ट्रेडिंगचे 10 महत्वाचे नियम | Trading Psychology Rules in Marathi

5/5 - (3 votes)

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये ट्रेडिंगचे 10 महत्वाचे नियम | Trading Psychology Rules in Marathi या विषयी माहिती घेणार आहोत.

शेअर मार्केटमध्ये लॉस होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपण ट्रेडिंग करते वेळी खूप मिस्टेक्स करतो, आपण ट्रेडिंगचे रूल्स बनवत नाहीत. आपण आपल्यावर काही निर्बंध घालत नाहीत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेडिंगचे काही महत्वाचे नियम म्हणजे रुल्स आहेत. अशा नियमाचे आपण जर तंतोतंत पालन केले तर, आपली ट्रेडिंग सायकॉलॉजी सुधारून एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यास मदत मिळते. ट्रेडिंगच्या नियमाचे पालन केले तर आपल्याला ट्रेडिंगमध्ये खूप कमी लॉस होईल. ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस हिट होऊन थोडा लॉस होणे हा ट्रेडिंगचा एक भाग आहे. परंतु नेहमी लॉस होणे हि चिंतेची बाब आहे. त्यामुळेच या पोस्टमध्ये ट्रेडिंगचे 10 महत्वाचे नियम | Trading Psychology Rules in Marathi या विषयी माहिती दिली आहे. या नियमाचे तुम्ही आवश्य पालन करा तुम्हाला प्रॉफिट मिळवण्यासाठी व एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यास खूप मदत होईल.

ट्रेडिंगचे 10 महत्वाचे नियम | Trading Psychology Rules in Marathi

1. नेहमी ट्रेडिंग प्लॅन फॉलो करा । always follow a trading plan

शेअर मार्केट मधील ट्रेडिंगचा महत्वाचा नियम म्हणजे नेहमी ट्रेडिंग प्लॅन फॉलो करा. जर आपण ट्रेडिंग प्लॅन बनवला नसेल किंवा आपल्याकडे कोणताही ट्रेडिंग प्लॅन नसेल तर मार्केटमध्ये ट्रेड घेणे म्हणजे आपण गॅम्बलीग करत आहात असे समजावे. त्यामुळे ट्रेड करण्याच्या एक दिवस अगोदरच किंवा रात्री आपला ट्रेडिंग प्लॅन बनवणे खूप महत्वाचे आहे. ट्रेडिंग प्लॅन म्हणजे  Trading Strategy किंवा Technical Setup जो कि आपण टेक्निकल एनालिसिस करून बनवला जातो.

ज्यामध्ये आपण ट्रेडमध्ये इंट्री केव्हा घेणार आहोत, आपला स्टॉप लॉस कोठे असणार आहे, आपला रिस्क रिवार्ड रेशो कसा आहे, आपण ट्रेडमधून बाहेर केव्हा पडणार आहोत व आपली ट्रेडिंग स्टाईल कोणती असेल इंट्राडे ट्रेडिंग करणार आहोत का स्विंग ट्रेडिंग करणार आहोत का डिलिव्हरी ट्रेडिंग करणार आहोत हे अगोदरच ट्रेडिंग प्लॅन मध्ये निश्चित करावे, त्यामुळे नेहमी ट्रेडिंग प्लॅन बनवा व त्या प्लॅनलाच फॉलो करा. या नियमाचे पालन काटेकोरपणे करा.

2. ट्रेडिंग म्हणजे एक बिजनेस आहे असे समजा । treat trading like a business

शेअर मार्केट मधील दुसरा महत्वाचा नियम म्हणजे ट्रेडींगला नेहमी एका बिजनेस प्रमाणे वागणूक द्या. शेअर मार्केट मधील ट्रेडिंग हा कोणता सट्टा बाजार नाही किंवा गॅम्बलिंग नाही किंवा फक्त मला ट्रेडिंग करण्याची आवड आहे, म्हणून ट्रेड करतो असे पण नाही. कारण ट्रेडिंग म्हणजे तुमची हॉबी नाही. तसेच ट्रेडींगला तुम्ही एकादी नोकरी समजून ट्रेडिंग करू नका, कि मी एक महिना ट्रेडिंग करेल आणि जसे नोकरीमध्ये महिन्याच्या शेवटला तुम्हाला पगार मिळतो तसे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला पगार मिळेल. ट्रेडिंग मध्ये महिन्याचा शेवटला तुम्हाला किती पैसे मिळतील, का लॉस मध्ये महिना निघेल याची कोणतीच गॅरेंटी नसते.

ट्रेडिंग मध्ये जसे प्रॉफिट होते तसे लॉस पण होतात. जर तुम्ही ट्रेडींगला एक सट्टा, गॅम्बलीग, हॉबी किंवा नोकरी समजत असाल तर शेअर मार्केट मधील ट्रेडिंग तुमच्यासाठी नाही. शेवटी ट्रेडिंगमध्ये तुम्हाला लॉस शिवाय काहीही हाती लागणार नाही. मित्रांनो एक बिजनेस सुरु करण्यासाठी अगोदर बजेट म्हणजे पैसा लागतो. त्यामध्ये तुमचे मेन्टेन्स, रेंट, शिपिंग इत्तर खर्च लागतो. तसाच ट्रेडिंग म्हणजे तुम्ही चालू केलेला एक बिजनेस आहे. ज्यामध्ये लॉस होणे म्हणजे तुमचा मेन्टेन्स चार्जेस आहे.

3. दिवसामधून किती लॉस सहन करू शकता हे निश्चित करा । set your daily limit loss

शेअर मार्केट मधील तिसरा महत्वाचा नियम म्हणजे दिवसामधून किती लॉस सहन करू शकता हे निश्चित करणे. यालाच आपण रिस्क मॅनेजमेंट असे म्हणतो. ट्रेडिंग मध्ये आपल्याला दिवसामधून एका ट्रेडमध्ये किती रिस्क घेऊ शकता, म्हणजे आपण दिवसातून एका ट्रेड मध्ये किती लॉस घेऊ शकता हे निश्चित करणे होय.

सक्सेसफुल ट्रेडर हे आपल्या ट्रेडिंग कॅपिटल मधून फक्त 2% च पैशाची रिस्क घेण्याचा नियम पाळतात. असे ठरवावे कि जर मी ट्रेड घेतला तर किमान एवढ्याच रुपयाचा लॉस सहन करेल, जर जास्त लॉस होत असेल तर ट्रेडिंग करणे टाळावे. तसेच असे ट्रेड घ्यावे ज्यामध्ये स्टॉप लॉस खूप दूर नसू नये. ज्या ट्रेडचा स्टॉप लॉस जास्त रक्कमेचा असेल असे ट्रेड घेणे टाळावे.

वाचा : SME IPO म्हणजे काय ?

तसेच सक्सेसफुल ट्रेडर एका ट्रेड मध्येच आपले पूर्ण कॅपिटल ट्रेडिंग मध्ये लावत नाहीत. जर आपण लॉस लिमिट सेट केला तर तुमचा लॉस जास्त होणार नाही व तुम्ही कमी लॉस मधेच ट्रेड मधून बाहेर पडू शकता. याचा फायदा असा होईल कि, तुमचे कॅपिटल ट्रेडिंग करण्यासाठी शिल्लक राहील. त्यामुळे डेली लिमिट लॉस सेट करावा. जर तुम्ही आठवड्यातून दहा ट्रेड घेतले तर किमान सात ट्रेड प्रॉफिट मध्ये निघावे. या नियमाचे पालन जर तुम्ही चांगल्याप्रकारे केले तर तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजी सुधारेल व तुम्हाला प्रॉफिट मिळण्यास मदत होईल.

4. भावनिक ट्रेडिंग पासून दूर राहा । stay away from emotional trading

शेअर मार्केट मधील महत्वाचा नियम म्हणजे नेहमी भावनिक, इमोशनल ट्रेडिंग पासून दूर राहावे. शेअर मार्केट मध्ये तुमच्या इमोशनला काहीही महत्व नसते. मार्केटमध्ये ट्रेडिंग एका रोबोर्ड प्रमाणे करावी. जो भी आपला ट्रेडिंग प्लॅन आहे त्या प्रमाणेच ट्रेडिंग करावी. कधीही इमोशनल होऊन ट्रेडिंग करू नये. शेअर मार्केट मधील ट्रेडिंग इमोशनल लेस असते. ट्रेडिंग मध्ये भीती वाटणे, लालच निर्माण होणे, फोमो मध्ये ट्रेडिंग करणे, सूड भावनेने ट्रेड करणे टाळावे.

मार्केटला तुम्ही किती इमोशनल आहात, तुम्ही प्रॉफिट करत आहात का, लॉस करत आहात या गोष्टीशी काहीही संबध नसतो. तसेच मार्केट मध्ये जर – तर च्या गोष्टीला महत्व नसते किंवा तुम्हाला मार्केट बद्दल काय वाटत आहे या गोष्टीचे मार्केटला काही घेणे देणे नसते. तुम्हाला वाटत असेल मार्केट वर जाईल किंवा तुम्हाला वाटत असेल कि मार्केट खाली जाईल असे वाटत आहे या गोष्टीच्या आधारे जर तुम्ही ट्रेड घेतला तर मार्केट तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.

मार्केटमध्ये कधीही अति उत्साही किंवा ओव्हर कॉन्फिडन्स होऊन ट्रेडिंग करू नये. मार्केट मध्ये ट्रेड घेते वेळेस प्रॉपर टेकनिकल एनालिसिसलाच फॉलो करावे व ट्रेडिंग सेटअप प्रमाणेच काम करावे. ट्रेडिंग मध्ये प्रॉपर माईंड सेट डेव्हलप करून, ट्रेडिंग साकोलॉजीचा सुधार करूनच ट्रेडिंग करावी. त्यामुळे हया नियमाचे पालन करा व भावनिक होऊन किंवा इमोशनल होऊन ट्रेडिंग करणे टाळावे.

5. ट्रेडिंगचे व्यसन टाळा । avoid trading addiction

शेअर मार्केट मधील महत्वाचा नियम म्हणजे स्वतःला कधीही ट्रेडिंगचे व्यसन लागू देऊ नका. ट्रेडिंग एक एडिशन प्रमाणे आहे. काही ट्रेडर प्रत्येक दिवशी मार्केट सुरु झाल्या पासून ते मार्केट क्लोज होई प्रयन्त ट्रेड करतच राहतात. त्यांना प्रॉफिट होत आहे, का लॉस होत आहे, याची थोडीपण परवा नसते असे ट्रेडर लवकरच आपला ट्रेडिंग फंड गमावून बसतात.

अशा ट्रेडर जवळ कोणताही ट्रेडिंग प्लॅन नसतो, नाही त्यांना मार्केटचा ट्रेंड माहित असतो. नाही चार्ट पॅटर्न पाहतात, नाही कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहतात. बस ट्रेडिंग करत राहतात. त्यामुळे काही दिवस ट्रेडिंग बंद करून लवकरात लवकर ट्रेडिंगच्या व्यसना पासून दूर राहा व जास्तीत जास्त ट्रेडिंग शिकण्यास भर द्यावा.

6. जास्त रक्कमेने ट्रेड घेणे टाळा । avoid big trade sizing

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंगचा महत्वाचा नियम म्हणजे जास्त रक्कमेने ट्रेड करणे टाळावे म्हणजे जास्त कॉन्टेटी मध्ये ट्रेडिंग करू नये. उदा. कोणी ऑपशन मध्ये ट्रेडिंग करत असेल तर जास्त लॉट मध्ये ट्रेड करणे किंवा कोणी शेअर मध्ये ट्रेडिंग करत असेल तर जास्त शेअरच्या कॉन्टेटी मध्ये ट्रेड करणे. जास्त बिग ट्रेड साईज ठेऊ नये. जेवढी आपण ट्रेडिंग कॉन्टेटी हॅण्डल करू शकतो तेवढ्याच प्रमाणात कॉन्टेटी मध्ये ट्रेड करावे.

काही ट्रेडरची मानसिकता अशी असते कि आपण जास्त कॉन्टेटी मध्ये म्हणजे बिग ट्रेड साईज मध्ये ट्रेडिंग केली तर आपल्याला प्रॉफिट जास्त मिळेल. अशी ट्रेडरची लालची भावना जागृत होते. परंतु जर ट्रेड तुमच्या विरुद्ध गेला तर लॉस पण तेवढाच मोठा होईल.

जेव्हा आपण ग्रीन P&L पाहतो तेव्हा खुश असतो परंतु जेव्हा आपण रेड P&L पाहतो व ट्रेड आपल्या विरुद्ध जात असतो, तेव्हा P&L पाहूनच ट्रेडिंग फेअर होतो व आपण घाबरून जातो. तेव्हा इमोशनल आपल्यावर हावी होतात व चुकीचे निर्णय आपण घेतो.  त्यामुळे असा नियम बनवा कि जास्त कॉन्टेटी मध्ये जास्त रक्कमेचा ट्रेड घेणे टाळावे. छोटी कॉन्टेटी छोटे प्रॉफिट घेणे सर्वात चांगले. बिग ट्रेड साईझ अवाईड करावे.

7. टेक्निकल एनालिसिस शिका । learn technical analysis

शेअर मार्केट मधील अत्यन्त महत्वाचा नियम म्हणजे टेक्निकल एनालिसिस शिका. एक म्हण खूप प्रचलित आहे ती म्हणजे, ‘पहिल्यांदा Learn करा आणि नंतर Earn करा ‘ नवीन ट्रेडर ट्रेडिंगसाठी पैसा उपलब्द करतो. ट्रेडिंग करण्यासाठी पूर्ण दिवस देतो परंतु टेक्निकल एनालिसिस शिकण्यासाठी तो पैसा पण वापरत नाही आणि त्याच्यापाशी शिकण्यासाठी वेळ पण नसतो. हि खेदाची बाब आहे.

त्यामुळे नियम बनवा कि मार्केटमध्ये ट्रेड कमी घेईल परंतु टेक्निकल एनालिसिस शिकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देईल. टेक्निकल एनालिसिस न शिकता तुम्ही ट्रेडिंग करूच शकणार नाहीत. जो पर्यंत तुम्हाला टेक्निकल एनालिसिस येत नाही तो पर्यंत ट्रेडिंग मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेड घेऊ शकणार नाहीत.

8. ट्रेडिंग सायकॉलॉजी शिका । learn trading psychology

ट्रेडिंग मधील महत्वाचा नियम म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजी शिका. ट्रेडिंग सायकॉलॉजी मध्ये ट्रेडरची मानसिकता (mindset) सुधारणे, ट्रेडरच्या वागणूकीचा (behavior) अभ्यास करणे व ट्रेडरच्या भावना (emotion) याची माहिती घेणे खूप गरजेचे आहे. ट्रेडिंग सायकॉलॉजी समजून ट्रेडिंग सायकॉलॉजी डेव्हलप कशी करावी, याचा सखोल अभ्यास करणे खूप महत्वाचे असते.

ट्रेडिंग मध्ये टेक्निकल एनालिसिस पेक्षा ट्रेडिंग सायकॉलॉजी डेव्हलप करणे खूप महत्वाचे असते. एखादा ट्रेड घेतल्या नंतर, किंवा ट्रेड घेण्याच्या अगोदर किंवा ट्रेड मधून बाहेर पडल्या नंतर एक ट्रेडरची काय मानसिकता असते, तो कोणतेकोणते विचार करतो किंवा त्याच्या मनामध्ये काय काय विचार येतात याची माहिती घेऊन त्या मध्ये सुधार करणे हे ट्रेडिंग सायकॉलॉजी चे काम आहे.

ट्रेड घेतल्या नंतर भीती, लालच, पच्छाताप, आनंदी भावना, ओव्हर कॉन्फिडन्स, राग येणे, मन बेचेन होणे, शंका, सुडबुद्धीची भावना, जास्त आशा म्हणजे जास्त भरोसा बाळगणे, मनात गर्वाची भावना निर्माण होणे अश्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ट्रेडिंग सायकॉलॉजी शिकण्याचा व ट्रेडिंग सायकॉलॉजी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा.

9. नेहमी स्टॉप लॉसचा वापर करा । always use a stop loss

ट्रेडिंगमधील महत्वाचा नियम म्हणजे नेहमी स्टॉप लॉसचा वापर करावा. ट्रेडिंग मध्ये जर तुम्हाला टार्गेट माहित नसेल तरी चालते परंतु स्टॉप लॉस आपला कोठे असणार आहे हे माहित असणे खप गरजेचे आहे. स्टॉप लॉस हा ट्रेडिंगचा अविभाज्य भाग आहे. कोणताही ट्रेड घेतला म्हणजे आपले टार्गेट कोणकोणते आहेत व आपला स्टॉप लॉस कोठे आहे हे माहित असणे खूप गरजेचे आहे.

सक्सेसफुल ट्रेडर हा ट्रेड घेण्याच्या अगोदरच आपला स्टॉप लॉस कोठे असेल किंवा आपला स्टॉप लॉस हा किती रुपयांचा आहे आपण स्टॉप लॉस मध्ये झालेल्या लॉसला सहन करू शकतो का या पूर्ण गोष्टीचा अगोदरच विचार करतो. परंतु नवीन ट्रेडर हा अगोदर ट्रेड घेतो आणि नंतर स्टॉप लॉसचा विचार करतो कि ट्रेड मधून कोठे बाहेत पडावे याचा विचार करतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो. 

स्टॉप लॉस म्हणजे जास्तीच्या होणाऱ्या लॉसला वेळे अगोदरच लवकर स्टॉप करणे. परंतु नवीन ट्रेडर हे या महत्वाच्या नियमाचे पालन करीत नाहीत. त्यांना स्टॉप लॉस लावणे म्हणजे लॉस करणे असे समजतात, त्यांना असे वाटते कि, स्टॉप लॉस हा हिट होण्यासाठीच असतो अशी चुकीची भावना मनात ठेवतात. परंतु स्टॉप लॉस हा लॉस करण्यासाठी नाही तर जास्तीचे लॉस होण्यापासून वाचण्यासाठी स्टॉप लॉस लावतात.

स्टॉप लॉस लावल्यामुळे ट्रेडरच्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. ट्रेडर ट्रेड मध्ये फसत नाही म्हणजे ट्रेड मध्ये ट्रेडर ट्रॅप होत नाही. स्टॉप लॉस मुळे तुम्हाला जास्तीचा होणारा लॉस वाचतो. त्यामुळे ट्रेड मध्ये स्टॉप लॉस आवश्य लावावा. जर स्टॉप लॉस हिट झाला तर आनंदाने तो लॉस स्वीकारावा. स्टॉप लॉसचा वापर न करता जर आपण ट्रेड घेतला म्हणजे आपण गेम्बलिंग करत आहोत असे समजावे. त्यामुळे नेहमी स्टॉप लॉसचा वापर करावा तसेच या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे.

10. ट्रेडिंग जर्नल लिहिण्याची सवय ठेवा । maintain a trading journal

ट्रेडिंग मधील अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे ट्रेडिंग जर्नल लिहिण्याची सवय ठेवावी. आपण शाळेत, लहानपणी किंवा आत्ता सुद्धा आपल्याला डायरी लिहिण्याची सवय तर असेलच की ? त्या प्रमाणेच ट्रेडिंग जर्नल लिहिणे म्हणजे डायरी लिहिण्या सारखेच. डायरी मध्ये आपण दैनंदिन आपल्या सोबत काय घडले ? आपण काय काय केले याची नोंद लिहीत असतो.

या प्रमाणेच आपण ट्रेडिंग करत असताना व ट्रेड पूर्ण झाल्यानंतर किंवा तुमच्या वेळेनुसार आपण घेतलेल्या ट्रेडची नोंद ट्रेडिंग जर्नलमध्ये करावी, आपले टार्गेट हिट झाले का ? स्टॉप लॉस हिट झाला का ? आपण किती ट्रेड घेतले, लॉस किती झाला, प्रॉफिट किती झाले, आपण ट्रेड कोणत्या कारणामुळे घेतला, स्टॉप लॉस हिट झाला तर का बरे हिट झाला याची माहिती, आपण कोण कोणत्या चुका केल्या ? आपण केलेल्या चुकांची ट्रेडिंग जर्नलमध्ये नोंद करावी. ट्रेडिंग जर्नल लिहिण्यामुळे आपल्याला चुका सुधारतात, ट्रेडिंग माइंड सेट डेव्हलप होतो, जास्त लॉस होत नाही, त्यामुळे ट्रेडिंग जर्नल लिहिण्याची सवय ठेवावी.

निष्कर्ष :-

मित्रांनो ट्रेडिंग हा एक बिजनेस आहे. या मध्ये आपल्यावर काही निर्बंध लादणे गरजेचे असते. ट्रेडिंग रुल्स समजणे, लक्षात ठेवणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे खूप गरजेचे असते. वरील रुल्सची एक लिस्ट बनवून आपल्या ट्रेडिंग रूम मध्ये आवश्य लावावी. ट्रेडिंग सुरु करण्याच्या अगोदर हे नियम वाचावे. जेणे करून तुमच्या ट्रेडिंग मध्ये चुका होणार नाहीत. वरील रूल्सचे तुम्ही पालन केले तर तुमचे लॉसेस कमी होऊन अधिकाधीक प्रॉफिट होईल. तेव्हाच तुम्ही एक प्रॉफेटेबल व सक्सेसफुल ट्रेडर बनाल.

डिस्क्लेमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करते वेळी मिस्टेक्स होत असतील तर किंवा लॉस होत असेल तर शेअर मार्केट मधील नवीन ट्रेडर्सच्या 10 चुका | Trading Mistakes Marathi या पोस्टला अवश्य भेट द्या.

धन्यवाद.

FAQ :-

स्टॉप लॉस म्हणजे काय ?

स्टॉप लॉस म्हणजे जास्तीच्या होणाऱ्या लॉसला वेळे अगोदरच लवकर स्टॉप करणे.

ट्रेडिंग प्लॅन म्हणजे काय ?

ट्रेडिंग प्लॅन म्हणजे  Trading Strategy किंवा Technical Setup जो कि आपण टेक्निकल एनालिसिस करून बनवला जातो.

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!