्क करते. मार्केटमध्ये मानसिक स्थिती, मनातील भावना, इमोशन या गोष्टी जस जसे आपण मार्केटमध्ये काम करू तस तसे डेव्हलप होत राहतात, परंतु ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप करण्याची जवाबदारी आपलीच असते.
डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.
मित्रांनो शेअर मार्केट विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय या पोस्टला जरूर भेट दया.
धन्यवाद !
FAQ :-
ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय?
ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे ट्रेडरचे Mindset, Behavior व Emotion यावर मिळवलेले नियंत्रण.