या पोस्टमध्ये आपण टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय ? (what is technical analysis in marathi) तसेच टेक्निकल एनालिसिसचा इतिहास तसेच डाऊ थेअरी विषयी माहिती मिळणार आहे.
मित्रांनो Technical Analysis किमान 400 वर्षापेक्षाची जुनी संकल्पना आहे. शेअर मार्केट मध्ये Technical Analysis ला खूप महत्व आहे. जर आपल्याला Technical Analysis विषयी माहिती नसणे किंवा त्याचा वापर आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी न करणे म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचे शस्त्र न घेता युद्ध करण्यास निघाला आहात असे समजावे आणि हातात शस्त्र नसल्यास युद्धामध्ये आपण जिंकू शकत नाहीत. शेअर मार्केट मध्ये पैसा हे तुमचे सेनिक व Technical Analysis हे तुमचे शस्त्र आहे असे समजा. तेव्हाच तुम्ही शेअर मार्केट मध्ये टिकू शकता किंवा चांगले ट्रेड घेऊ शकतात.
टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय ?। What is Technical Analysis in Marathi
टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय ? (what is technical analysis in marathi) हा प्रश्न नवीन ट्रेडरला हमखास पडतो. कारण टेक्निकल एनालिसिस शिवाय नवीन ट्रेडर स्टॉक मार्केटमध्ये किंवा इत्तर मार्केटमध्ये काम करू शकत नाही. परंतु कंपनीच्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करते वेळी टेक्निकल एनालिसिस करण्या अगोदर टेक्निकल एनालिसिस विषयीच्या बारीक सारीक गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे आहे. टेक्निकल एनालिसिसचा इतिहास व टेक्निकल एनालिसिस विषयी माहिती घेणे व ती आत्मसात करणे आवश्यक आहे.
चला तर मग टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय ? या विषयी माहिती पाहू.
technical analysis यालाच मराठीमध्ये तांत्रिकी विश्लेषण असे आपण म्हणतो आणि तुम्ही technical analysis हा शब्द सोपा आहे असे म्हणताल कारण आपल्याला मराठी शब्दापैकी असे काही इंग्रजी शब्द आहेत, ज्याचा आपल्याला चांगला सराव झालेला आहे.
टेक्निकल एनालिसिस म्हणजे किंमत आणि व्हॉल्युमसह हिस्टोरिकल डेटाचा केलेला अभ्यास. कंपनीचा शेअर मागील दिवसापासून, महिण्यापासून किंवा वर्षांमध्ये कोणत्या किमतीवर तो शेअर ट्रेड होत होता व त्या शेअर चा व्हॉल्युम यांच्याशी निगडित गोस्ट आहे.
चार्ट इंडिकेटर, त्या शेअरचा मागील काळातील डेटा आणि भविष्यात त्या शेअरची किंमत किती वाढेल याची आपण भविष्यवाणी करतो. यासाठी दुसऱ्या तांत्रिक बाबी यामध्ये सामाविस्ट आहेत.
टेक्निकल एनालिसिसचे तीन मूलभूत गृहीतके
मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कि Basic Assumption म्हणजे काय? ज्याला आपण मराठीत गृहितके किंवा पूर्वधारणा असे म्हणतो. गृहितके म्हणजे आपण जेव्हाही एखादी क्रिया करतो, एखादे डिसिजन घेतो. क्रिया किंवा जे घेतलेले डिसिजन आहे ते काशाच्यातरी आधारावर घेतलेले आहे, तो आधार म्हणजे गृहितके होय. एखादया शेअरचा आपण टेक्निकल एनालिसिस करतो त्यासाठी काही Assumption [गृहितके] आहेत. ते खालील प्रमाणे.
मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग । Market Discounts Everything
Market Discounts Everything म्हणजे मार्केट मध्ये जी नवीन बातमी किंवा एखादा नवीन इव्हेंट येणार असतो, त्याचा त्या शेअरच्या प्राईज मध्ये आगोदरच डिस्काउंट झालेला असतो. परत त्या गोष्टी डिस्काउंट करण्याची गरज नसते. म्हणजे याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की, टेक्निकल एनालिसिस करते वेळी या गोष्टीचा आधार घेतला जातो कि, त्या कंपनीच्या शेअरच्या प्राईजला सर्व न्यूज इव्हेंट याची कल्पना असते. कारण जेंव्हा न्यूज आलेली असते तेव्हा त्या कंपनीच्या शेअरची प्राईज आगोदरच वाढलेली असते.
स्टॉक प्राईज मूव्ह इन ट्रेंड । Stock Prices Move in Trends
मित्रांनो Stock Prices Move in Trends म्हणजे कोणत्याही शेअरची प्राईज विशिष्ट अश्या ट्रेंड मध्ये चालते. एक ट्रेंड असतो अप ट्रेंड (Up Trend) दुसरा असतो डाऊन ट्रेंड (Down Trend) आणि तिसरा म्हणजे साईडवेज ट्रेंड (Sideways Trend) असे आपण म्हणतो.
मार्केटचे ट्रेंड हे Demand and Supply वर आधारीत आहेत. जेंव्हा मार्केट मध्ये Demand वाढते तेव्हा मार्केटमध्ये Buyer येतात शेअर खरेदी केले जातात तेव्हा अप ट्रेंड (Up Trend) चालू असतो आणि मार्केटमध्ये Supply वाढते गुंतवणूकदार आपले शेअर विकतात, मार्केटमध्ये Seller येतात तेव्हा डाऊन ट्रेंड (Down Trend) सुरु होतो.
दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मार्केट मध्ये काही खरेदी किंवा विक्री होत नाही किंवा Buyerव Seller दोघेही व्हॉल्युम च्या आधारावर सामान असतात. तेव्हा मार्केट साईडवेज ट्रेंड (Sideways Trend) चालू होतो.
हिस्ट्री ट्रेंड टू रिपीट इटसेल्फ । History tends to Repeat itself
मित्रांनो History tends to Repeat itself म्हणजे मार्केटमध्ये इतिहासाची पुनरावृती होते. मार्केट इतिहास रिपीट करतो. मार्केट मागे घडलेल्या कोणत्या परिस्थितीमध्ये कसे वर्तन केले तशीच परिस्थिती पुन्हा आली तर मार्केट तसेच वर्तन करतो.
उदा. पूर्ण जगात कोविड परिस्थिती आली तेंव्हा जगातील सर्वच मार्केट ढासळले होते, म्हणजे पुन्हा परत कोविड सारखी परिस्थिती आली तर मार्केट तसेच वर्तन करू शकते.
वरील हे तीन Assumption म्हणजे गृहितके आहेत. वरील तिन्ही गोष्टीचा आधार घेउनच टेक्निकल एनालिसिस करावा लागतो. वरील तीन Assumption ज्याला समजले तो टेक्निकल एनालिसिसचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो.
महत्वाच्या काही गोष्टी । some important things
- शेअरची प्राईस व शेअरचा व्हॉल्युम म्हणजे शेअर किती कॉन्टेटीमध्ये खरेदी व विक्री होत आहे या गोष्टी टेक्निकल एनालिसिस करतेवेळी विचारात घेणे गरजेचे आहे.
- त्या शेअरची इंट्रेनसिक व्हॅल्यू म्हणजे बुक व्हॅल्यू काय आहे. या गोष्टीला टेक्निकल एनालिसिस इग्नोर करतो. जो आपणास सध्या त्या शेअरचा प्राईस आहे तोच प्राईस विचारात घेणे गरजेचे आहे. आपण म्हणतो न ‘भाव हेच भगवान’.
- मार्केटमध्ये आपण कोणत्या सेक्टर मधील शेअर मध्ये ट्रेड करत आहोत म्हणजे त्या शेअरचे सेगमेंट विभाग काय आहे हि गोस्ट विचारात घेणे गरजेचे आहे.
- टेक्निकल एनालिसिस हा इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, स्कालपिंग ट्रेडिंगसाठी वापरावा लॉन्गटर्म इनव्हेसमेंटसाठी आपण टेक्निकल एनालिसिस सोबत त्या शेअरचा फन्डामेन्टल एनालिसिस सुध्दा पाहतो.
- आपण कोणत्याही शेअरचा टेक्निकल एनालिसिस करतेवेळी त्या शेअरचा चार्ट, त्या शेअरचा व्हॉल्युम शेअर खरेदी व विक्री ची संख्या पहावी, तसेच त्या शेअर सपोर्ट व रेसिस्टन्स चे लेव्हल खूप महत्वाचे आहेत.
टेक्निकल एनालिसिसचा इतिहास। technical analysis history
जोसेफ दे ला वेगा । Josephe de la vega
आम्सटरडॅम येथील Amsterdam Stock Exchange हे जगातील पहिले स्टॉक एक्सचेंज आहे. आता त्याचे नाव बद्दले आहे. आम्सटरडॅम मध्ये एक बिजनेसमॅन होते त्याचे नाव Josephe de la vega (१६५० – १६९२) ते एक ज्यु व्यापारी व कवी सुद्धा होते. त्यांचा मृत्यू १३ नोव्हेंबर १६९२ रोजी झाला. त्यानी १६८८ मध्ये Confusion of Confusions हे पुस्तक लिहिले.
या पुस्तकामध्ये पहिल्यांदा टेक्निकल एनालिसिसचा उल्लेख आढळतो. हे टेक्निकल एनालिसिस वरील पहिले पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये काही गोष्टीचा उल्लेख आहे जे कि अजूनही त्या गोष्टीचा इन्व्हेस्टर अवलंब करतात.
पुस्तकामध्ये Risky speculations मध्ये ट्रेड करू नये याचा उल्लेख आहे. ट्रेड मध्ये कधी लॉस झाला तर तो स्वीकारावा, कधीही प्रॉफिटच होईल याची अपेक्षा करू नये, नेहमी ट्रेड मध्ये किंवा गुंतवणूक मध्ये patience ठेवावा असे सांगितले आहे.
मुनीहीस होमा । Munehisa Homma
Munehisa Homma (१७२४-१८०३) हे जापान मधील सकाता या शहरामध्ये राहत होते. त्याना स्टॉक मार्केट, ट्रेडरचे व कमोडिटी मार्केटचे भगवान मानल्या जाते. त्यांचा जन्म एका तांदुळाच्या व्यापारी घराण्यात झाला. त्यावेळेस जापान मध्ये तांदुळाचा खूप मोठा व्यापार होत होता.
सकाता हे शहर त्यासाठी प्रसिद्द होते. वडिलांचे निधन झाल्यावर ते तांदुळाचा व्यापार त्यांना सांभाळावा लागला. तांदुळाच्या बाजारपेठेत जाऊन खूप दिवस त्यांनी माहिती घेतली प्रत्येक दिवशी तांदुळाची प्राईस मध्ये होत असलेला बद्दल त्यांना समजला. त्यांनी तांदुळाचे शेतकरी तांदुळाचे व्यापारी याची ह्यूमन साकोलोजि, माईंड सेट आणि ह्यूमन बीव्हर समजला.
संबधीत पोस्ट : टॉप 4 चार्टचे प्रकार.
तांदुळाच्या प्राईस आणि हवामानचा काय सबंध आहे. याची माहिती त्यांनी लेखी स्वरूपात साठा केला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर कॅन्डलस्टिक चा शोध लावला. पहिल्यांदा त्यांनी बुलीस कॅन्डलस्टिकला पांढरा कलर दिला व बेरिस कॅन्डलस्टिकला काळा कलर दिला परंतु कालांतराने आज आपण कॅन्डलस्टिकचे कलर रेड आणि ग्रीन पाहत आहोत. त्यांना जापान सरकारचे फायनान्स अडवायझर बनवले होते आणि त्यांना समुराय टायटल पण दिले होते. त्यांनी कॅन्डलस्टिकचा शोध लावला. हा एक क्रांतिकारक शोध आहे.
चार्ल्स हेन्री डाऊ (डाऊ सिद्धांत) । Charles Henry Dow (Dow Theory)
Charles Dow (१८५१ – १९०२) यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८५१ रोजी कनेक्टिकट या स्टेट मधील स्टर्लिंग या शहरामध्ये झाला. यांना आपण आज The Father of Technical Analysis & Dow Theory म्हणून ओळखतो. अमेरिकेतील एक प्रसिद्द पत्रकार होते व त्यांनी न्यूयार्क एक्सप्रेस मध्ये रिपोर्टींगच्या कामाने आपल्या करिअरची सुरवात केली.
सन १८८२ मध्ये त्यांचा मित्र एडवर्ड जोन्स याच्या सोबत मिळून The Dow Jones And Company बनवली. सन १८८४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आपल्या रिपोर्टमध्ये इंडेक्स लॉन्च केला. त्या इंडेक्समध्ये ९ कंपनीचे स्टॉक होते. त्यावेळेस दोनच इंडस्ट्री होत्या एक म्हणजे रेल्वे व दुसरी म्हणजे रस्ते तयार करण्याची या दोन इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या ९ कंपनीचा तो इंडेक्स होता.
सन १८९६ मध्ये त्यांनी दोन इंडेक्स ऑफिसिली लॉन्च केले. एक म्हणजे Down Jones Industrial Average [DJIA] त्यामध्ये १२ स्टॉक होते. दुसरा इंडेक्स Dow Jones Transportation Index [DJT] बनवले. त्यांचा मृत्यू ४ डिसेंबर १९०२ मध्ये झाला.
The Dow Jones And Company या कंपनीला सन २००७ मध्ये नूज कॉर्पोरेशन या कंपनीने ५.६ बिलियन डॉलर मध्ये विकत घेतले. सन १९२२ विल्यम पीटर हॅमिल्टन यांनी The Stock Market Barometer हे पुस्तक लिहिले, या पुस्तकामध्ये पहिल्यांदा चार्ल्स हेनरी डाऊ यांचे थेअरीचा उल्लेख आढळतो. ज्याला आपण आज Dow Theory म्हणतो. यामध्ये सहा पॉईंट आहेत.
डाऊ सिद्धांताचे 6 सिद्धांत । 6 Tenets of Dow Theory
1. मार्केट तीन ट्रेंड मधून जाते : प्राथमिक मार्केट, दुय्यम मार्केट आणि किरकोळ मार्केट.
(Market moves in summation of 3 trends : Primary, Secondary & Minor)
मित्रांनो आपल्याला माहीतच असेल कि मार्केटचे तीन ट्रेंड असतात 1.अप ट्रेंड (Up Trend) 2. डाऊन ट्रेंड (Down Trend) 3. साईडवेज ट्रेंड (Sideways Trend) पण डाऊ थेअरी म्हणते कि अप ट्रेंड (Up Trend) किंवा डाऊन ट्रेंड (Down Trend) मध्ये सुद्धा 3 Phases असतात primary, Secondary & Minor.
Primary मध्ये काही दिवस मार्केट वर-वर जात आहे. याला प्रायमरी फेस असे म्हणतात आणि काही दिवस मार्केट खाली-खाली येत आहे परंतु डाऊन ट्रेंड चालू नाही फक्त काही दिवसासाठी मार्केट खाली येत आहे यालाच सेकंडरी फेस असे म्हणतात आणि मायनर फेस हा खूप कमी दिवस असतो या फेस मध्ये मार्केट अप मध्ये व डाऊन मध्ये वीक बनवतो, निश्चित ट्रेंड नसतो यालाच मायनर फेस असे मानतात. चांगले ट्रेडर मायनर फेस मध्ये ट्रेंड करत नाहीत.
2. मार्केट ट्रेंडचे 3 टप्पे आहेत: एक्युम्युलेशन, पार्टीसिफेशन आणि डिस्ट्रिब्युशन.
(Market trend have 3 phases : Accumulation, Participation & Distribution)
मित्रांनो मार्केटचा Trend सुद्धा ३ फेस मध्ये चालतो, पहिला आहे Accumulation ज्यामध्ये मार्केट साईडवेज सारख्या परीस्तीमध्ये असतो येथे शेअर Accumulate होतात. Accumulate झाल्यावर मार्केट जरा वर जात तेव्हा मंग Public त्यामध्ये Participation करते आणि शेवटी टॉप वर मार्केट गेल्यास Distribution फेस चालू होतो. यामध्ये प्रत्येकजण पॅनिक होतो.
3. शेअर बाजारात सर्व बातम्या सवलतीच्या आहेत
(All news is discounted in the stock market)
मित्रांनो या पॉइंटला मी ३ Basic Assumption मधेच कव्हर केलेल आहे कि, कोणताही स्टॉक किंवा सेक्युरीटीची प्राईजला मार्केटमध्ये येणाऱ्या नूज किंवा कोणत्या कंपनीचा येणारा इव्हेंट याची आगोदरच डिस्काउंट केलेल असत. मित्रांनो विचार करा कि, हे पूर्ण शेअर मार्केट चालवण्यासाठी फक्त रिटेल इन्व्हेस्टर नाहीत, यामध्ये मोठमोठे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत, देशातील चांगले मोठे इन्व्हेस्टर आहेत.
यांना त्या कंपनीच्या स्टॉक विषयी येणारी चांगली बातमी आगोदरच माहित झालेली असते ते त्यात इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या शेअरची प्राईज अगोदरच वाढलेली असते. जेव्हा नूज येते किंवा इव्हेंटची घोषणा होते तेव्हा आपल्याला अस वाटतं कि मार्केट मध्ये त्या स्टॉकची प्राईज वाढेल आणि काही प्रमाणात वाढते पण परत ती प्राईज कमी कमी होत जाते आणि आपण लॉस करून घेतो.
4. मार्केटमधील मधील इंडेक्सने कान्फरमेशन देणे आवश्यक आहे.
(Indices must confirm each other)
मित्रांनो या पॉईन्टमध्ये ट्रेंड कन्फर्म करावा लागतो, लक्षात घ्या निफ्टीचे मार्केट वर जात आहे आणि बँक निफ्टी खाली जात आहे किंवा निफ्टीचे मार्केट खाली जात आहे आणि बँक निफ्टी वर जात आहे, तेव्हा समजावे कि मार्केटचा ट्रेंड कन्फर्म नाही. निफ्टी व बँक निफ्टी हे दोघे पण एकसारखे वर किंवा खाली जात आहेत म्हणजे समजावं कि मार्केटचा ट्रेंड कन्फर्म आहे.
5. मार्केटमधील व्हॉल्यूमने ट्रेंडचे कान्फरमेशन करणे आवश्यक आहे.
(Volume must confirm the trend)
मित्रांनो या पॉईंटमध्ये कोणत्याही ट्रेंड मध्ये ट्रेंड कन्फर्म करण्यासाठी व्हॉल्युम पहिला पाहिजे. ट्रेंड सोबत व्हॉल्युम पण बदलतो. समजा मार्केट वर जात आहे आणि मार्केट परत खाली येत आहे आणि त्या सोबत मार्केटमधला व्हॉल्युम पण वाढला आहे म्हणजे ट्रेंड कन्फर्म झाला कि खाली जाणार आहे. असाच अप ट्रेंड व डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा व्हॉल्युम आवश्य पहावा, कोणत्याही ट्रेंड बदलत असल आणि व्हॉल्युम वाढत आहे तेंव्हा समजावं कि ट्रेंड कन्फर्म आहे आणि व्हॉल्युम नसेल तर ट्रेंड कन्फर्म नसतो.
6. मार्केटचा ट्रेंड तो प्रयन्त टिकतो जो प्रयन्त स्पष्ट रिव्हर्सल येत नाही.
(Trend persists until there is a clear reversal)
मित्रांनो या पॉईण्टमध्ये आपण ट्रेंड पहिले अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड , साईडवेज ट्रेंड परंतु ट्रेडर ट्रेंड कन्फर्म करू शकत नाही. Charles Dow स्वतः सांगतात कि मार्केटचे ट्रेंड ओळखणे खूप-खूप कठीण आहे. जो प्रयन्त एक क्लिअर रेव्हर्सल चे इंडिकेशन मिळत नाही, लोवरलो किंवा हायेरहाय मिळतात. जोपर्यत मार्केटच्या लो ला दुसऱ्या लो ने तोंडात नाही किंवा हाय ला दुसऱ्या हाय तोडत नाही तो पर्यंत मार्केट मध्ये इंट्री करू नका, पेशंस ठेवा.
निष्कर्ष :-
मित्रांनो या आर्टिकल मध्ये तुम्हाला मी what is technical analysis in marathi किंवा what is technical analysis किंवा टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय? याची पूर्ण माहिती दिली आहे. जोपर्यंत तुम्ही इतिहास पूर्णपणे माहिती करून घेत नाहीत तो पर्यत तुम्हाला ट्रेंड घेणे अवघड जाईल ३ बेसिक Assumption समजून घ्या, ट्रेड मध्ये डिसिपालन खूप गरजेचे आहे. डाऊ थेअरी समजून घ्या.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.
मित्रांनो फंडामेंटल एनालिसिस विषयी अधिक माहितीसाठी फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय या पोस्टला जरूर भेट दया.
धन्यवाद !