या पोस्टमध्ये आपण (Small & Medium Enterprises) किंवा SME IPO म्हणजे काय ?| sme ipo means in marathi ? या विषयी माहिती घेणार आहोत.
मित्रांनो IPO म्हणजे काय ? या पोस्टमध्ये आपण IPO विषयी माहिती घेतलेली आहे. एक म्हणजे Mainline IPO ज्याला आपण Main Bord IPO असे म्हणतो. परंतु SME IPO म्हणजे काय ? किंवा sme ipo means in marathi ? या विषयी माहिती घेणे पण खूप गरजेचे व आवश्यक आहे. म्हणतात कि, SME IPO हा गुंतवणूक करण्यास खूप चांगला मार्ग आहे, परंतु हा मार्ग खूप रिस्की पण आहे. SME IPO मध्ये प्रॉफिट होण्याची जेवढी संभावना असते तेव्हडीच नुकसान होण्याची पण दाट शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊ कि SME IPO म्हणजे काय?
SME IPO म्हणजे काय ?। SME IPO Means in Marathi
मित्रांनो, एखादी नवीन कंपनी सुरू होते. म्हणजे Start Up होते. तेंव्हा कालांतराने त्या कंपनीला महत्वाची गरज असते ती ‘फंड’ म्हणजे पैशाची. एक किंवा एका पेक्षा जास्त व्यक्ती मिळून एक कंपनी सुरु करतात तेंव्हा त्यांनी त्यांच्या जवळचे भांडवल कंपनी सुरू करण्यासाठी लावतात, परंतु कुठेतरी कंपनी ग्रो करण्यासाठी किंवा कंपनीचा व्यापार वाढवण्यासाठी पैशाची गरज तर लागतेच. तेंव्हा कंपनीला भांडवल पुरवणारे गुंतवणूकदार यांच्याकडे किंवा एखाद्या बँकेकडे कर्ज घेण्यासाठी कंपनी जाते.
कंपनी जर चांगली रेपुडेड कंपनी असेल तर बँक लोन देतात. परंतु अशा नवीन कंपनीमध्ये मोठे इन्व्हेस्टर किंवा बँका लोन देण्यास लवकर तयार होत नाहीत कारण अशा नवीन कंपन्या लवकर बंद पडण्याची जास्त शक्यता असते. परंतु छोट्या व मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांना सोप्या पद्धतीने व सहज कंपनीला आपले भांडवल उभा करण्यास मदत म्हणून SME IPO ची संकल्पना आमलात आणली.
SME या शब्दाचा लॉंगफॉर्म ‘S’ म्हणजे Small, ‘M’ म्हणजे Medium व ‘E’ म्हणजे Enterprises.
SME म्हणजे Small and Medium Enterprises जेव्हा मध्यम व लहान आकाराच्या कंपन्या ज्यांची उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशा कंपन्या जेव्हा IPO लॉन्च करतात अश्या IPO ला SME IPO असे म्हणतात.
तसेच मेनबोर्ड IPO मध्ये किमान इश्यू पोस्ट-अप पेड अप भांडवल रु. 10 कोटी असलेल्या कंपन्या ज्या शेअर्स जारी करून सार्वजनिक होतात त्यांना मेनबोर्ड IPO किंवा नियमित IPO असे म्हणतात.
मित्रांनो, असे म्हणतात कि, नवीन सुरू होणाऱ्या कंपन्या ह्या देशाच्या पाठीचा कणा असतो. अशा कंपन्या देशाची जीडीपी वाढवण्यासाठी व कामगारांना रोजगार देण्याचे खूप मोलाचे काम करू शकतात. या गोष्टीचा विचार करूनच BSE (Bombay Stock Exchange) या एक्सचेंज ने 13 मार्च 2012 रोजी BSE SME हा प्लॅटफॉर्म सुरु केला व NSE (National Stock Exchange) या एक्सचेंज NSE Emerge हा प्लॅटफॉर्म सुरु केला.
मेन बोर्ड IPO व SME IPO मधील फरक । differences between main board ipo and sme ipo
मित्रांनो, मेन बोर्ड IPO व SME IPO यामधील फरक तुम्हाला खालील पॉईंटच्या आधारे समजण्यास मदत मिळेल.
- मेन बोर्ड IPO मधील कंपनीचे इश्यू पोस्ट-अप पेड अप कॅपिटल हे कमीत कमी 10 कोटी रुपये असावे लागते. तर SME IPO मधील कंपनीचे इश्यू पोस्ट-अप पेड अप कॅपिटल कमीत कमी 1 कोटी व जास्तीत जास्त 25 कोटी असावे लागते.
- मेन बोर्ड IPO मधील IPO वाटपाची संख्या किमान 1000 असावी लागते व SME IPO मधील IPO वाटपाची संख्या किमान 50 असावी लागते.
- मेन बोर्ड IPO मध्ये जर QIB चा 50% कोटा असेल तर IPO ची अंडररायटिंग अनिवार्य नसते, परंतु SME IPO मध्ये 100% मर्चंड बँकची जोखीम व कंपनीचे 15% जोखीम घेते व अंडररायटिंग अनिवार्य असते.
- मेन बोर्ड IPO मधील कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड संबधी अतिशय कडक नियम असतात व SME IPO मधील कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड संबधी नियम कडक नसतात.
- मेन बोर्ड IPO मध्ये कंपनीच्या कागदपत्रांची पडताळणी SEBI करते व SME IPO मधील कंपनीच्या कागदपत्रांची पडताळणी स्टॉक एक्सचेंज करते.
- मेन बोर्ड IPO येण्यास किमान 6 महिने लागतात व SME IPO येण्यास किमान 3 ते 4 महिने लागतात.
- मेन बोर्ड IPO मध्ये भाग घेण्यास किमान 10000/- ते -15000/- हजार रुपये लागतात तर SME IPO मध्ये भाग घेण्यास किमान 1 लाख रुपये लागतात.
- मेन बोर्ड IPO हा दोन्ही हि म्हणजे BSE व NSE या एक्सचेंज सूचिबद्ध होऊ शकतो. परंतु SME IPO हा BSE SME किंवा NSE Emerge या दोन्हीपैकी एकाच एक्सचेंज वर सूचिबद्ध होऊ शकतो.
- मेन बोर्ड IPO मधील कंपनीला तीन महिन्यात आपला अहवाल सादर करावा लागतो तर SME IPO मधील कंपनीला सहा महिन्यात आपला अहवाल सादर करावा लागतो.
SME IPO मध्ये भाग घेण्याची प्रकीर्या । how to apply for sme ipo
मित्रांनो, SME IPO मध्ये भाग घेण्याची प्रक्रिया सुद्धा नॉर्मल IPO सारखीच असते. SME IPO मध्ये भाग घेण्याची सुविधा कोणतेही Broker App किंवा Broker Website वर उपलब्ध असते. SME IPO मध्ये तुम्ही UPI द्वारे किंवा आपल्या सेविंग अकाउंट खात्याद्वारे App मध्ये APPLY करू शकता.
Zerodha, Upstox, Dhan App किंवा इत्तर ब्रोकर App द्वारे आपण SME IPO मध्ये भाग घेऊ शकता. Broker App मध्ये IPO सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला कोणत्या SME IPO मध्ये भाग घ्यावयाचा तो निवडावा. कोणता IPO हा SME IPO आहे हे ओळखण्यासाठी IPO ची भरण्याची रक्कम पहावी जर IPO मध्ये भाग घेण्याची रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असेल तर तो SME IPO असे समजावा.
नंतर त्या IPO च्या नावापुढे BSE SME किंवा NSE SME असा उल्लेख असतो. SME IPO हा फिक्स प्राईज किंवा बुक बिल्डिंग SME IPO या दोन्ही प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो. तसेच SME IPO मध्ये भाग घेते वेळेस त्यामध्ये IPO विषयी माहिती दिलेली असते, ज्यामध्ये Issue Size ची अमाऊंट रक्कम असते. SME IPO केव्हा ओपन होणार आहे. केंव्हा क्लोज होणार आहे, SME IPO मध्ये कंपनी किती शेअर्स ऑफर करणार आहे, शेअरचा प्राईज, आणि महत्वाचे म्हणजे मिनिमम लॉट साईझ किती आहे, या विषयी सविस्तर माहिती दिलेली असते.
तसेच SME IPO ची टाईम लाईन दिली जाते. तसेच रिटेल गुंतवणूकदार कमीत कमी किती लॉट म्हणजे किती रक्कमेची गुंतवणूक करू शकतो व जास्तीत जास्त किती लॉट म्हणजे किती रक्कमेची गुंतवणूक करू शकतो या विषयी माहिती दिलेली असते. सरासरी रिटेल इन्व्हेस्टर किमान 5 लाख रूपयेची गुंतवणूक करू शकतो.
तसेच SME IPO मध्ये शेअर्स ऑलॉटमेंट कोणत्या तारखेला होणार आहे. जर आपल्याला IPO अलोट नाही झाला तर अमाऊंट रिफंड कोणत्या तारखेला मिळेल, जर शेअर्स अलोट झाले तर शेअर्स डिमेंट अकाउंट मध्ये केंव्हा येणार व लिस्टिंग केंव्हा होणार या विषयी माहिती दिली जाते.
महत्वाची गोष्ट म्हणजे जर कोणत्या SME IPO ची बुक बिल्डिंग प्राईज प्रकारामध्ये जर असेल तर IPO मध्ये भाग घेते वेळेस Cutoff Price वर टिक करूनच IPO भरावा, जेणे करून IPO जर मिळाला तर IPO कमीत कमी किती प्राईजवर अलोट झाला त्या प्राईजवर आपल्याला लॉट मिळतो. SME IPO चे पेमेंट आपण UPI द्वारे किंवा सेव्हीग बँक अकाउंट द्वारे कोणत्याही UPI App द्वारे पेमेंट करू शकता.
परंतु आपण ज्या Broker App ला आपले सेव्हीग अकाउंट जोडलेले आहे त्याच अकाउंट मधून पेमेंट करावे. SME IPO ची रक्कम आपल्या सेव्हीग अकाउंट मध्ये ब्लॉक होते, रक्कम डिट्क्ट होत नाही, जेंव्हा आपल्याला IPO इशू होतो तेव्हाच आपली रक्कम कंपनीला जाते व आपले शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये येतात. जर IPO आपल्याला नाही मिळाला तर ब्लॉक झालेली रक्कम अनब्लॉक होते.
SME IPO चे फायदे व नुकसान
मित्रांनो, SME IPO मध्ये जसे फायदे आहेत तसेच नुकसान पण होऊ शकते. SME IPO घेऊन येणाऱ्या कंपन्या खूप अर्ली स्टेज वर असतात. अशा कंपनीवर SEBI चे कठोर नियम नसतात. त्यामुळे अशा IPO मध्ये भाग घेणे म्हणजे रिस्क घेणे होय. जर तुम्ही रिस्क घेण्यास तयार असताल तर तुम्ही भाग घेतलेल्या IPO मधील एखादी कंपनी हि मल्टिबॅगर कंपनी निघू शकते. ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिटन मिळू शकते.
मित्रांनो, SME IPO मध्ये भाग घेतेवेळेस कंपनी विषयी माहिती कमी असते कारण अशा कंपनी विषयी आवश्यक असणारा डेटा खूप कमी असतो त्यामुळे IPO मध्ये भाग घेणे म्हणजे जोखीम पत्कारावी लागते.
मित्रांनो, रिटेल इन्वेस्टर चा विचार जर केला तर SME IPO मध्ये भाग घेण्यासाठी लागणारी रक्कम हि खूप जास्त आहे, किमान 1 लाख रक्कम असते सामान्य रिटेल इन्वेस्टरसाठी खूप जास्त रक्कम आहे. परंतु कधी कधी IPO चांगला निघाला तर 1 लाखाचे कधी २ लाख होतील सांगता येत नाही.
मित्रांनो, SME IPO मध्ये लॉट मध्ये ट्रेडिंग होते, SME IPO मध्ये सुद्धा किमान 1 लॉटनेच APPLY करू शकतात. आणि नंतर विक्री करते वेळेस सुद्धा आपल्याला पूर्ण लॉटच विक्री करावा लागतो, तसेच त्या स्टॉकची ट्रेडिंग करते वेळी व्हॉल्युम नसतो तेव्हा विक्री करण्यास खूप अडचण निर्माण होते. लॉंगटर्म इन्वेस्टमेन्ट केली तर चांगला फायदा होण्याची शक्यता असते.
पूर्ण ट्रेडिंग हि लॉट मध्येच होते, मेनबोर्ड IPO सारखे आपण एक या दोन शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाहीत, खरेदी केला तर एक लॉटच खरेदी करावा लागतो व विक्री केला तर एक लॉटनेच विक्री करावा लागतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो SME IPO व Main Bord IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा चांगला मार्ग आहे. Main Bord IPO मधील कंपन्या अगोदरच काही वर्षा पासून बिजनेस करत असतात, आणि त्यांनी चांगल्याप्रमाणे ग्रोथ केलेली असते. परंतु SME IPO मधील कंपन्या नविन असल्यामुळे जर आपण SME IPO च्या मार्गाने त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली व पुढे चालून ती कंपनी मल्टिबॅगर कंपनी निघाली तर चांगला फायदा होतो. परंतु कंपनीचा अभ्यास म्हणजे फंडामेंटल एनालिसिस करूनच SME IPO मध्ये भाग घ्यावा.
SME IPO मध्ये भाग घेणे खूप सोपे झाले आहे. आपल्या ब्रोकर ने उपलब्द करून दिलेल्या Broker App किंवा Broker Website द्वारे IPO मध्ये भाग घेता येतो.
डिस्केलमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्धेशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.
Main Bord IPO विषयी किंवा IPO विषयी अधिक माहिती घेण्यासाठी IPO म्हणजे काय ? या पोस्टला जरूर भेट द्या.
धन्यवाद !
FAQ:-
SME IPO म्हणजे काय ?
SME म्हणजे Small and Medium Enterprises जेव्हा मध्यम व लहान आकाराच्या कंपन्या ज्यांची उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशा कंपन्या जेव्हा IPO लॉन्च करतात अश्या IPO ला SME IPO असे म्हणतात.