मित्रांनो प्रत्येक गुंतवणूकदारांना गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे how to select stock for invest in marathi किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी स्टॉक कसा निवडायचा ? तुमच्या पण मनात हा प्रश्न उद्धभवला असेल तर या लेखात तुम्हाला या विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. जेणे करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी स्टॉक किंवा शेअर निवडायला थोडीफार मदत मिळेल.
शेअर मार्केटमध्ये शेअरची ट्रेडिंग करणे व गुंतवणूक करणे या दोन्ही गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. ट्रेडिंगमध्ये शेअर कमी किमतीत विकत घ्यावयाचा व त्याची किमत वाढली कि, तो शेअर विक्री करावयाचा, त्याचा कालावधी एक दिवसाचा असू शकतो, एका आठवड्याचा असू शकतो, किंवा सहा महिने पर्यन्तचा पण असू शकतो. परंतु कोणत्याही शेअर मध्ये लॉन्ग टर्म गुंतवणूक करणे म्हणजे, तो शेअर एका वर्षा पासून ते पाच वर्षा पर्यन्त किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शेअर खरेदी करणे होय. यालाच आपण long-term investment असे म्हणतात.
गुंतवणुकीसाठी स्टॉक कसा निवडायचा ?। how to select stock for invest in marathi
मित्रांनो, आपण दैनंदिन जिवनामध्ये एखादी वस्तू खरेदीसाठी उदा. मोबाईल, लॅपटॉप, इतर वस्तू खरेदी करतेवेळी काही दिवस त्या वस्तू विषयी आपण माहिती गोळा करतो, त्याची कंपनी, कोणती वस्तू चांगली, कोणती वस्तू वाईट या विषयी सविस्तर माहिती घेऊनच खरेदी करतो. परंतु आपण कोणाच्यातरी सांगण्यावरून, कोणाचीतरी टिप्स किंवा कोणता एखादा इन्व्हेस्टर त्यामध्ये गुंतवणूक करत आहे, याची बातमी आली तर फोमो मध्ये येऊन त्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कंपनी विषयी कोणतीही माहिती न घेता किंवा अर्धवट माहिती घेऊन किंवा कोणीतरी सांगितलेली टिप्सच्या आधारे गुंतवणूक करतो. शेवटी नुकसानाला सामोरे जावे लागते.
शेअर मार्केटमध्ये रिटेल इन्व्हेस्टरला गुंतवणुकीसाठी शेअर कसा निवडायचा। how to select stock for invest in marathi हे माहितीचं नसत कोणी तरी सांगितलेल्या टिप्सच्या आधारावर स्टॉक खरेदी करतो. टिप्सच्या आधारावर जर सगळेच लोक शेअर खरेदी करू लागले तर कोणीही शेअर मार्केटमध्ये लॉस करणार नाही, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, शेअर मार्केट मध्ये पैसे कमावणे सोपे नाही त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. येथे कोणताही शॉटकट कामी पडत नाही.
शेअर मार्केटमध्ये स्टॉक दोन उद्देशाने विकत घेतला जातो.
१. ट्रेडिंग :- (यामध्ये वेळोवेळी शेअर खरेदी व विक्री केला जातो.)
२. इन्व्हेस्टमेंट :- (यामध्ये खूप कालावधीसाठी शेअर मध्ये गुंतवणूक केली जाते.)
मित्रांनो या लेखात तुम्हाला गुंतवणुकीसाठी स्टॉक कसा निवडायचा ? त्यासाठी 10 पॉइंटची माहिती देणार आहे, जेणे करून तुम्हाला stock pick करण्यास मदत मिळेल. खाली दिलेल्या 10 पॉइंटच्या आधारे कोणत्या कंपनीचा स्टॉक खरेदी करावा याविषयी तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकाल.
१. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी चांगले सेक्टर निवडा । best sectors to invest in long-term
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये खूप कंपन्या लिस्ट आहेत. परंतु आपल्याला कोणता स्टॉक लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी निवडायचा हे समजत नाही, कोणत्या कंपनीचा स्टॉक निवडावा हे जाणून घेण्यासाठी आगोदर तुम्ही निश्चित असं सेक्टर निवडा. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये काही कंपन्या असतात. परंतु तुम्ही असे सेक्टर निवडा की जे पुढे चालून भविष्यात त्या सेक्टरचे डिमांड वाढणार आहे, जुन्या प्रोडक्टचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला तुम्ही टाळू शकता. कारण जुने प्रोडक्ट काळानुसार लोकांना उपयोगी पडत नाही किंवा त्याचा अल्टर्नेटीव्ह निर्माण होतो. आज कोणती कंपनी डीव्हीडी, सीडी किंवा टायपिंगची मशीन बनवत असेल तर अशा कंपनीचे भविष्य नसते.
असे सेक्टर निवडा कि जेणे करून भविष्यात त्या सेक्टरचा व्यापार वाढेल जसे कि इलेक्ट्रिक वाहन. अशी कंपनी जे कि असे प्रोडक्ट बनवेल जे कि येणाऱ्या १० ते १५ वर्ष पर्यंत लोग त्या कंपनीचा प्रोडक्ट वापरतील व ते प्रोडक्ट लोकांसाठी गरजेचे बनेल किंवा लोग त्या प्रोडक्टचा हमखास वापर करतील. जेणे करून कंपनीचा सेल कमी होणार नाही, दिवसेंदिवस कंपनीचा सेल वाढेल.
२. कंपनीचा बिझनेस समजून घ्या । understand the company’s business
मित्रांनो आपण कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा टिप्सच्या अधावर अश्या कंपनीचे शेअर खरेदी करतो कि ती कंपनी कोणता बिजनेस करत आहे हे आपल्याला माहीतच नसत. आपण त्या कंपनीचे शेअर विकत घेतो म्हणजे त्या कंपनीमध्ये व त्या कंपनीच्या बिजनेस मध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे ती कंपनी करत असलेल्या बिजनेस मध्ये आपले पैसे लावतो. कंपनीचे शेअर खरेदी करते वेळी या गोष्टीची माहित जरूर घ्यावी लागेल कि कंपनी कोणता बिजनेस करत आहे. आपण त्या कंपनीमध्ये लावलेल्या पैशाचे कंपनी काय करत आहे. आपण जर कंपनीचा बिजनेस समजून नाही घेतला तर त्या कंपनीच्या बिजनेसमध्ये भविष्यकाळात होणारी ग्रोथ, कंपनीचे उत्पादन व कंपनीला होणारे प्रॉफिट समजू शकणार नाही किंवा त्याचे अनुमान लावू शकणार नाहीत.
त्यामुळे कंपनी कोणता बिजनेस करत आहे ? कंपनीचे बाजारात कोणकोणते प्रोडक्ट आहेत ? कंपनी आपल्या प्रोडक्ट मध्ये लोकांच्या गरजेनुसार बदल करत आहे का ? किंवा कंपनी कोणत्या प्रकारे सर्विस देत आहे ? कंपनीचे टार्गेट ग्राहक कोण आहेत? याविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.
३. फाइनेंसियल डेटा तपासा । check the financial data
मित्रांनो आपल्याला भविष्याच्या आधारावर जो स्टॉक चांगला वाटेल त्या स्टॉकचा ३ ते ५ वर्षाचा फाइनेंसियल डेटा आवश्य तपासा यामध्ये कंपनीचे बॅलन्स शीट, इनकम स्टेटमेंट, कॅशफ्लो आणि फाइनेंसियल रेशो तपासा. यासाठी तुम्ही tickertape या वेबसाईट वर stock Screener चा वापर करून प्रत्येक कंपनीचा फाइनेंसियल डेटा पाहू शकता.
इनकम स्टेटमेंट
कंपनीचे Financials मधील इनकम स्टेटमेंट मध्ये Total Revenue तपासा, कंपनीचे Total Revenue हे प्रत्येक वर्षी वाढत आहे का हे पाहावे लागेल, कंपनीचे Total Revenue प्रत्येक वर्षी वाढत असेल तर कंपनी चांगली समजावी. तसेच कंपनीची Net Income तपासा कंपनीची Net Income जर प्रत्येक वर्षी वाढत असले कंपनी चांगली आहे व कंपनीच्या इनकम मध्ये वाढ होत आहे असे समजावे.
बॅलन्स शीट
कंपनीचे Financials मधील बॅलन्स शीट तपासावी कंपनीचे Total Assets किती आहेत, कंपनीचे Total Assets हे वर्षाला वाढत आहेत का ? कंपनी आपले Assets विकत तर नाही ना ? या विषयी माहिती घ्यावी. तसेच कंपनीची Total Liabilities किती आहे. कंपनीला किती रुपये लोकांचे देणे आहे. कंपनीचे प्रत्येक वर्षी Total Liabilities वाढत आहे का कमी होत आहे याची माहिती घेणे गरजेचे असते.
कंपनीचे Total Assets पेक्षा कंपनीचे Total Liabilities कमी असावी जेवढी Total Liabilities कमी असेल तेवढी कंपनी स्टेबल आहे असे समजावे. जेणे करून कंपनी पुढे चालून फाइनेंसियल संकटात सापडणार नाही.
कॅशफ्लो
कंपनीचे Financials मधील Free Cash Flow किती आहे. म्हणजे कंपनी जवळ किती कॅश आहे. प्रत्येक वर्षी कंपनी आपल्याजवळ कॅश ठेवत आहे का ? Cash Flow वाढत आहे का याची माहिती घ्यावी. Cash Flow जर कमी झाला असेल तर ती कॅश कंपनीने कशासाठी वापरला आहे हे तपासावे, कंपनी जर आपल्या जवळ Cash Flow ठेवत असेल व त्यामध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असेल तर चांगला संकेत मानला जातो.
तसेच कंपनी Annual report सबमिट करते का ते पहावे कंपनीच्या Annual report ची व कंपनीच्या Investor Presentation ची माहित घ्यावी. जेणे करून तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यास मदत मिळेल.
४. EPS – Earning per share
मित्रांनो कोणत्याही कंपनीचा शेअर खरेदी करत असताना त्या कंपनीचा EPS (Earning Per Share) हा फाइनेंसियाल रेशो तपासणे अतिशय महत्वाचे आहे. EPS हा एक महत्वाचा टूल आहे. EPS म्हणजे कोणतीही कंपनी जे प्रॉफीट मिळवते ते प्रॉफीट कंपनीच्या प्रत्येक शेअर मागे किती प्रॉफीट मिळवत आहे याची माहिती देतो, म्हणजेच एका शेअर मागे किती प्रॉफीट. उदा. एक XYZ.Ltd नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे एकूण 100 शेअर आहेत, आणि त्या कंपनीचा तुम्ही 1 (एक) शेअर खरेदी केलेला आहे. कंपनी वर्षभरात 1000 (एक हजार रुपये) नेट प्रॉफीट मिळवते. म्हणजे EPS (Earning Per Share) होईल रुपये 1000/100 शेअर = 10 रुपये Per Share. जर कंपनीचा EPS निगेटिव असेल तर त्या कंपनीला गुंतवणुकीसाठी प्राधने देऊ नये.
संबधीत पोस्ट : EPS रेशो म्हणजे काय ? EPS रेशो विषयी माहिती.
५. PE Ratio – Price Earning Ratio
मित्रांनो कंपनीचा PE Ratio (Price Earning Ratio) काढण्यासाठी कंपनीच्या एका शेअरच्या करंट मार्केट प्राईजला EPS ने भागावे लागेल. उदा. XYZ.Ltd या कंपनीचा EPS 10 रुपये Per Share आहे आणि त्या कंपनीच्या एका शेअरची करंट मार्केट प्राईज 300 रुपये आहे. PE Ratio = Market Price Per Share / EPS म्हणजे PE Ratio = 300 रुपये / 10 रुपये Per Share = 30 म्हणजे कंपनी जर 1 रुपये कमवत आहे तर आपण किती रुपये देऊन खरेदी करण्यासाठी इच्छुक आहात. कंपनीचा PE Ratio – 30 आहे म्हणजे कंपनी तर 1 रुपये कमवत आहे परंतु गुंतवणूकदार त्यासाठी 30 (तीस रुपये) देण्यास तयार आहेत.
मित्रांनो कंपनीचा PE Ratio – 30 आहे असे समजा, मग PE Ratio च्या आधारावर त्या कंपनीचा शेअर महाग आहे कि स्वस्त आहे हे कसे ओळखावे ? पाहिले तर कंपनी कोणत्या सेक्टर मध्ये येते त्या सेक्टरचा PE Ratio तपासा, जर त्या कंपनीचा PE Ratio त्या कंपनीच्या सेक्टरच्या PE Ratio पेक्षा कमी असेल तर त्या सेक्टरच्या PE Ratio च्या मानाने कंपनीचा शेअर स्वस्त मिळत आहे असे समजावे. दुसरे म्हणजे त्या कंपनीची कॉम्प्रिटेशन मध्ये असणारी दुसऱ्या कंपनीच्या PE Ratio सोबत तुलना करा. मग समजून जाईल कि कोणत्या कंपनीचा शेअर महाग आहे आणि कोणत्या कंपनीचा शेअर स्वस्त आहे.
परंतु कुठे-कुठे PE Ratio महत्वाचा नसतो त्याच्या काही सीमा पण आहेत. उदा. एखादी कंपनी नवीन बाजारात आली आहे, नवीन स्टार्टअप झाले आहे सरासरी प्रॉफीट मिळवत नसेल किंवा सध्या ती नुकसानीत आहे तेव्हा त्या कंपनीचा PE Ratio फार महत्वाचा नसतो. तसेच कोणत्या कंपनीची Earning स्थिर नसेल ती अस्थिर असेल तेव्हा सुद्धा PE Ratio ला फार महत्व नसते. त्यामुळे कोणत्या कंपनीचा PE Ratio कमी असेल तर तो का कमी आहे याची माहिती घेणे खूप गरजेचे असते.
सरासरी लोक तर ज्या कंपनीचा PE Ratio कमी आहे त्या कंपनीचा शेअर अंडरव्हॅल्यूड आहे असे समजतात तसेच ज्या कंपनीचा PE Ratio जास्त आहे त्या कंपनीचा शेअर ओव्हरव्हॅल्यूड आहे असे समजतात. विचार जर केला तर ते बरोबर आहे. परंतु कंपनीचा PE Ratio कमी आहे म्हणजे त्या कंपनीचा शेअर स्वस्त आहे असे पण नाही. कंपनी अंडरव्हॅल्यूड असल्यामुळे PE Ratio कमी असू शकतो किंवा त्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार इच्छुक नसतील यामुळे सुद्धा कंपनीचा PE Ratio कमी असू शकतो.
संबधीत पोस्ट : P/E Ratio समजून घ्या मराठी भाषेत👆
६. ROE आणि ROCE
मित्रांनो गुंतवणुकीसाठी शेअर निवडण्यासाठी ROE व ROCE हे दोन रेशो खूप महत्वाचे आहेत. या रेशो मुळे आपल्याला हे समजते कि, कंपनी आपल्या Equity व Capital वर किती Earning करत आहे.
ROE (Return On Equity) या रेशो मध्ये आपल्याला हे समजते कि, कंपनी आपल्या Equity वर किती पैसे कमावत आहे म्हणजे किती रिटर्न बनवत आहे. थोडक्यात सांगायचं झाला तर कंपनीने बिजनेसमध्ये किती पैसे गुंतवले व त्यावर कंपनी किती नफा कमवत आहे. उदा. XYZ.Ltd कंपनीने मध्ये 1000 हजार रुपये Equity (शेअर कॅपिटल) आहे व 1000 हजार रुपये रिझर्व्ह आहेत. कंपनीची Total Equity झाली 2000 हजार रुपये. कंपनीला या वर्षी Net Profit झाले 2000 हजार रुपये तर XYZ.Ltd या कंपनीचा ROE झाला –
ROE = Net Profit / Shareholders Equity – 2000 / 2000 = 100%
ROCE (Return On Capital Employed) या रेशो मध्ये आपल्याला हे समजते कि, कंपनीने एकूण लावलेले पैसे म्हणजे कंपनीने केलेली इन्व्हेस्टमेंट वर कंपनीने किती रिटर्न मिळवले. उदा. XYZ.Ltd कंपनीने मध्ये 1000 हजार रुपये Equity (शेअर कॅपिटल) आहे व 1000 हजार रुपये रिझर्व्ह आहेत. या व्यतिरिक्त कंपनीने 1000 हजार रुपयाचे कर्ज (Debt) पण घेतलेले आहे. येथे कंपनीचे एकूण कॅपिटल झाले 3000 हजार रुपये व या वर्षी कंपनीचे Interest व tax वगळून म्हणजे कंपनीचे EBIT (Earning before Interest and tax) 2600 रुपये. XYZ.Ltd कंपनीचा ROCE झाला –
ROCE = EBIT / Capital Employed – 2600 / 3000 = 86.66%
आपण निवडलेल्या कंपनीवर कर्ज (Debt) नसेल तर कंपनीचा ROE पहिला तरी चालेल परंतु आपण निवडलेल्या कंपनीवर कर्ज (Debt) असेल तर ROCE पाहणे महत्त्वाचे असते. कंपनीचा ROE व ROCE 10% पेक्षा कमी असेल तर त्या कंपनीला इग्नोर करू शकता. तसेच कंपनीचा ROE 20% असेल तर तो चांगला मानला जातो व ROCE 15% असेल तर तो चांगला मानला जातो.
७. कंपनीवर कर्ज किती आहे ते पहा । company debt
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी शेअर निवडते वेळी आपण निवडलेल्या कंपनीवर कर्ज आहे का ते जरूर पहावे. कंपनीवर जर जास्त कर्ज (Debt) असेल तर कंपनीला मिळणारे प्रॉफीट हे त्या कर्जाचे व्याज (Interest) देण्यातच निघून जाईल. त्यामुळे कंपनीच्या प्रॉफीट वर परिणाम होऊन आपल्यासारख्या गुंतवणूक दारांना चांगला मोबदला मिळू शकणार नाही.
तसेच जरी कंपनीवर कर्ज असेल तर ते कर्ज कमी असावे जेणे करून कंपनीला ते कर्ज व कर्जाचे व्याज फेडण्यास व कंपनीच्या ग्रोथ मध्ये अडसर निर्माण होऊ नये. तरी पण कंपनीवर कर्ज नसणाऱ्या कंपन्याच निवडणे चांगले म्हणजे Debt Free कंपनी निवडावी.
तरी कंपनीचा Debt Equity Ratio पाहणे खूप गरजेचे आहे. कंपनीचा Debt Equity Ratio 1 (एक) असेल तर चांगला मानला जातो.
८. डिवीडेंट । dividend
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या आर्थिक बाजूने खूप चांगल्या असतात आणि कंपनी चांगले प्रॉफीट पण मिळवतात. अशा कंपनीचे शेअरची प्राईज पण वाढते आणि आपण त्याला महत्व पण देतो परंतु त्या सोबत जर कंपनी आपल्याला वेळोवेळी डिवीडेंट (dividend) जर दिले तर किती चांगले होईल. त्यामुळे कंपनी गेली पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना नियमित डिवीडेंट (dividend) दिले आहे का ते पहा. डिवीडेंट (dividend) चा ट्रेंड पहा कंपनी एअरली डिवीडेंट (dividend) मध्ये वाढ करत आहे का ते पहा.
९. कंपनीच्या मॅनेजमेंट विषयी माहित घ्या । learn about company management
मित्रांनो शेअर निवडते वेळी कंपनीचे मॅनेजमेंट विषयी माहिती आवश्य घ्यावी. कोणती हि कंपनी आपला विकास केव्हा करते जेव्हा कंपनीचे मॅनेजमेंट चांगले असेल तर. कंपनीचे चांगले उज्वल भविष्य हे कंपनीच्या मॅनेजमेंट वरच आधारित असते. कंपनीचे मॅनेजमेंट जर चांगले काम करणारे नसेल तर चांगल्या कंपनीला सुद्धा उतरती कळा लागते. त्यामुळे कंपनीचा Share Select करते वेळी कंपनीच्या मॅनेजमेंट विषयी माहिती जरूर घ्यावी.
कंपनीच्या मॅनेजमेंट विषयी हे कांही मुद्दे लक्षात ठेवावे –
- कंपनीच्या मॅनेजमेंट मध्ये असणाऱ्या व्यक्तीची योग्यता, त्यांना असणारा अनुभव व त्यांचा कायर्काल याविषयी माहिती घ्यावी.
- कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन कंपनीचे भविष्यातील प्लॅन काय आहेत ? भविष्यात कंपनी कोणकोणते डेव्हलप करणार आहे? कंपनीचा उद्देश काय आहेत ? लॉन्ग टर्म मध्ये कंपनीचे व्हिजन काय आहे ? या विषयी माहिती घ्यावी जेणे करून कंपनीचे मॅनेजमेंट कंपनी विषयी किती दूरगामी विचार करत आहे याची माहिती मिळेल.
- कंपनी शेअर बायबॅक करत आहे का ? या विषयी माहिती घ्यावी जर कंपनीचे प्रमोटर पब्लिकमध्ये असणारे शेअर परत खरेदी करत असतील तर कंपनीच्या प्रमोटरला कंपनीच्या बिजनेस मॉडेल वर विश्वास आहे व कंपनी भविष्यात प्रगती करेल याची शाश्वती मिळते.
१०. शेअर होल्डिंग पॅटर्न तपासा । shareholding pattern
मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे कोण कोणत्या व्यक्तीकडे किती शेअर आहेत. एकूण शेअर मधील किती टक्के शेअर प्रमोटरकडे आहेत. जास्तीत जास्त शेअरचा हिस्सा प्रमोटर जवळ असावा. किमान 50% शेअर हे प्रमोटर जवळ असावेत आणि त्यापेक्षा जास्त असतील तर अधीक चांगले. अधिकाधीक शेअर प्रमोटर जवळ असतील तर समजावे कि कंपनीच्या बिजनेस मॉडेलवर व कंपनीवर प्रमोटरचा विश्वास पक्का आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो शेअर मार्केटमध्ये चांगल्या मार्गाने केलेली रिसर्च आणि फंडामेंटल एनालिसिस च्या आधारावर आपण लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी चांगला शेअर निवडू शकता त्यासाठी वरील स्टेप्स तुम्हाला मदत करतील. वरील पॉईंट च्या आधारावर तुम्हाला शेअर निवडतेवेळी परेशानी होईल तुम्हाला वेळ पण जास्त जाईल परंतु भविष्यात नुकसान होण्याची शक्यता कमी असेल. शेअर खरेदी करतेवेळी पेशन्स ठेवणे खुप गरजेचे आहे. नेहमी शेअर स्वस्तात खरेदी करा.
डिस्केलमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्धेशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.
फंडामेंटल एनालिसिस विषयी अधिक माहिती घेण्यासाठी फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय ? या पोस्टला जरूर भेट द्या.
धन्यवाद !
लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय?
कोणत्याही शेअर मध्ये लॉन्ग टर्म गुंतवणूक करणे म्हणजे, तो शेअर एका वर्षा पासून ते पाच वर्षा पर्यन्त किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शेअर खरेदी करणे होय.