नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये IPO म्हणजे काय ?। IPO Meaning in Marathi या विषयी माहिती आपण घेऊ. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा IPO येणार असतो, तेव्हा त्या कंपनीच्या IPO विषयी जोरदार चर्चा टी.व्ही., न्युज चॅनल, पेपर, युट्यूब, अशा वेगवेगळ्या प्रसार माध्येमामध्ये होते. जो-तो त्या IPO विषयी बोलत असतो, आपले मत मांडत असतो. तुमच्या मनात विचार आले असतील कि, IPO म्हणजे काय?
त्या कंपनीच्या IPO मध्ये भाग घेऊन त्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यावे का ? कंपनीमध्ये गुंतवणूक करावी का ? गुंतवणूक करणे चांगले कि वाईट ? असे विचार मनामध्ये आले असतीलच, परंतु IPO सहभाग घेण्या अगोदर IPO म्हणजे काय? या विषयी संपूर्ण माहित घेणे गरजेचे असते, या पोस्टमध्ये तुम्हाला IPO meaning, IPO म्हणजे काय? या विषयी माहिती देण्याचा प्रयत्त्न केला आहे. जो कि तुम्हाला नक्की आवडेल.
IPO म्हणजे काय|what is ipo in stock market
मित्रांनो जेव्हा एक व्यक्ती किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती मिळून एखादी कंपनी सुरु करतात व ती कंपनी रजिस्टर करतात. यांनाच आपण फाउंडर किंवा प्रमोटर असे म्हणतो. प्रमोटर स्वतः कंपनीत पैशाच्या स्वरूपात भांडवल गुंतवतात, म्हणजे त्या कंपनीचे शेअर्स स्वतःला विकून कंपनीला भांडवल स्वरूपात पैसे देतात. प्रत्येकी प्रमोटरकडे किती शेअर आहेत त्यानुसार त्याची कंपनीतील भागीदारी ठरते. उदा. एखाद्या प्रमोटरने कंपनीच्या एकूण भांडवलापैकी निम्मे भांडवल त्याने गुंतवले असतील तर तो कंपनीचा 50 टक्के शेअरचा मालक असेल.
परंतु कंपनीला अधिक भांडवलाची गरज पडते तेव्हा कंपनी IPO आणते. एखादी कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स सामान्य जनतेत शेअर करण्याची ऑफर आणते, म्हणजे जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा आपले काही शेअर्स सामान्य जनतेमध्ये विक्री करण्याचा प्रस्ताव आणते यालाच आपण IPO (Initial Public Offering) असे म्हणतात.
तसेच त्याला प्रायमरी मार्केट किंवा मराठीत प्राथमिक बाजारपेठ अशा नावाने सुध्दा संबोधले जाते. IPO चे मुख्ये कारण म्हणजे एकतर कंपनीसाठी भांडवल निर्माण करणे व दुसरे म्हणजे कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करणे होय. IPO मुळे कंपनीचे रूपांतर खाजगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीमध्ये होते. IPO मुळे कंपनीला भांडवल व सामान्य जनतेला त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून प्रॉफिट मिळवण्याची संधी मिळते.
परंतु सामान्य जनता ज्याला आपण Retail Investors असे म्हणतो ते अशा आयपीओ मध्ये FOMO ला बळी पडतात किंवा माईंडसेट डेव्हलप नसते त्यामुळे प्रॉफिट मिळू शकत नाहीत.
कंपनीच्या निधीचे टप्पे । company funding stages
मित्रांनो जेव्हा कंपनी सुरु होते तेव्हा कंपनीचे प्रमोटर हे आपल्या जवळचा निधी कंपनीला लावतात, आपले नातेवाईक, मित्रपरिवार, कुठुंबातील काही व्यक्ती कंपनीमध्ये आपला पैसा निधी रूपात कंपनी चालवण्यासाठी देतात. परंतु कंपनीचा व्यापार जसा-जसा वाढेल तसेच कंपनीला अधीक पैसाची गरज भासते म्हणजे भांडवलाची गरज पडते तेंव्हा कंपनी काही जवळचे श्रीमंत गुंतवणूकदार (Angel Investor) त्यांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवत्त करतात व त्यांना भागीदार बनवतात.
परंतु कंपनीला ग्रो करण्यासाठी अधिक भांडवलाची गरज पडते तेव्हा कंपनी Venture Capital, Private Equity यांच्याकडून भांडवल मिळवते. काही कंपन्या debt equity च्या स्वरूपात काही बँकेकडून लोन घेतात. परंतु त्या लोनचे इंट्रेस्ट सुद्धा भरावे लागतात.
आयपीओ आणण्याचे कारणे। reasons for bringing IPO
- मित्रांनो कंपनीला IPO आणण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीसाठी भांडवल उभा करणे हेच असते. परंतु कंपनीला IPO आणण्याचे कारणे वेगळे पण असू शकतात IPO आणण्याचे काही कारणे आपण पाहू.
- कंपनी जेव्हा ग्रो करते तेव्हा त्या कंपनीला आपला व्यापार वाढवण्यासाठी भांडवलाची गरज पडते, ज्यामध्ये कंपनीला सुधारित मशीनरी विकत घेण्यासाठी, कंपनीचे प्लांट वाढवण्यासाठी, कंपनीचे तंत्रज्ञान डेव्हलप करण्यासाठी कंपनीला भांडवलाची गरज भासते, तेव्हा कंपनी आयपीओ आणते, जेणेकरून कंपनीला आयपीओ च्या माध्यमाने भांडवल मिळते.
- तसेच काही कंपनीवर जास्त कर्ज असते, त्या कर्जाच्या परतफेडीसाठी सुद्धा कंपनी आयपीओ आणतात जेणे करून कंपनीचे फाइनशियल प्रॉब्लम दूर होतात. कंपनीतील आयपीओ च्या माध्यमातून जे भांडवल मिळालेले असते ते परत करण्याची गरज नसते व त्यावर कोणता इंट्रेस्ट देण्याची गरज नसते. या कारणामुळे सुद्धा कंपन्या आयपीओ आणतात.
- तसेच कंपनीमध्ये आगोदर काही प्रायवेट इन्व्हेस्टर असतात त्यांना त्या कंपनीमधून बाहेर पडायचे असते, जेणेकरून कंपनी आयपीओ मधून भांडवल उभा करून जुने प्रायवेट इन्व्हेस्टर कंपनीतून एक्सिझिट मिळू शकतात व कंपनीला आयपीओमुळे नवीन इन्व्हेस्टर मिळतात.
- जेव्हा कंपनी एखादे product लॉन्च करते त्याच्या प्रमोशनसाठी सुद्धा कंपनी आयपीओ आणतात. जेणे करून आयपीओ मुळे कंपनीच्या product ची मार्केटींग होते व गुंतवणूकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. ज्याचा फायदा कंपनीला मिळतो.
आयपीओ चे प्रकार । types of IPOs
मित्रांनो एक किंवा एकापेक्षा जास्त लोक मिळून एक कंपनी सुरु करतात त्यांना आपण प्रमोटर असे म्हणतो. कंपनी काही प्रमाणात ग्रो पण होते. परंतु काही कंपन्या छोट्या असतात काही कंपन्या मोठ्या असतात. छोट्या कंपनीला कमी भांडवल मिळाले तरी चालते परंतु मोठ्या कंपन्याला जास्त भांडवलाची गरज भासते. या आधारावरच खालीलप्रमाणे बाजारामध्ये दोन प्रकारे आयपीओ येतात.
1. मेनलाईन आयपीओ (Mainline IPO)
2. एस.एम.ई .आयपीओ (SME IPO)
संबधीत पोस्ट वाचा : SME IPO म्हणजे काय ?
Mainline IPO हे मोठ्या कंपनीचे आयपीओ असतात, जे की, 100 कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कमेचे आयपीओ आणतात.
SME IPO हे छोट्या कंपनीचा आयपीओ असतो जे की, 100 कोटी रुपये पेक्षा कमी रक्कमेचे आयपीओ आणतात. अशा कंपनीचा टर्नओव्हर 100 कोटी रूपया पेक्षा कमी असतो. SME IPO मधील कंपनीचे शेअर्स हे BSE SME व NSE Emerge वर लिस्ट होतात. SME IPO मधील लॉट साईज 1 लाख रुपये व त्यापेक्षा जास्त असतो व शेअरची प्राईस सरासरी फिक्स असते.
Mainline IPO साठी व SME IPO साठी जे काही नियम असतील ते नियम कंपनीला पूर्ण करावे लागतात.
आयपीओ आणण्याची प्रक्रिया । ipo process steps
मर्चंड बँकेची भूमिका। role of merchant banker in ipo
मित्रांनो कोणत्याही कंपनीचा आयपीओ आणण्याची प्रक्रिया खूप जटील स्वरूपाची असते. आयपीओ आणण्यासाठी कंपनीला एका मर्चंड बँकेची गरज लागते. मर्चंड बँकला इन्व्हेस्टमेंट बँक असे सुद्धा म्हणतात. मर्चंड बँक ही कंपनीला आयपीओ आणण्यास मदत करते. वेगवेगळ्या बँका मर्चंड बँकेची भूमिका बजावतात.
उदा. काही मर्चंड बँका खालील प्रमाणे :
- HDFC BANK LTD. INVESTMENT BANKING SERVICES
- SBI CAPITAL MARKETS LTD.
- ICICI SECURITIES LTD.
- KOTAK MAHINDRA CAPITAL COMPANY LTD.
- MOTILAL OSWAL INVESTMENT ADVISOR LTD.
अशा वेगवेगळ्या बँका मर्चंड बँक म्हणून काम करतात. त्या बँकेची वेगळी ब्रँच व टीम असते जे कि, कंपनीचा आयपीओ आणण्याची काम चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांचे काम हे कंपनीला आयपीओ आणण्यास मदत करणे, कंपनीच्या आइपीओची मार्केटिंग करणे, आयपीओसाठी लागणारे ड्राफ्ट, फाईल, डॉक्युमेंट तयार करणे, त्या कंपनीला आयपीओ च्या माध्यमाने फंड गोळा करण्यास मदत करणे इ.
मर्चंड बँक त्या कंपनीचे पूर्ण डॉक्युमेंट चेक करते. कंपनी विषयी सर्व माहिती घेते. त्यामध्ये कंपनीचे प्रोजेक्ट रिपोर्ट, कंपनीचा मागील वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहते. कंपनीचे बॅलन्स शीट, कंपनीचे बिजनेस मॉडेल, कंपनीच्या शाखा, कंपनीचे कस्टमर, प्रोडक्ट, मार्जिन फिचर अशा सर्व गोष्टी पाहते, जर मर्चंड बँकेला सर्व गोष्टी चांगल्या वाटल्या तर कंपनीचा आयपीओ आणण्यास मदत करण्याचे आश्वासन देते व कंपनीला ती मर्चंड बँक चांगली वाटली तर कंपनीचा आयपीओ आणण्याचे काम त्यांना सोपवतो.
ड्यू डिलिजन्स अँड फायलिंग। due diligence and filing
मित्रांनो कंपनीने मर्चंड बँकेला कंपनीची जी महिती दिलेली असते. कंपनीने दिलेल्या कंपनीचे सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत का कसे, या सर्व गोष्टीची माहिती काढणे मर्चंड बँकेसाठी महत्वाचे असते. कंपनीने आपल्या प्रस्तावा सोबत जे कंपनीचे डॉक्युमेंट दिलेले असतात व कंपनीने दिलेली माहिती बरोबर आहे का कशी, या कंपनीचा जर आपण आयपीओ आणला तर आपल्याला काही भविष्यात नुकसान तर नाही न होणार, याचा शोध घेतात. नंतर कंपनीचा आयपीओ आणण्यास सुरुवात करतात.
अंडररायटिंग।underwriting
कंपनीला मर्चंड बँक किंवा कंपनीने ज्या अंडररायटिंगची मदत घेतली असेल ते कंपनीला हमी देतात कि, कंपनीचा आयपीओ जर under subscribe झाला तर म्हणजे कंपनी जेवढ्या रक्कमेचा आयपीओ आणत आहे तेवढ्या रक्कमेचे भांडवल कंपनीला मिळाले नाही. तर उरलेल्या रक्कमेचे मर्चंड बँक किंवा अंडररायटर शेअर विकत घेऊन इन्व्हेस्टमेंट करण्याची हमी देते. यालाच firm commitment असे म्हणू शकतात. जेणेकरून कंपनी जितक्या रुपयेचा आयपीओ आणला आहे तेवढ्या रुपयेचे भांडवल कंपनीला मिळते.
अंडररायटर कंपनीला एक चांगला आयपीओ आणण्याची म्हणजे best efforts commitment देते. आयपीओ साठी कंपनीचे वेलव्हेशन काढणे, कंपनीची शेअर प्राईस डिसाईट करणे, चांगली मार्केटींग करणे असे सर्व काम करण्याची हमी देतो. परंतु कंपनीचा आयपीओ under subscribe किंवा over subscribed पण होऊ शकतो.
कंपनीचा आयपीओ जर जास्त रक्कमेचा असेल, आणि एकटी मर्चंड बँक मॅनेज करू शकत नसेल तर. मर्चंड बँक दुसऱ्या काही मर्चंड बँकेसोबत मिळून कंपनीचा आईपाईओ आणते. यालाच syndicate underwriting असे म्हणू शकतो.
Draft Red Herring Prospectus [DRHP]
Draft Red Herring Prospectus [DRHP] हे असे डॉक्युमेंट असते की, कंपनीची सर्व माहिती या डॉक्युमेंट मध्ये असते. कंपनीचा जो बिजनेस असतो त्या विषयी सविस्तर माहिती असते. कंपनीच्या प्रमोटरची संपूर्ण माहिती असते.
कंपनीला कोणी कॉम्पिटेटर आहे का ? कंपनी आपल्या कॉम्पिटेटर पेक्षा जास्त डेव्हलप आहे का ? याची सर्व माहिती असते. कंपनीचे कॅपिटल स्ट्रक्चर ची सर्व माहिती असते, कंपनीचे फ्युचर प्लॅन कसे आहेत, कंपनीमध्ये किती Rick आणि Opportunities आहे याची माहिती असते आणि मागील काळातील कंपनीच्या रेकॉर्डची माहिती असते.
हे DRHP डॉक्युमेंट SEBI – Securities and Exchange Board of India मध्ये सबमिट करावे लागते. SEBI या डॉक्युमेंट तपासण्यास वेळ घेतो. डॉक्युमेंटची पूर्ण तपासणी झाल्यास SEBI आयपीओ आणण्यास संमती देते. तेंव्हाच DRHP डॉक्युमेंट हे सामान्य जनतेसाठी प्रकाशित केले जाते.
कॉम्पलिअन्स अँड फायलिंग। compliance and filings
मर्चंड बँक हि SEBI चे असणारे काही नियम व अटी त्याची पूर्तता करते. कंपनीच्या आयपीओसाठी लागणारे सर्व कायदेशीर डॉक्युमेंट तयार करते, स्टॉक एक्सचेंजचे सर्व फाईल व डॉक्युमेंट याची पूर्तता मर्चंड बँक करते. म्हणजे आयपीओसाठी लागणारे सर्व फाईल बनवणे त्यांची मंजुरी याचे सर्व काम करते.
आयपीओ आणण्याच्या दोन पध्दती । methods of ipo pricing
मित्रांनो मर्चंड बँक कंपनीची प्रायझिंग करते, कंपनीचे वेलव्हेशन काढते. कंपनीचे वेलव्हेशन उदा. 10,000/- (दहा हजार करोड) निघाले. त्यापैकी कंपनीला जर 1000/- (एक हजार करोड) रुपयाची गरज असेल तर कंपनीचे 10 टक्के शेअर्स आयपीओ मध्ये सेल करण्याचे ठरवते. म्हणजे IPO issue size = 1000/- (एक हजार करोड) झाले व कंपनीच्या शेअर्सचा issue price पण मर्चंड बँक ठरवते. IPO हा फिक्स प्राईस मेथर्डने आणावयाचा का ? बुक बिल्डिंग मेथर्डने आणावयाचा ? हे मर्चंड बँक ठरवते.
फिक्स प्राईस मेथर्ड। Fixed price method
फिक्स प्राईस मेथर्ड मध्ये कंपनी जेव्हा आपला आयपीओ आणते तेव्हा कंपनी व मर्चंड बँक शेअरचा प्राईस ठरवतात कि कोणत्या प्राईस वर शेअर आयपीओ मध्ये विक्री करावयाचा आहे. Fixed price method हि अशी पद्धत आहे कि कंपनीने जो शेअरचा प्राईस ठरवलेला आहे तो फिक्स असतो, कोणत्याही एका फिक्स प्राईस वर आयपीओ मध्ये शेअर विक्री करते. जो कोणी आयपीओ मध्ये भाग घेतो त्याला त्या कंपनीने ठरवलेल्या फिक्स प्राईस वरच शेअर मिळतात.
Fixed price method हि पद्धत मेनलाईन आयपीओ मध्ये व एस.एम.इ. आयपीओ या दोन्हीही आयपीओ मध्ये असू शकते. हे सर्व कंपनीच्या व मर्चंड बँकेच्या निर्णयावर अवलंबून असतो कि कंपनीला कोणत्या पध्दतीने आयपीओ आणावयाचा आहे. म्हणजे शेअरची प्राईस किती व कोणत्या पध्दतीने आणावयाचा आहे हे मर्चंड बँक व कंपनी ठरवतात.
बुक बिल्डिंग मेथर्ड। Book building method
बुक बिल्डिंग मेथर्ड मध्ये कंपनी आणि मर्चंड बँक शेअरच्या प्राईस ची एक रेंज ठरवतात. उदा. 2900 ते 3000 अशा प्रकारच्या रेंजमध्ये कंपनीचे शेअर आयपीओ मध्ये विक्री करण्याचे ठरवतात. यालाच आइपीओचा प्राईस रेंज असे म्हणतात. शेअरच्या प्राईस रेंज मधील सर्वात कमी असलेल्या प्राईसला Floor Price व सर्वात जास्त असलेल्या प्राईसला Cap Price असे म्हणतात. आयपीओ मध्ये भाग घेण्याची म्हणजे नोंदणी करण्याची वेळ संपते. नंतर कंपनी फायनल शेअर प्राईस ठरवते.
मित्रांनो IPO मध्ये शेअर बंडल मध्ये खरेदी करावे लागतात. शेअरच्या बंडलची प्राईस 15000/- (पंधरा हजार) पेक्षा जास्त नसते. प्रत्येकी बंडल मध्ये किती शेअर असतील हे शेअरच्या प्राईसवर अवलंबून असते. उदा. फिक्स प्राईस मेथर्ड मध्ये शेअरचा प्राईस 1000/- (एक हजार) आहे. म्हणजे 1000/- X 15 = 15000/- (पंधरा हजार) म्हणजे शेअरच्या एका बंडलमध्ये 15 शेअर असतील. बुक बिल्डिंग मेथर्ड मध्ये शेअरचा प्राईस 2900 ते 3000 या रेंजमध्ये असेल तर 15000/- (पंधरा हजार) भागिले 29000 ते 3000 = 5 (पाच) शेअर्स एका बंडल मध्ये असतील.
डिस्ट्रिब्युशन अँड अँप्लिकेशन प्रोसेस । distribution & application process
आयपीओ मध्ये मुख्य करून तीन प्रकारचे लोक गुंतवणुक करतात किंवा शेअर्स डिस्ट्रिब्युशन केले जातात. एक म्हणजे QIB (qualified institutional investors) ज्यामध्ये वेगवेगळ्या Banks असतात वेगवेगळे Mutual Funds असतात आणि Investment Companies असतात. दुसरे म्हणजे NII (non institutional investors) व HNI (high net worth individual) आणि तिसरे लोक म्हणजे Retail Investors असतात जे कि 2 लाखा पेक्षा कमी रक्कमेची गुंतवणूक करतात असे लोक.
आयपीओ मध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट ची गरज असते. आपण आपल्या ब्रोकर कडून जे डिमॅट अकाउंट उघडलेले असते त्या अकाउंटमधून आपण आयपीओ मध्ये ठरून दिलेल्या दिवसाच्या आत आपण नोंदणी करतो म्हणजे IPO मध्ये application करतो व आपण किती लॉट म्हणजे बंडल विकत घेण्यासाठी नोंदणी केली तेवढी रक्कम आपली खात्यातून फ्रीज होते.
परंतु आपल्याला आयपीओ मध्ये शेअर्स मिळतीलच असे नसते. कारण कंपनी हि शेअर्सची कॉन्टेटी फिक्स करूनच ते शेअर्सच आइपीओमध्ये सेल करते. उदा. कंपनी जर 10,000/- (दहा हजार) शेअर्सच सेल करत असेल परंतु आइपीओमध्ये 15,000/-(पंधरा हजार) शेअर्ससाठी लोकांनी अप्लाय केले तर लॉटरी पद्धतीनेच शेअर्स वाटले जातात व त्यामध्ये आपल्याला शेअर्स मिळतीलच याची शास्वती नसते. यालाच IPO Over Subscribed झाला असे म्हणतात.
कंपनीने जेवढे शेअर्स सेल करण्यासाठी आणले त्यापैकी कमी शेअर्स आयपीओ मध्ये सेल झाले तर त्याला आपण IPO Under Subscribe झाला असे म्हणतात. आयपीओ मध्ये जर आपल्याला शेअर्स मिळाले तर आपल्या बँक खात्यातून फ्रिज झालेली रक्कम कंपनीला जाते व आपल्याला शेअर्स मिळतात, परंतु जर आपल्याला शेअर्स मिळाले नाही तर काही दिवसाने आपली फ्रिज झालेली रक्कम आपल्याला वापस मिळते.
IPO चा application कालावधी संपला की कंपनीचा शेअर NSE व BSE या स्टॉक एक्सचेन्जवर लिस्ट होतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण कोणत्याही IPO मध्ये भाग घेताल तेव्हा IPO ची सर्व प्रोसेस आपणाला माहित असणे खूप गरजेचे असते. DRHP हे डॉक्युमेंट वाचणे खूप गरजेचे असते जेणे करून कंपनी विषयी अधिक माहिती आपल्याला मिळते. यामुळे IPO मध्ये भाग घ्यावा कि नाही याचे डिसिजन घेणे सोपे जाते.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.
मित्रांनो शेअर मार्केट विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय या पोस्टला जरूर भेट दया.
धन्यवाद !
FAQ:-
IPO म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा आपले काही शेअर्स सामान्य जनतेमध्ये विक्री करण्याचा प्रस्ताव आणते यालाच आपण IPO (Initial Public Offering) असे म्हणतात.