टॉप 4 चार्टचे प्रकार । Charts in Technical Analysis in Marathi

5/5 - (5 votes)

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण charts in technical analysis in marathi | टॉप 4 चार्टचे प्रकार आपण पाहणार आहोत. शेअर मार्केटमध्ये चार्टला खूप महत्त्व आहे. आपण चार्ट शिवाय शेअर मार्केट मध्ये टेक्निकल एनालिसिस किंवा ट्रेडिंग करूच शकणार नाहीत. 

शेअर मार्केटमध्ये टेक्निकल एनालिसिसला खूप महत्त्व आहे. परंतु, चार्ट म्हणजे काय ? व चार्टचे प्रकार, यांची माहिती असल्याशिवाय टेक्निकल एनालिसिस समजणे व टेक्निकल एनालिसिस करणे खूप कठीण आहे. चार्ट हा टेक्निकल एनालिसिसचा मुख्य भाग आहे. म्हणजे टेक्निकल एनालिसिस शिकण्याची सुरवातच चार्ट पासून होते. या पोस्टमध्ये आपल्याला charts in technical analysis in marathi व शेअर मार्केटमध्ये जास्त वापरले जाणारे टॉप 4 चार्टचे प्रकार पाहणार आहोत व त्याची माहिती आपण घेणार आहोत.

चार्ट म्हणजे काय ? । what is a chart ?

चार्ट म्हणजे काय ? याची व्याख्या करणे तसे कठीण आहे. परंतु काही संशोधकाने व्याख्या केली आहे. चार्ट म्हणजे काय ? हे जर तुम्हाला सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, चार्ट म्हणजे असे रेखाचित्र, जाच्याद्वारे डेटा प्रदर्शित करू शकता. यामुळे डेटा समजण्यास सोपा जातो व भविष्यात तो डेटा काय असू शकतो त्याचे अनुमान सुद्धा लावू शकतो.

चार्टद्वारे Data चे ग्राफिक स्वरूपात प्रेझंटेशन करणे. ज्यामुळे आपल्याला तो Data Graphical स्वरूपात असेल तर तो Data समजणे अतिशय सोपे होते व त्या Data च्या आधारावर आपण पुढील निर्णय घेऊ शकतो. चार्टला आपण  ग्राफ, आलेख, रेखाचित्र, रेखातक्ता अशा नावाने सुद्धा ओळखु शकतो. चार्ट म्हणजे उपलब्द असलेली माहिती सरळ व सोप्या पद्धतीने प्रदर्शित करणे होय.

चार्टमुळे उपलब्ध होणाऱ्या माहितीचे आपण सहज व सोप्या पद्धतीने आकलन करू शकतो. चार्ट पाहून आपण वर्तमान मध्ये असणारा डेटा व भविष्यामध्ये त्या डेटाचे काय परिवर्तन होईल याचा आपण अंदाज लावू शकतो. फायनांशियल क्षेत्रात चार्टला खूप महत्त्व आहे.

जेव्हा एखादा  डेटा  ग्राफ, रेखाचित्र, आलेख यांच्या स्वरूपात मांडला जातो तेव्हा आपण त्याला चार्ट असे म्हणू शकतो. सध्याच्या काळात चार्टला खूप महत्व आहे. कारण कोणत्याही क्षेत्रात डेटाचे महत्व पहाता डेटाची माहिती घेण्यासाठी चार्ट हे खूप महत्वाचे साधन आहे. म्हणूनच Data ला समजण्यासाठी चार्टचा वापर करतात.

शेअर मार्केटमध्ये जास्त लोकप्रिय 4 चार्ट आहेत.

1. लाईन चार्ट (Line Chart)

2. बार चार्ट (Bar Chart)

3. कॅन्डलस्टिक चार्ट (Candlestick Chart)

4. हेकेनाशी चार्ट (Heikin Ashi)

टेक्निकल एनालिसिस मधील चार्ट । charts in technical analysis in marathi

मित्रांनो सध्या चार्टचे अनेक प्रकार आहेत. TradingView या वेबसाईट वर आपणास वेगवेगळे चार्टचे प्रकार पाहावयास मिळतात. त्या चार्टचा वापर करून कोणत्याही स्टॉकचा किंवा इंडेक्स चा आपण टेक्निकल एनालिसिस करू शकतो किंवा ट्रेडिंग करते वेळी त्याचा आपण वापर करू शकतो.

स्टॉक मार्केट मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक ट्रेडरला किंवा इन्वेस्टरला चार्टचे कोण कोणते प्रकार आहेत जेणे करून त्या चार्टचा वापर करून आपण टेक्निकल एनालिसिस करू शकतो याची माहिती असणे गरजेचे असते. सर्वजण सर्वच चार्टचा वापर करतात असं नाही, परंतु ज्या ट्रेडरला जो चार्ट समजण्यास सोपा वाटतो तो ट्रेडर टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी त्या चार्टचा वापर करतो.

चार्टचे प्रकार । types of chart

स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी Bars chart, Candlestick chart, Hollow candles chart, Columns chart, Line chart, Line with markers chart, Step line chart, Area chart, HLC area chart, Baseline chart, High-low chart, Heikin Ashi chart, Renko chart, Line break chart, Kagi chart, Point & figure chart, Range chart या चार्टचा वापर ट्रेडर व गुंतवणूकदार करतात.

टेक्निकल एनालिसिसमध्ये चार्टची भूमिका । role of charts in technical analysis

मित्रांनो समजा, NSE किंवा BSE या Exchange वर एक स्टॉक ट्रेड करत आहे. ट्रेडींगच्या कालावधीमध्ये त्या शेअरची प्राईस व शेअरची कॉन्टेटी मध्ये अनेक बदल होत असतात. मग ते बदल पॉजिटिव्ह किंवा निगेटिव्ह पण असू शकतात. काही वेळाने त्या  शेअरची प्राईस वाढू शकते किंवा त्या शेअरची प्राईस कमी पण होऊ शकते.

तेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्या शेअर चा जो डेटा उपलब्द होतो त्या डेटाच्या रेकॉर्डची नोंद आपण कशी ठेवताल ? जर त्याची नोंद ठेवली तरी आपण एखादा नोटबूकमध्ये टेबल बनवून त्याची आपण नोंद कराल, परंतु त्या डेटाला स्टडी करण्यासाठी किंवा तो डेटा वाचण्यासाठी खूप मेहनत लागेल. हेच काम आपल्यासाठी त्या शेअरचा टेक्निकल चार्ट करतो.

वाचा : ट्रेडिंगचे 10 महत्वाचे नियम.

टेक्निकल चार्ट हे असे टूल आहे जे कि, शेअरचा डेटा ग्राफच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो व तो डेटा पाहून निष्कर्स काढणे किंवा तो डेटा वाचणे सोपे होते. टेक्निकल चार्ट आपल्याला प्रत्येक मिनिटामध्ये शेअरची प्राईस व शेअरची कॉन्टेटी यांची निश्चित व अचूक माहिती देतो. मग तो चालू असणारा ट्रेडींगचा दिवस असू किंवा भूतकाळातील वर्षांचा किंवा महिण्याचा असणारा शेअरच्या डेटाची माहिती आपल्याला टेक्निकल चार्ट रूपात पहायला मिळू शकते.

काही टेक्निकल चार्ट आपल्याला शेअरची opening price, closing price, Lowest price, High price याची व्यापक रूपात व बरोबर माहिती दर्शवतो यामुळेच चार्टला टेक्निकल एनालिसिसचा आधार व प्रमुख घटक मानला जातो. म्हणूनच टेक्निकल एनालिसिसमध्ये चार्टची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

टेक्निकल एनालिसिसमध्ये लोकप्रिय असणारे टॉप 4 चार्ट चे प्रकार

मित्रांनो शेअर मार्केटमध्ये टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी कॅन्डलस्टिक चार्ट (Candlestick Chart) हा खूप लोकप्रिय चार्टचा प्रकार आहे, परंतु टेक्निकल एनालिसिसच्या प्लॅटफॉर्म वर अनेक चार्ट उपलब्द आहेत. त्या चार्टला काही महत्त्व आहे का? ट्रेडर कॅन्डलस्टिक चार्ट सोडून दुसऱ्या चार्टचा का बरे उपयोग करत असतील ? असे तुम्हाला प्रश्न पडलेले असतील तर आपण असे  ४ चार्टचे प्रकार पाहणार आहोत व त्याची माहिती घेणार आहोत.

1. लाईन चार्ट । line charts in technical analysis

मित्रांनो टेक्निकल एनालिसिसमध्ये चार्टचे महत्त्व पाहता लाईन चार्ट (Line Chart) हा Basic chart आहे असे मानले जाते. म्हणजे हा चार्ट ट्रेडरला टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी मुख्य व मूलभूत चार्ट आहे. लाईन चार्ट हा समजण्यास सोपा असतो. लाईन चार्ट (Line Chart) हा वेळेवर आधारित चार्ट आहे. जे कि, आपण निवडलेल्या एका विशिष्ट टाइम फ्रेमच्या अंतराने Closing Price दर्शवतो.

टाइम फ्रेम हा एक महिन्याचा असू शकतो, एक तासाचा असू शकतो किंवा एक मिनिटाचा पण असू शकतो. (उदा. आपण जर लाईन चार्टमधे पाच मिनिटाचा टाइम फ्रेम निवडला असेल तर प्रत्येकी पाच मिनिटात त्या स्टॉक किंवा सेक्युरिटीजची Closing झालेली Price दर्शवतो.) लाईन चार्ट (Line Chart) मध्ये स्टॉक किंवा सेक्युरीटीज यांची फक्त Closing Price दर्शवतो. स्टॉकच्या प्राईज मुव्हमेंटच्या आधारावर एक लाईन तयार होते, जी कि Closing Price एकमेकास जोडलेले असतात. म्हणूनच याला आपण लाईन चार्ट (Line Chart) असे म्हणतो.

Line Chart
Line Chart

लाईन चार्ट (Line Chart) मध्ये आपण Trend Line काढणे, Support & Resistance काढणे, Chart Pattern पाहणे व समजणे दुसऱ्या चार्ट पेक्षा सोपे जाते. लाईन चार्ट मध्ये कॅन्डलस्टिक सारखी शॅडो नसतो त्यामुळे हा चार्ट एकदम साफ दिसतो. लाईन चार्ट (Line Chart) चा उपयोग आपण ट्रेंड लाईन, सपोर्ट अँड रेसिडन्स आणि वेगवेगळे चार्ट पॅटर्न पाहण्यासाठी करू शकतो. तसेच हा दिसण्यास साफ असल्यामुळे चार्ट पॅटर्न ड्रॉ करण्यास सोपे जाते. या चार्टमधे स्टॉकचा अप ट्रेंड चालू आहे का, डाऊन ट्रेंड चालू आहे हे पहाण्यासाठी ट्रेडर या चार्टचा उपयोग करतात.

2. बार चार्ट । bar charts in technical analysis

मित्रांनो दुसरा एक महत्वाचा चार्ट आहे तो म्हणजे बार चार्ट (Bar Chart). बार चार्ट हा लाईन चार्ट पेक्षा अधिक माहिती ट्रेडरला देतो. बार चार्ट म्हणजे आपण निवडलेल्या एका विशिष्ट टाइम फ्रेम मधील स्टॉक किंवा सेक्युरीटीजची opening price, closing price, Lowest price, High price हे चार पॉईंट मिळून एक ग्राफिकल रिप्रेझंटेशन दर्शवते यालाच आपण बार चार्ट असे म्हणतो.

बार चार्ट मध्ये एक मध्य भागी उभी रेषा असते जी कि, Low price ला High price ने जोडली जाते, व हा बार आपण निवडलेल्या विशिष्ट टाइम फ्रेम मध्ये प्राईजची मुव्हमेंट दर्शवते. उभ्या रेषेमधील सर्वात वरचे टोक हे High price व सर्वात खालचे टोक हे Lowest price व त्या बारच्या डाव्या बाजूची आडवी रेषा हि opening price व उजव्या बाजूची आडवी रेषा हि closing price दर्शवते. यालाच बार चार्ट असे म्हणतात.

Bar Chart
Bar Chart

बार चार हा कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये असू शकतो. तो टाइम फ्रेम एक दिवसाचा असू शकतो, एक तासाचा असू शकतो किंवा एक मिनिटाचा पण असू शकतो. आपणास हव्या असलेल्या टाइम फ्रेममध्ये आपण टेकनिकाल एनालिसिस करू शकतो.

बुलिश बार हा ग्रीन (हिरवा) कलरचा असतो व बेरिश बार हा रेड (लाल) कलरचा असतो, बुलिश बार opening price हि खाली असते व closing price हि वर असते. तसेच बेरिश बार मध्ये opening price हि वर असते व closing price हि खाली असते. बारचा कलर आपल्याला आवडत असलेल्या कलर मध्ये सुद्धा बदलू शकतो ते आपल्या मर्जीवर अवलंबून असते.

बार चार्ट हि एक जुनी चार्ट पद्धत आहे. बार चार्ट मध्ये एक गोष्ट आहे, जी कि ट्रेडरला न आवडणारी आहे, ती म्हणजे बार चार्ट हा दिसण्यास आकर्षक नाही. एका दिवसात ट्रेडरने वेगवेगळे बार चार्ट पहिले तर त्याला चार्ट समजण्यास खूप कठीण व बार चार्टचा वापर करून टेक्निकल एनालिसिस करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.

3. कॅन्डलस्टिक चार्ट । candlestick chart in technical analysis

मित्रांनो टेक्निकल एनालिसिस मध्ये चार्टला खूप महत्त्व आहे. आजचा सर्वात पॉपीलर व फेमस चार्ट प्रकार म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट (Candlestick Chart) होय. कॅन्डलस्टिक चार्ट हा लोकप्रिय चार्टचा प्रकार आहे. कॅन्डलस्टिक चार्ट समजण्यासाठी कॅन्डलस्टिक विषयी माहिती असणे खूप गरजेचे आहे. कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये कॅन्डलस्टिक हि एक मेणबत्तीच्या आकाराची आयताकृती असते. तिला आपण कॅण्डल असे सुद्धा म्हणतो.

एक कॅन्डलस्टिक वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये असू शकते. एक  कॅन्डलस्टिक एका वर्षाची असू शकते, विकली (weekly) असू शकते किंवा पाच मिनिटाची पण असू शकते. कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये एक महिन्याचा टाइम फ्रेम लावला तर ती कॅण्डल एक महिन्याची opening price, closing price, Lowest price, High price चार पॉईंट मिळून एक ग्राफिकल रिप्रेझंटेशन दर्शवते यालाच आपण कॅन्डलस्टिक चार्ट असे म्हणतो.

Candlestick Chart
Candlestick Chart

कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये एक कॅन्डलस्टिक आपण निवडलेल्या टाइम फ्रेम मध्ये स्टॉक किंवा सेक्युरिटीजच्या चार प्राईज पॉईंटला दर्शवते. म्हणजे त्या स्टॉक किंवा सेक्युरिटीजची प्राईज कोठून सुरवात झाली, त्याची सर्वात कमी प्राईज किती, सर्वात जास्तीची प्राईज किती व त्या टाइम फ्रेम मध्ये प्राईज कितीला बंद झाला, याची सटीक माहिती मिळते.

कॅन्डलस्टिकचे तीन मुख्य भाग असतात. 1. Upper Shadow, 2. Body 3. Lower Shadow असतात. कॅन्डलस्टिक सर्वात वरच्या भागाची जी वीक असते तिला आपण Upper Shadow असे म्हणतात, कॅन्डलस्टिकच्या सर्वात खालच्या भागाची जी वीक असते तिला आपण Lower Shadow असे म्हणतात. परंतु काही कॅन्डलस्टिक हि opening price पासून सुरुवात होते ते थेट closing price ला ती कॅन्डलस्टिक संपते तेव्हा Shadow निर्माण होत नाही.

कॅन्डलस्टिक मधील मधला भाग म्हणजे Body होय. कॅन्डलस्टिक ची Body हि opening price व closing price दर्शवते. कॅन्डलस्टिक मुख्य करून दोन प्रकारच्या असतात. एकाला आपण 1. Bullish Candle/Positive Candle व दुसरी 2. Bearish Candle/Negative Candle असे म्हणतो.

4. हैकिनाशी चार्ट । heikin ashi chart

मित्रांनो महत्वाचा चार्ट म्हणजे हेकेनाशी चार्ट (Heikin Ashi) चार्ट. स्टॉक मार्केट, ट्रेडरचे व कमोडिटी मार्केटचे भगवान मानले जाणारे Munehisa Homma यांनीच शोध लावला. त्यांना ‘जापानी कॅन्डलस्टिक’ चे जनक मानले जातात. Heikin Ashi चार्टला आपण Average Chart असे सुद्धा म्हटले जाते.

Heikin Ashi हा जापानी शब्द आहे. Heikin Ashi पैकी Heikin या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘सरासरी’ व Ashi या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘बार’ असा आहे. Heikin Ashi कॅन्डलस्टिक हि साधारण कॅन्डलस्टिक सारखीच असते. परंतु साधारण कॅन्डलस्टिक ची Average कॅन्डलस्टिक असते, म्हणून तिला Average Bar असे सुद्धा म्हणतात.

Heikin Ashi Chart
Heikin Ashi Chart

Heikin Ashi कॅन्डलस्टिक बनते कशी ? त्याचा Calculation Formula कसा असतो ते पाहू. Heikin Ashi कॅन्डलस्टिकची Open Price हि अगोदरच्या Heikin Ashi कॅन्डलस्टिकची Open Price व Close Price यांची बेरीज करून त्याला 2 (दोन) ने भाग दिला जातो व येणारी संख्या हि त्या कॅन्डलस्टिकची Open Price असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अगोदरच्या Heikin Ashi कॅन्डलस्टिकचा मिड पॉईंट असतो तो पॉईंट्च नवीन तयार होणाऱ्या Heikin Ashi कॅन्डलस्टिकचा Open Price असतो.

Heikin Ashi ची Close Price हि नॉर्मल कॅन्डलस्टिकची High Price, Low Price, Open Price व Close Price यांची बेरीज करून त्याला 4 (चार) ने भाग दिला जातो व शेवटी येणारी संख्या हि त्या Heikin Ashi कॅन्डलस्टिकची Close Price असते.  तसेच Heikin Ashi कॅन्डलस्टिक मधील बुलीस व बेरिश कॅन्डलस्टिकला सारखाच फॉर्मुला वापरला जातो.

Heikin Ashi च्या High Price चे कॅल्क्युलेशन हे नॉर्मल कॅण्डलचा High Price, Heikin Ashi चा Open Price व Close Price यांच्यापैकी जी जास्तीची Price असेल ती Heikin Ashi च्या High Price असतो. तसेच Heikin Ashi चा Low Price चे कॅल्क्युलेशन हे नॉर्मल कॅण्डलचा Low Price, Heikin Ashi चा Open Price व Close Price यांच्यापैकी जी कमीत कमी असणारी  Price असेल ती Heikin Ashi च्या Low Price असतो.

Heikin Ashi Calculation Formula
Heikin Ashi Calculation Formula

Heikin Ashi चार्ट मुळे आपल्याला दोन गोष्टी समजण्यास सोप्या जातात एक म्हणजे Heikin Ashi चार्ट मध्ये ट्रेंड समजण्यास व ट्रेंड रिव्हर्सल समजण्यास मदत मिळते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे Price चा नॉइज एकदम कमी करते. त्यामुळे आपल्याला साफ – साफ मार्केटमध्ये काय घडत आहे ते कळते. नॉर्मल कॅन्डलस्टिक व हैकिनाशी कॅन्डलस्टिकची High Price, Low Price, Open Price व Close Price वेगवेगळ्या असतात. कारण Heikin Ashi चार्टमधे Average Price वापरली जाते.

निष्कर्ष :-

मित्रांनो टेक्निकल एनालिसिस मध्ये चार्टला खूप महत्व आहे व त्याची भूमिका पण महत्वाची आहे. चार्ट म्हणजे काय ? व त्याची टेक्निकल एनालिसिस मधील भूमिका समजणे खूप गरजेचे आहे. अनेक प्रकारचे चार्ट आहेत, परंतु वेगवेगळे चार्ट वापरण्याचा उद्देश पण वेगवेगळा असतो. कॅन्डलस्टिक चार्ट हा लोकप्रिय चार्टचा प्रकार आहे. वेगवेगळ्या चार्टच्या प्रकारचा अभ्यास करून आपली टेक्निकल एनालिसिस करण्याची स्किल वाढवावी.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.

लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेअर म्हणजे स्टॉक कसा निवडावा याची अधिक माहिती घेण्यासाठी स्टॉक निवडण्यासाठी 10 पॉइंट । How to Select Stock For Invest in Marathi पोस्टला जरूर भेट द्या.

धन्यवाद !

FAQ:-

शेअर मार्केटमध्ये जास्त लोकप्रिय चार्ट कोणते ?

शेअर मार्केटमध्ये जास्त लोकप्रिय 4 चार्ट आहेत.
1. लाईन चार्ट (Line Chart)
2. बार चार्ट (Bar Chart)
3. कॅन्डलस्टिक चार्ट (Candlestick Chart)
4. हेकेनाशी चार्ट (Heikin Ashi)

चार्ट म्हणजे काय ?

चार्ट म्हणजे असे रेखाचित्र, जाच्याद्वारे डेटा प्रदर्शित करू शकता. यामुळे डेटा समजण्यास सोपा जातो व भविष्यात तो डेटा काय असू शकतो त्याचे अनुमान सुद्धा लावू शकतो.

Sharing Is Caring:

नमस्कार मित्रांनो, मी संजयकुमार, मी "शेअर मार्केट इन मराठी" या ब्लॉगचा Author आहे. मी एक ब्लॉगर असुन विविध महत्वाच्या विषयांवर ब्लॉग तयार करून त्याविषयी माहिती आपणा पर्यन्त पोचवतो.

Leave a Comment

error: Content is protected !!